Tuesday, May 12, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Youth & mental health Challenges : तरुणांमधील डिजिटलायझेशन, मानसिक आरोग्य आणि वेगवान जीवन…; असे करा तुमच्या अडचणींचे व्यवस्थापन

by
January 8, 2025
in मानसिक आरोग्य
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

Youth & mental health Challenges : आजच्या तरुण पिढीची जीवनशैली झपाट्याने बदलत आहे, आणि याचा त्यांच्या आरोग्य, मानसिकता, आणि सामाजिक वर्तनावर मोठा प्रभाव पडत आहे. आणि हे झपाट्याने होणारे परिणाम आजच्या काळातील महत्त्वाचे मुद्दे बनत आहेत.

आधुनिक जीवनशैलीत अनेक सकारात्मक बाबी आहेत, जसे की तंत्रज्ञानाचा वापर, वेगवान जीवन, शिक्षक, आणि विविध सुविधा; परंतु त्याचबरोबर आरोग्यावर नकारात्मक परिणाम करणारे काही घटकही दिसून येतात. याच बदलत्या जीवनशैलीच्या काही ठळक वैशिष्ट्यांवर आणि परिणामांवर एक नजर…

तरुणांच्या बदलत्या जीवनशैलीची वैशिष्ट्ये :

1. तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया : स्मार्टफोन, सोशल मीडिया, आणि इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर वापर होणे. संवाद साधण्याचे माध्यम बदलले असून प्रत्यक्ष भेटीऐवजी ऑनलाइन चॅट आणि व्हिडिओ कॉलला प्राधान्य मोठ्या प्रमाणात दिले जाते.

2. शिक्षण आणि करिअर : कठोर स्पर्धा आणि करिअरबद्दलची असुरक्षितता यामुळे तरुणांमध्ये दबाव जाणवतो. उच्च शिक्षणासाठी स्थलांतर आणि वेगवेगळ्या संस्कृतीशी जुळवून घेण्याची गरज वाढली आहे. त्यामुळे मुलांमध्ये मोठे बदल होताना अनेकदा दिसून येतात.

3. आहाराच्या सवयी : फास्ट फूड, सोडा ड्रिंक्स, आणि प्रक्रिया केलेले पदार्थ यांचा वापर वाढला आहे. वेळेअभावी घरगुती आहाराला प्राधान्य कमी मिळत आहे. आणि त्याचा विपरीत परिणाम आरोग्यावर होता.

4. शारीरिक हालचालींचा अभाव : बैठे काम (ऑनलाइन अभ्यास किंवा वर्क फ्रॉम होम) यामुळे शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. फिटनेससाठी जिमला जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे, परंतु नियमित व्यायामाकडे अजूनही दुर्लक्ष होत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.

5. नातेसंबंध आणि सामाजिक आयुष्य : डिजिटल साधनांमुळे मैत्री आणि नात्यांमध्ये मोठे अंतर वाढले आहे. तरुणांमध्ये एकाकीपणा आणि मानसिक ताणतणाव जाणवतो. त्यामुळे आजच्या घडीला अनेक मुलांना एकटे राहावेसे वाटते.

6. डिजिटलायझेशनमुळे उद्भवलेले नकारात्मक परिणाम : सोशल मीडिया, गेमिंग, आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर जास्त वेळ घालवल्याने व्यसन वाढते. शारीरिक हालचाली कमी होऊन वेळेचा अपव्यय होतो.

समस्या सोडवण्यासाठी कोणते उपाय करावे :

1. मोबाईल / लॅपटॉप स्क्रीनपासून विश्रांती घ्या : ठराविक वेळेसाठी डिजिटल साधनांचा वापर कमी करा. आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत प्रत्यक्ष वेळ घालवा त्यातून तुम्हाला अनेक नवीन गोष्टींची माहिती मिळेल. एकटे पणा दूर होण्यास मदत होईल. वेळोवेळी स्क्रीनपासून विश्रांती घ्या आणि निसर्गाच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करा.

2. नियमित व्यायाम : चालणे, सायकलिंग, किंवा योग यासारख्या शारीरिक हालचालींचा अवलंब करा. किंवा एखादा चांगला मैदानी खेळ खेळा त्यातून देखील शरीराची हालचाल होईल.

3. संतुलित आहार : ताज्या भाज्या, फळे, आणि प्रथिनयुक्त आहारावर भर द्या. हिरव्या पालेभाज्या खा. घरी तयार केलेल्या अन्नाला जास्ती प्राधान्य द्या. तसेच बाहेरील जंक फूड खाण्याचे प्रमाण कमी करा.

4. बाहेर फिरायला (ट्रॅव्हलिंग करा) : मित्रांसोबत किंवा फॅमेलीसोबत बाहेर नवीन ठिकाणी फिरायला जा. बाहेरील जगाचा अनुभव घ्या.

5. झोपेचे चांगले नियोजन : दररोज ७-८ तास झोपेचे नियमन करा. चांगली झोप झाल्यास तुम्हाला फ्रेश वाटेल. नवीन काम करण्यासाठी उत्साह वाटेल.

6. वाचनाची आवडत निर्माण करा : रोज नवीन पुस्तके, वतर्मानपत्रे किंवा ग्रंथ वाचा. त्यातून देखील नवीन विषांयी माहिती मिळेल.

निष्कर्ष काय सांगतो :

बदलती जीवनशैली तरुणांना नवे अनुभव आणि सुविधा देते, पण त्याचबरोबर आव्हानांनाही आमंत्रित करते. या बदलांचा सकारात्मक फायदा घेण्यासाठी शारीरिक, मानसिक, आणि सामाजिक संतुलन राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

योग्य सवयी आणि विचारसरणी अंगीकारल्यास बदलत्या जीवनशैलीतील आव्हाने सोपी होऊ शकतात. पण त्यासाठी आपण स्वतः सकारात्मक राहणे आणि विचार करणे गरजेचं आहे. तसेच त्या गोष्टी आपल्या दैनंदिन आयुष्यात राबवणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. तसेच, तंत्रज्ञान आपल्याला मदत करण्यासाठी आहे, त्यामुळे त्याचा उपयोग विवेकाने आणि मर्यादेत करणेच योग्य!

Join our WhatsApp Channel

The post Youth & mental health Challenges : तरुणांमधील डिजिटलायझेशन, मानसिक आरोग्य आणि वेगवान जीवन…; असे करा तुमच्या अडचणींचे व्यवस्थापन appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar