आजकाल किडनी फेल होणे हा प्रकार बऱ्याचदा घडताना आपण ऐकतो. किडनी फेल होण्याने मनुष्याचा मृत्यु होते ही गंभीरच बाब आहे. तर ही किडनी खराब होण्यामागे किंवा किडनी फेल होण्यामागे नेमकी काय कारणे असू शकतात किंवा काय टाळले पाहिजे यासंर्भात आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. ( kidney failure symptoms )
नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात किडनी खराब होण्यामागील काही ठोस कारणांवर अभ्यास करण्यात आला त्यानुसार ही कारणे अगदी शुल्लक मात्र गंभीर ठरू शकतात असे लक्षात आले आहे. यामध्ये हाय बीपी उपचारात निष्काळजीपणा करणे, मुत्रविसर्जन टाळणे, अतिप्रमाणात मिठाचे सेवन करणे, मधुमेहाचे उपचार योग्यरितीने न करणे, दररोज 10 ग्लासापेक्षा कमी पाणी पिणे.
अति मात्रेत पेन किलरची औषधी घेणे, अति मात्रेत दारू पिणे, अतिमात्रेत मांसाहार करणे, शरीरास आवश्यक आराम न करणे, अतिप्रमाणात सोडा व इतर शीतपेयांचे सेवन करणे या काही कारणांमुळे किडनी खराब होण्याचा धोका जास्त प्रमाणात असतो. तेव्हा या काही गोष्टींवर विचार करून त्या टाळणे आरोग्याच्या हितासाठी आवश्यक आहे. ( kidney failure symptoms )