जिऱ्या, मोहरीची फोडणी व त्यात चरचरनारा कढीपत्ता मस्त खमंग वास सुटतो…. डाळ, आमटी, चटणी, कढी, फोडणी यात कढीपत्ता आवर्जून घातला जातो. पण काहीजण भाजीतला, आमटीमधला कढीपत्ता बाजूला काढून टाकतात. पण हे असा करणं चुकीचं….
1.कढीपत्त्यात कार्बोहैड्रेट, फायबर, कॅल्शिअम, फॉस्फिरस, आयर्न, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन इ असते.
2.कढीपत्ता खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते व ह्दयविकारांवर उपयोगी आहे.
3.कढीपत्ता नियमित खाल्याने मासिकपाळीच्या वेळी होणारा त्रास कमी होतो.
4.केसगळती, कोंडा, पांढरे केस या समस्यांवर कढीपत्ता गुणकारी आहे.
5.कढीपत्ता खाल्याने केस मजबूत होतात व केस गळती कमी होते.
6.रिंकल फ्री त्वचेसाठी कढीपत्ता खावा. गरम पाण्यात कढीपत्याची पाने उकळून पाणी घ्यावे. पिंपल्सचा त्रास ही कमी होतो.
7.कढीपत्त्यात अँटीऑक्सिडंट, अँटी बॅक्टरीअल, अँटी फंगल गुण आहेत.
8.कढीपत्त्यात आयर्न आणि फॉलिक ऍसिड असतात. गरोदरपणात महिलांनी कढीपत्ता खावा.
9.कढीपत्ता पचनशक्ती वाढवते व वेट लॉससाठी मदत होते.
10.कढीपत्त्याचे पाणी प्यायल्याने मुळव्याधीतून रक्त पडत असल्यास थांबते.
– डॉ. आदिती पानसंबळ आहारतज्ज्ञ, नगर