साहित्य : दोन मुळे, एक मोठा टोमॅटो, २ हिरव्या मिरच्या, मूठभर कोथिंबीर, मीठ, साखर चवीनुसार, अर्धा चमचा (मोहोरी जिरे), मोठा चमचाभर तेल, अधी- पाउण वाटी दही
कृती
शेंडा- बुडखा काढून, सोलून किसावे. टोमॅटो धुवून बारीक चिरून घ्यावा. कोथिवीर स्वच्छ धुवून बारीक चिरन घ्यावी. हिरव्या मिरचीचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत. एका मुळ्याचा कीस, चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर, दही, साखर, मीठ घालून व्यवस्थित कालवून घ्यावं.
एका कढल्यात तेल तापवून मोहोरी जिर्याची फोडणी फुलवावी यात हिरव्या मिरच्या जरा होऊ द्याव्यात आणि ही चळचळीत फोडणी कोशिबीरीवर ओतावी. मिसळून गार करत ठेवावी. कोशिंबीर फ्रिजात. जेवतेवेळी जरा गार कोशिंबीर चांगली लागते. विशेषतः दह्यातल्या कोशिंबीरी गार जास्त चवीष्ट लागतात.