पुणे – शरीरस्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी हृदय सक्षम असणे आवश्यक आहे; परंतु अनियमित आहार व अव्यवस्थित दिनचर्येमुळे उच्च रक्तदाब व कमी रक्तदाबाची समस्या वाढते. एखाद्याच्या शरीरात रक्तप्रवाहाचा दाब सामान्य अवस्थेपेक्षा कमी होतो, तेव्हा त्याला कमी रक्तदाब म्हणजेच लो ब्लड प्रेशर ((Low blood pressure) म्हणतात. सामान्यत: ब्लड प्रेशर (Low blood pressure) 120/80 एवढे असते.
या आजाराकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर त्याचा शरीरातील इतर भागांवर परिणाम होतो. शरीरात रक्तदाब कमी झाल्याने इतर अवयवांना पूर्णपणे रक्तपुरवठा होत नाही. अशा परिस्थितीत हृदय, किडनी, मेंदू अंशिक स्वरूपात किंवा पूर्णपणे काम करणे बंद करू शकतात. लो ब्लड प्रेशर (Low blood pressure) झाल्यास लगेच हे उपाय करणे आवश्यक आहे.
तुळस :
तुळशीतील विटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम यासारखे तत्त्व मेंदूला संतुलित करून तणाव दूर करतात. तुळशीची 10-12 पाने मधात मिसळून खाल्ल्यास ब्लड प्रेशरच्या (Low blood pressure) समस्येवर आराम मिळतो.
लिंबाचा रस :
लिंबाचा रस उच्च रक्तदाबासाठी उपयोगी आहे. यासोबतच हा कमी रक्तदाबासाठी देखील उपयोगी आहे. लिंबाच्या रसात थोडेसे मीठ व साखर मिसळून प्या. यामुळे शरीराला ऊर्जा मिळेल.
मिठाचे पाणी :
मिठातील सोडिअम ब्लड प्रेशर वाढवण्याचे काम करते. मीठ अगदी जास्तदेखील देऊ नये. एक पेला पाण्यात चमचाभर मीठ पुरेसे आहे.
कॅफिन :
ब्लड प्रेशर (Low blood pressure) कमी झाल्यास, स्ट्रॉंग कॉफी, हॉट चॉकलेट किंवा कॅफिनयुक्त पदार्थाचे सेवन केल्यास रक्तदाब सामान्य होतो. नेहमी लो ब्लड प्रेशरचा त्रास असणाऱ्यांनी रोज सकाळी एक कप कॉफी प्यायला हवी; परंतु, यासोबत काहीतरी खायला विसरू नका.
बेदाणे :
रात्री 20-30 बेदाणे भिजवून सकाळी उपाशीपोटी खाल्ल्यास लो ब्लड प्रेशरसाठी (Low blood pressure) फायदा होतो. बेदाण्याचे भिजवलेले पाणीदेखील तुम्ही पिऊ शकता. अशा प्रकारे घरातच नेहमी उपलब्ध असलेले पदार्थ वापरुन लो ब्लड प्रेशरवर मात करता येते. त्यासह वजन अचूक ठेवणे, दररोज व्यायाम करणे, चालणे, अर्थात डॉक्टरी सल्ल्यानुसारच, आणि आहारावर योग्य लक्ष ठेवले, तर लो ब्लड प्रेशर नॉर्मलला यायला मदत होते, हे नक्की.