योगाभ्यास एक असा विधी आहे ज्यामध्ये आरोग्यासह मानसिक आणि आध्यात्मिक विकाससुद्धा होतो. यामुळे अनेक रोगांमध्ये एकाचवेळी लाभ होऊ शकतो. कोरोना काळात निरोगी राहण्यासाठी हे उत्तम माध्यम आहे. या अनेक आजारांपासून वाचायचे असेल आणि कोरोनाशी लढायचे असेल तर स्वत:ला अंतर्गतदृष्ट्या मजबूत ठेवले पाहिजे. अंतरराष्ट्रीय योग सप्ताहात आज आपण जाणून घेवूयात.
प्राणायामाचे काही फायदे :
१. ताण कमी करण्यासाठी मदत
२. रक्तदाब कमी करते
३. वजन कमी करण्यास मदत
४. अस्थमाची लक्षणे घालवते
५. स्वायत्त प्रक्रिया सुधारते
६. चित्त शांत राहाते आणि जीवनाप्रती व त्याहीपलिकडे जाऊन कक्षा रुंदावते.
प्राणायामाचे विविध प्रकार:
१. उज्जयी श्वास
या प्रकारामुळे तुम्हाला आतून आणि बाहेरून उष्णता मिळते. या प्रकारामुळे स्मरणशक्ती वाढते आणि शरीराला शिस्त लागते. या श्वसनप्रकारामुळे कानाचा पातळ पडदा आणि शरीराचे अवयव अधिक बळकट होतात. तसेच तुमचे चित्त अधिक चांगले केंद्रीत होते आणि शरीरांतर्गत उष्णता वाढण्यास मदत होते.
२. कपालभाती
कपालभाती केल्यामुळे शरीरातील कार्बन डायऑक्साइड बाहेर काढला जातो आणि शरीरात ऊर्जा निर्माण होते. ज्या लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत आहे अशांनी कपालभाती करण्यापूर्वी योग प्रशिक्षकाला भेट द्यावी आणि कपालभातीचे योग्य तंत्र समजून घ्यावे.
३. सूर्यभेद प्राणायाम
उजव्या नाकपुडीद्वारे हा प्रकार करायचा आहे. यामुळे शरीरात अधिक उष्णता निर्माण होते आणि पचनशक्तीही सुधारते. पोटाचे आरोग्य सुधारणे आणि चयापचय क्रिया सुधारणे यासाठी हा प्राणायाम प्रकार अतिशय उपयुक्त आहे.
४. भास्तिका प्राणायाम
या प्राणायामाच्या प्रकारामुळे तुमच्या फुप्फुसांमध्ये ताकद निर्माण होते. तसेच विविध संसर्ग, अस्थमा आणि श्वसनासंबंधितील आजारांशी दोन हात करण्यासाठी मदत होते. थंडीच्या दिवसांमध्ये हा प्राणायाम केल्याने तुमच्या शरीरात आवश्यक उष्णता निर्माण होते आणि तुमची प्रतिकासशक्ती सुधारते आणि शरीरातील टॉक्सिन्स काढून टाकण्यास मदत होते.
५. अनुलोम विलोम
या प्रकारचा प्राणायाम केल्यामुळे ब्राँकायटिस, अस्थमा आणि यासारखे अन्य श्वसनासंबंधातील सर्व प्रश्न सोडवण्यास मदत होते. यामुळे फुप्फुसांचे आरोग्य सुधारते आणि स्मरणशक्तीही सुधारते आणि ताणाचे व्यवस्थापन करता येते. अनुलोम विलोममुळे प्रतिकारशक्ती सुधारते आणि कफ व पडसेही बरे होते.
ताणमुक्त होणे, रिलॅक्स होणे आणि नैराश्य कमी करणे यांसारख्या अन्य फायद्यांसाठी प्राणायाम हे सर्वोत्तम तंत्र आहे. अशा प्रकारची तंत्र सुरू करण्यापूर्वी योग प्रशिक्षकाला भेट द्या व तुमच्या प्रकृतीनुसार त्यांचा सल्ला घ्या.