सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढले आहे. पण, या आजारांचा उपचारही महागला आहे. योगामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवून कुठल्याही रोगावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. कारण, योगासनांमुळे शरीरांतर्गत प्रक्रियांमध्ये सुधारणा घडून येतात आणि मेंदूची क्षमता वाढते. मानसिक आरोग्यावरही त्याचा अनुकूल परिणाम होतो.
नैराश्य, ऑटिझमसारख्या मानसिक समस्यांवरही योगासने दुसऱ्या कुठल्याही औषधांपेक्षा जास्त प्रभावी आहेत, असे योगाभ्यासकांचे म्हणणे आहे. लहान वयातच योगाचे धडे घेणे अत्यंत लाभदायक आहे. लहान मुलांसाठी योगाचे 9 फायदे –
1) बौद्धिक क्षमता वाढेल
2) अभ्यासात मन एकाग्र होईल. स्मरणशक्ती वाढेल.
3) रोगप्रतिकारशक्ती वाढेल.
4) रक्तदाब नियंत्रित राहील
5) वजन नियंत्रणात राहू शकेल.
6) मुले आजारी पडणार नाहीत व आनंदी राहतील.
लहान मुलांना आधीपासूनच जर योगासनांची सवय आणि आवड लावली तर, त्यांना अभ्यासात आणि भविष्यात नक्कीच फायदा होईल. लहान मुलांना प्राणायम, पोट हलवणं, श्वासोच्छवास चांगल्या पद्धतीने करणं असे प्रकार शिकवले पाहिजेत.
लहान मुलांच्या दप्तराचे ओझे त्यांच्या वजनाचे एवढे असते. अगदी पहिल्या इयत्तेतील विद्यार्थीसुद्धा यातून सुटलेले नाहीत. तणाव नियंत्रणाचा योग विषयात अगदी मुळापासून विचार करण्यात आला आहे. त्यामुळे आयुष्यात योगाच्या माध्यमातून तणावाचे नियोजन करणे सहज शक्य आहे.
The post yoga day 2023 : लहान मुलांसाठी योगसाधनेचे महत्त्व काय? अशी करा योगसाधनेला सुरुवात…. appeared first on Dainik Prabhat.