मुंबई – शारीरिक व मानसिक आरोग्य टिकून राहावे त्यासाठी नियमित योगासने करण्याचा सल्ला अनेक योगाभ्यासक देतात. रोग निवारणाच्या या पद्धतीला 2014 सालापासून आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळालेली आहे. संयुक्त राष्ट्राने 2015 पासून 21 जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
भारताच्या नेतृत्वाखालील 175 देशांच्या प्रतिनिधींकडून हा प्रस्ताव करण्यात आला होता. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 साली सप्टेंबरमध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतही हा प्रस्ताव मांडला होता.
त्याला तीन महिन्यांनंतर मान्यता देण्यात आली आहे. या प्रस्तावात योगासनांचे फायदे आणि त्याचे आरोग्यावरील परिणाम यांचे विस्तृत विवेचन करण्यात आलेले आहे.
दरम्यान, याच दिवसाचे औचित्य साधत आज देशभरात मोठ्या प्रमाणात योग दिवस साजरा करण्यात आला आहे.
भारतातील कानाकोऱ्यात आज योगा बद्दल जनजागृती करण्यात आली असल्याचं दिसून आलं. 21 जून रोजीचा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वात मोठा दिवस असतो.
The post Yoga Day 2023 : देशभरात योगदिन उत्साहात साजरा; पाहा खास फोटो… appeared first on Dainik Prabhat.