Thursday, May 14, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

World suicide prevention day: “जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन : मानसिक आरोग्याला प्राधान्य द्या”

by
September 11, 2025
in लाईफस्टाईल
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

World suicide prevention day: आत्महत्या ही आजच्या काळातील गंभीर सामाजिक समस्या बनली आहे. दरवर्षी १० सप्टेंबर रोजी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन साजरा केला जातो. या दिवशी समाजात मानसिक आरोग्य, आत्महत्येमागील कारणे आणि अशा टोकाच्या निर्णयांना टाळण्यासाठी व्यक्ती व समाजाची भूमिका याबाबत जनजागृती केली जाते.

आत्महत्यानंतरची हळहळ आणि वास्तव

एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केल्यानंतर समाजात हळहळ व्यक्त केली जाते.
“त्याने/तिने आधी बोललं असतं तर… मदत मागितली असती तर… कुटुंबाचा विचार का केला नसेल?” असे प्रश्न अनेकदा ऐकायला मिळतात. मात्र, असे प्रश्न विचारण्याआधी खरचं बदल घडवायचा असेल तर आधीच संवेदनशीलता दाखवून योग्य वेळी मदत करणे गरजेचे आहे.

मानसिक त्रासाचे लक्षण आणि कारणे

आत्महत्येमागील कारणे विविध असू शकतात. त्यामुळे आपण लक्षात ठेवायला हवं की, केवळ आर्थिक ताण, नोकरीचा दबाव किंवा वैयक्तिक नातेवाईकांच्या समस्याच नाहीत, तर बॉडी शेमिंग, जजमेंट किंवा एखाद्या व्यक्तीच्या भावनांवर टॅग लावणे, त्याला छोटं/कमी समजणे यामुळेही मानसिक ताण निर्माण होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीने आपलेपणाने काहीतरी सांगितले आणि समोरचा व्यक्तीने त्याला जज केले किंवा टॅग लावले, तर ती समोरची व्यक्ती आपुलकीची अपेक्षा करत असतानाही निराशा अनुभवते आणि त्या व्यक्तीचा मानसिक ताण वाढतो.

मानसिक आरोग्याबाबत सजग राहण्यासाठी प्रत्येकाने स्वतःला काही प्रश्न विचारले पाहिजेत:

-आपल्या कुटुंबात, मित्रपरिवारात किंवा सहकाऱ्यांमध्ये कुणी मानसिक त्रासातून जात आहे का?

-त्या व्यक्तीस मोकळेपणाने बोलण्याची सुरक्षित जागा आपण देतो का?

-त्यांच्या भावना न जज करता ऐकतो का?

-कठीण चर्चांसाठी आपण स्वतः उपलब्ध राहतो का, की टाळतो?

या प्रश्नांची उत्तरे सकारात्मक असणे आवश्यक आहे, असे मानसशास्त्रज्ञांचे मत आहे.

स्वतःच्याही मानसिक आरोग्याची जबाबदारी

-इतरांची काळजी घेण्यासोबतच स्वतःच्या मानसिक आरोग्याची जबाबदारी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

-आजूबाजूला आपल्याला समजून घेणारी माणसं आहेत का?

-नसतील तर आपण स्वतः सामाजिक आधार तयार करण्यासाठी प्रयत्न करतो का?

-आयुष्यात गोंधळ किंवा तणाव वाढला तर आपण मदत मागतो का?

-गरज पडल्यास काउंसिलिंग, थेरपी किंवा व्यावसायिक सल्ला घेण्यास तयार आहोत का?

संवाद, समजूतदारपणा आणि आधाराचे महत्त्व

आत्महत्या टाळण्यासाठी केवळ हळहळ व्यक्त करणे किंवा दोषारोप करणे पुरेसे नाही. संवाद साधणे, समजूतदारपणा दाखवणे आणि योग्य वेळी भावनिक आधार देणे हेच प्रभावी उपाय आहेत. कधी कधी फक्त शांतपणे ऐकणे किंवा दुःख समजून घेणेही जीवन वाचवू शकते. एखाद्यावर बॉडी शेमिंग करणे किंवा जजमेंट दाखवणे मानसिक ताण वाढवते आणि ही देखील गंभीर समस्या आहे.

मानसिक आरोग्य ही केवळ वैयक्तिक जबाबदारी नाही, तर सामाजिक जबाबदारीदेखील आहे. प्रत्येक आयुष्य मौल्यवान आहे. आत्महत्या टाळण्यासाठी व्यक्ती, कुटुंब आणि समाजाने मिळून प्रयत्न करणे आवश्यक आहे. आजच्या जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनी ही जाणीव खऱ्या अर्थाने समाजात रुजवण्याची गरज आहे.

 

Join our WhatsApp Channel

The post World suicide prevention day: “जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन : मानसिक आरोग्याला प्राधान्य द्या” appeared first on Dainik Prabhat.

“}]]

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar