Thursday, September 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

World Rat Day: लहानसा उंदीर, पण जगभर सत्ता! ‘वर्ल्ड रॅट डे’ निमित्त जाणून घ्या भन्नाट गोष्टी!

by
April 4, 2026
in लाईफस्टाईल
A A
World Rat Day: लहानसा उंदीर, पण जगभर सत्ता! ‘वर्ल्ड रॅट डे’ निमित्त जाणून घ्या भन्नाट गोष्टी!
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

World Rat Day: दरवर्षी ४ एप्रिल रोजी वर्ल्ड रॅट डे साजरा केला जातो. घरात उंदीर दिसला की आपण लगेच त्याला हाकलण्याचा प्रयत्न करतो, पण या छोट्या प्राण्यांचा इतिहास आणि महत्त्व खूप मोठं आहे. जगभर पसरलेल्या उंदरांची कहाणी खूपच रंजक आहे.

शास्त्रज्ञांच्या मते उंदीर यांची उत्पत्ती मध्य किंवा उत्तर चीनमध्ये झाली. तिथून हळूहळू ते इतर भागांत पसरले. पण ते जगभर कसे पोहोचले, हा प्रश्न अनेकांना पडतो. याचे उत्तर प्राचीन व्यापार आणि समुद्री प्रवासात दडलेले आहे.

पूर्वी व्यापारी मोठ्या जहाजांमधून एका देशातून दुसऱ्या देशात माल वाहतूक करत असत. त्या वेळी उंदीर अन्नधान्य, लाकडी पेट्या किंवा सामानामध्ये लपून जहाजांवर चढत असत. त्यामुळे ते नकळत जगभर फिरले. व्यापार वाढत गेला तसतसे उंदीरही युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या खंडांपर्यंत पोहोचले.

१८व्या शतकात समुद्री व्यापार जोरात असताना उंदरांची संख्या झपाट्याने वाढली. विशेषतः ब्लॅक रॅट आणि ब्राउन रॅट या जातींनी जगभर आपले जाळे पसरवले. उंदरांची प्रजनन क्षमता खूप जास्त असल्यामुळे त्यांची संख्या लवकरच लाखों-कोटींमध्ये पोहोचली.

उंदरांबद्दल काही आश्चर्यकारक गोष्टीही आहेत. उंदरांना गुदगुल्या केल्यावर ते एक खास प्रकारचा आवाज काढतात, जो हसण्यासारखा असतो. त्यांच्या दातांची वाढ आयुष्यभर चालू असते, त्यामुळे ते सतत काहीतरी कुरतडत राहतात. कधी कधी ते लोखंडी तारा किंवा पाईप्सही कुरतडतात, ज्यामुळे शॉर्ट सर्किट होऊ शकते.

उंदरांची स्मरणशक्तीही खूप तीक्ष्ण असते. ते एकदा एखादा रस्ता ओळखला की तो विसरत नाहीत. त्यामुळे प्रयोगशाळांमध्ये विविध संशोधनासाठी त्यांचा वापर केला जातो. विशेष म्हणजे, उंदीर काही वेळा पाण्याशिवायही जास्त काळ जगू शकतात.

उंदीर हे सामाजिक प्राणी आहेत. ते आपल्या साथीदारांच्या भावना ओळखू शकतात. एकटे राहिल्यास त्यांना तणाव किंवा नैराश्यही येऊ शकते, असे संशोधनातून दिसून आले आहे.

वर्ल्ड रॅट डे साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे उंदरांबद्दलची नकारात्मक प्रतिमा बदलणे. २००२ साली या दिवसाची सुरुवात झाली. अनेक लोक उंदरांना पाळीव प्राणी म्हणूनही ठेवतात. विज्ञान क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान आहे. औषधनिर्मिती आणि वैद्यकीय संशोधनात अनेक प्रयोग प्रथम उंदरांवरच केले गेले आहेत, ज्यामुळे मानवजातीला मोठा फायदा झाला आहे.

तरीही, सामान्य जीवनात उंदीर हे त्रासदायक मानले जातात. ते अन्नधान्य खराब करतात आणि आजार पसरवू शकतात. त्यामुळे लोक त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात.

एकूणच, उंदीर हा छोटा प्राणी असला तरी त्याचा प्रभाव आणि भूमिका खूप मोठी आहे. वर्ल्ड रॅट डे निमित्त या प्राण्यांविषयी जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न केला जातो.

“}]]

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar