[[{“value”:”
– (डॉ. जगदीश शिंदे, असोसिएट डायरेक्टर, रेडिएशन ऑन्कोलॉजी, आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल, पुणे)
World No Tobacco Day : डॉक्टर, मी फक्त दोनच सिगारेट ओढतो. सुरुवात नेहमीच लहान प्रमाणात होते, तणाव कमी करण्यासाठी, सामाजिक प्रसंगात, किंवा केवळ सवयीने. पण तंबाखूला प्रमाणाची पर्वा नसते. त्याला फक्त तुमच्यात टिकून राहायचे असते.
प्रत्येक वर्षी ३१ मे रोजी ‘जागतिक तंबाखू निषेध दिना’ निमित्त, आपण कर्करोग, हृदयरोग आणि अकाली मृत्यू यांसारख्या गंभीर धोक्यांबाबत जागरूकता निर्माण करतो. पण या इशाऱ्यांपलीकडे जाऊन एक महत्त्वाचा प्रश्न विचारणं आवश्यक आहे, तंबाखू सोडणं इतकं कठीण का असतं? आणि त्यातून मुक्त होण्यासाठी तुम्ही काय करू शकता?
तंबाखू इतकं व्यसनी का असतं?
उत्तर आहे निकोटीन – एक रसायन जे मेंदूतील ‘डोपामिन’ नावाच्या आनंददायक हार्मोनची निर्मिती वाढवून तात्पुरता सुखद अनुभव देतो. ही आनंदाची लहर मेंदूला पुन्हा पुन्हा सिगारेटची गरज वाटू लागते.
हळूहळू मेंदू निकोटिनसाठी अधिक रिसेप्टर्स तयार करतो, आणि सवय व्यसनात बदलते. निकोटिनची पातळी कमी झाली की चिडचिड, अस्वस्थता आणि तीव्र ओढ यांसारखी लक्षणं दिसू लागतात आणि तंबाखू सोडणं अधिक कठीण होतं.
खरं नुकसान: तुमचं आरोग्य :
आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमध्ये आम्ही दररोज तंबाखूमुळे झालेल्या गंभीर आरोग्य समस्यांचा साक्षीदार होतो. विशेषतः तरुणांमध्ये, जे तंबाखूचे धोके कमी लेखतात.
तोंडाचा, घशाचा, आणि फुफ्फुसांचा कर्करोग हे सर्व तंबाखूमुळे होतात आणि हे आजार तरुणांमध्येही वाढताना दिसत आहेत. फक्त कर्करोगच नाही, तर तंबाखू रक्तवाहिन्यांवरही गंभीर परिणाम करतो, ज्यामुळे हृदयरोग व स्ट्रोकचा धोका वाढतो. हे आजार हल्ली तरुणांमध्येही दिसू लागले आहेत.
तंबाखूच्या सेवनामुळे COPD (क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव पल्मोनरी डिसीज) सारख्या श्वसनविकारांचीही शक्यता वाढते, जे जीवनाची गुणवत्ता गंभीरपणे कमी करतात.
एक सिगारेट आयुष्याचे सुमारे २० मिनिटे कमी करते हा विचार पुरेसा आहे तरुणांनी आज घेतलेल्या निर्णयाचे भविष्यावर होणारे परिणाम समजून घेण्यासाठी. तंबाखू लोकांना फक्त मारत नाही, तो त्यांचं जगणंही दू:खी करतो.
लपलेले धोके: फक्त फुफ्फुसांपुरते मर्यादित नाही :
अनेकांना वाटतं की तंबाखू फक्त फुफ्फुसांवर परिणाम करतो, पण वास्तव वेगळं आहे. तंबाखू रोगप्रतिकारक शक्ती कमी करतो, त्यामुळे संसर्गांपासून बरे होणं कठीण होतं. तो त्वचेचे वृद्धत्व लवकर घडवतो सुरकुत्या, कोरडेपणा आणि तेज हरवलेली त्वचा विशेषतः तरुणांना हे परिणाम कळत नाहीत.
गर्भधारणेदरम्यान तंबाखूचे सेवन आई आणि बाळासाठी गंभीर धोके निर्माण करते अकाली बाळंतपण, कमी वजन आणि विकासातील अडथळे यांसारखे. सकारात्मक दृष्टीकोन तंबाखू सोडण्यासाठी आणि कायमस्वरूपी मुक्त होण्यासाठी सुरुवात करा ठराविक तारखेला सोडण्याचा संकल्प करून.
ती तारीख कॅलेंडरवर मार्क करा आणि तुमच्या कुटुंबीयांना, मित्रांना सांगा त्यामुळे जबाबदारीची जाणीव राहते आणि पाठिंबा मिळतो. ज्या गोष्टी तुम्हाला तंबाखू ओढायला प्रवृत्त करतात तणाव, सामाजिक प्रसंग, सवयी त्या ओळखा आणि त्याला पर्यायी, आरोग्यदायी सवयी लावा. व्यावसायिक समुपदेशन आणि सपोर्ट ग्रुप्स तुमचं यशाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवू शकतात.
निकोटिन पॅच, च्युइंग गम, किंवा लोजेंजेससारखी साधनं वापरून तीव्र ओढ कमी करता येते विशेषतः जेव्हा त्यासोबत वर्तणूक सुधारणा (behavioral therapy) केली जाते. चुकणं हा प्रक्रियेचा भाग आहे. परतपणा होतोच, पण प्रत्येक प्रयत्न तुम्हाला मुक्ततेच्या एक पाऊल जवळ घेऊन जातो.
तंबाखू सोडण्याच्या प्रक्रियेत जवळच्यांचा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा आहे:
• समजून घ्या आणि पाठिंबा द्या: टीका न करता सकारात्मक reinforcement द्या.
• प्रत्येक टप्पा साजरा करा: छोटा असला तरी प्रत्येक यश साजरं करा.
• संयम ठेवा: लक्षात ठेवा की ही एक प्रक्रिया आहे चढ-उतार असतीलच.
संपूर्ण आरोग्याच्या दिशेने एक पाऊल टाका आजच तंबाखू सोडा आणि निरोगी जीवनाची सुरुवात करा.
The post World No Tobacco Day : ‘तंबाखूचं व्यसन’ का होतं, कसं मोडायचं आणि आरोग्य वाचवायचं? पाहा डॉक्टर काय सांगतात…… appeared first on Dainik Prabhat.
“}]]
