भारतातील 2.5 कोटी महिलांना आहे एण्डोमेट्रिऑसिस, तरीही त्याबद्दल चर्चा क्वचितच होते.
मार्च हा एण्डोमेट्रिऑसिस जागरूकता महिना आहे; महिलांना अशक्त करणारा हा आजार आहे, ज्यावर उपचार करणे कठीण असते. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा…
एण्डोमेट्रिऑसिस या आजारात गर्भाशयाच्या अस्तरावरील ऊतीसारखी ऊती गर्भाशयाच्या पोकळीच्या बाहेरपर्यंत वाढते आणि त्याचे कारण अज्ञात आहे. तुम्हाला माहीत आहे का?
गर्भाशयाच्या अस्तराला एण्डोमेट्रिअम म्हणतात. जेव्हा या अस्तरावरील ऊती ओव्हरीज, आतड्यांवर आणि श्रोणीभागाच्या अस्तरावर वाढतात तेव्हा एण्डोमेट्रॉसिस होतो. त्याचप्रमाणे मासिक पाळीमधील संप्रेरकांमधील बदलांमुळे असाधारण वाढ झालेल्या एण्डोमेट्रिअल ऊतींवर परिणाम होतो. त्यामुळे त्या जागी सूज येते आणि वेदना होतात. याचा अर्थ हा की, ऊतीचा वाढ होऊन ती तुटणार आहे. कालांतराने या तुटलेल्या ऊतीला बाहेर पडण्यासाठी कोणताही मार्ग नसतो आणि ती ऊती श्रोणीभागात अडकते. त्याचप्रमाणे गर्भाशयाच्या बाहेर वाढणाऱ्या एण्डोमेट्रिअल ऊतीला एण्डोमेट्रिअल इम्प्लांट असे म्हणतात.
त्याचप्रमाणे, एण्डोमेट्रिऑसिस सोसायटी ऑफ इंडियाच्या अंदाजानुसार भारतातील 2.3 कोटी महिलांना हा वेदनादायक आजार असतो. पण त्याविषयी क्वचितच चर्चा होते आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. कदाचित मासिक पाळीबद्दल असलेला अवघडलेपणा व गैरसमज यामुळे असे होत असावे.
या सर्वसामान्यपणे होणाऱ्या आजारामुळे महिलांची परिस्थिती बिकट होते. कारण या परिस्थितीत सूज येते, भेगा पडतात, गर्भधारणा करणे कठीण होते आणि मासिक पाळी वेदनादायी असते. त्यामुळे वेळीच वैद्यकीय उपचार करून हा आजार हाताळणे आवश्यक असते.
एण्डोमेट्रिऑसिसचे टप्पे
या आजाराची टप्प्यांमध्ये
ख – सूक्ष्म,
खख – सौम्य,
खखख – मध्यम स्वरुपाचा,
खत – गंभीर
अशी विभागणी करता येऊ शकते. एण्डोमेट्रिऑसिस इम्प्लांट्सचे स्थान, व्याप्ती आणि खोली, त्याचप्रमाणे स्कार टिश्यूचे (भेगाळलेली ऊती) अस्तित्व व आकार यावरून हा टप्पा निश्चित होत असतो.
एण्डोमेट्रिऑसिसची लक्षणे
प्रत्येक व्यक्तीनुसार ही लक्षणे बदलू शकतात. काही महिलांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येतात तर काहींमध्ये मध्यम स्वरुपाची लक्षणे दिसून येतात. काही वेळा एखाद्या महिलेला गंभीर स्वरुपाचा आजार असू शकतो, पण किमान अस्वस्थता वाटू शकते.
त्यामुळे श्रोणीभागात वेदना होत असतील, मासिक पाळीमध्ये वेदना होत असतील आणि मासिक पाळीच्या आधी आणि मासिक पाळीदरम्यान ओटीपोटाच्या खालील भागात वेदना होत असेल, मासिक पाळीच्या एक-दोन आठवडे आधी गोळे येत असतील, लैंगिक संबंधांनंतर वेदना होत असतील, मलविसर्जन करताना अस्वस्थता जाणवत असेल, मासिक पाळीदरम्यान पाठीच्या खालील भागात वेदना होत असतील तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरकडे गेले पाहिजे. ही वेदना कशामुळे होत आहे, याबद्दल डॉक्टर तुम्हाला निश्चित माहिती देऊ शकतील.
उपचार काय आहेत?
एण्डोमेट्रिऑसिस पूर्ण बरा करता येत नाही, पण योग्य उपचारांनी त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. वेदनेचे व्यवस्थापन करणारी औषधे, हॉर्मोन थेरपी, लॅपरोस्कोपी, किमान छेद देऊन करण्यात येणारी शस्त्रक्रिया यांनी उपचार करता येऊ शकतात किंवा हिस्टरेक्टॉमी हा शेवटचा उपचार असू शकतो. यात डॉक्टर गर्भाशय आणि सर्व्हिक्स काढून टाकतात. एण्डोमेट्रिऑसिसच्या टप्प्यानुसार डॉक्टर तुम्हाला उपचार सुचवितात. डॉक्टरांशी चर्चा करून तुम्ही या आजारावर नियंत्रण मिळवू शकता.
तात्पर्य :
शरीरात होणाऱ्या बदलांवर लक्ष ठेवण्यासाठी नियमित चाचण्या करून घ्याव्या. त्याचप्रमाणे डॉक्टरांच्या सल्ल्याविना कोणतीही औषधे घेऊ नका. त्यामुळे जोखीम वाढू शकते. त्याचप्रमाणे या आजाराची माहिती समजून घ्या.
– डॉ, माधुरी बुरांडे लाहा