पुणे – हातपाय दुखणे, पिकलेले केस, चेहऱ्यावर सुरकुत्या येणे ही सगळी वय झाल्याची लक्षणे आहेत असे आपण म्हणू शकतो. आता तुमचे वय झाले आहे हे बऱ्याचदा तुमचा चेहराच इतरांना सांगत असतो. वय वाढत असताना चेहऱ्यावरून जाणवणाऱ्या या गोष्टी तुम्ही लपवू शकता का.. नाही ना.. पण आहे एक उपाय.
आहारातील मसीफ व्हिटॅमिनचे सेवन तुमचे सौंदर्य अबाधित ठेऊ शकते. नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात हे सिद्ध झाले आहे. ( vitamin c benefits ; wrinkles on the face natural remedies)
आहारात व्हिटॅमिन सी चे सेवन करणे हे आरोग्याच्या दृष्टीने जसे फायदेशीर आहे तसेच ते त्वचा निरोगी ठेऊन सौंदर्य अबाधित राखण्यासाठीही फायदेशीर ठरते.
शरीराला आकर्षक आणि तरूण बनवणाऱ्या काही पेशी आपल्या शरीरात असतात. वाढत्या वयाबरोबर या पेशी कमकुवत होऊ लागतात.( vitamin c benefits ; wrinkles on the face natural remedies )
व्हिटॅमिन सी हे शरीरातील या पेशींमध्ये मिसळते. ते पेर्शीमध्ये मिसळून त्या पेशींना बळ प्रदान करण्याचे कार्य करते. त्यामुळे या पेशी जास्त काळ मजबुत राहून आपले कार्य जास्त काळ पार पाडतात. यांसंदर्भात संशोधकांनी काही उंदरांवर हा प्रयोग करून पाहिला आणि तो यशस्वी झाला. .( vitamin c benefits ; wrinkles on the face natural remedies )