Monday, June 8, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Women Health: पीसीओएसचं नाव आता पीएमओएस! महिलांच्या या आजाराचं नाव का बदललं? जाणून घ्या संपूर्ण कारण

by
May 15, 2026
in लाईफस्टाईल
A A
Women Health: पीसीओएसचं नाव आता पीएमओएस! महिलांच्या या आजाराचं नाव का बदललं? जाणून घ्या संपूर्ण कारण
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Women Health: महिलांमध्ये वाढत्या प्रमाणात दिसणाऱ्या हार्मोनल समस्यांपैकी एक म्हणजे पीसीओएस. अनेक वर्षांपासून या आजाराला ‘पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम’ म्हणजेच PCOS या नावाने ओळखलं जात होतं. मात्र आता या आजाराचं नाव बदलून PMOS म्हणजे ‘पॉलीएंडोक्राइन मेटाबॉलिक ओव्हेरियन सिंड्रोम’ असं करण्यात आलं आहे. तज्ज्ञांच्या मते, जुनं नाव या आजाराचं खरं स्वरूप पूर्णपणे स्पष्ट करत नव्हतं.

आज जगभरात सुमारे १७ कोटी महिला या समस्येचा सामना करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे त्यातील अनेक महिलांना अजूनही आपल्याला हा आजार आहे हे समजलेलं नाही. त्यामुळे या आजाराबाबत जागरूकता वाढवण्यासाठी आणि योग्य उपचार समजण्यासाठी नाव बदलण्याचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.  (Women Health)

तज्ज्ञांच्या मते, PCOS या नावातील ‘पॉलीसिस्टिक’ हा शब्दच चुकीचा समज निर्माण करणारा होता. कारण या आजारात प्रत्येक महिलेला ओव्हरीमध्ये सिस्ट तयार होतातच असं नाही. अनेक वेळा स्कॅनमध्ये दिसणाऱ्या गोष्टी या पूर्ण विकसित न झालेल्या फॉलिकल्स किंवा अंडी असतात. हार्मोनल असंतुलनामुळे ती व्यवस्थित विकसित होत नाहीत. त्यामुळे हा फक्त ओव्हरीपुरता मर्यादित आजार नसून संपूर्ण शरीरावर परिणाम करणारी स्थिती आहे.

PMOS या नव्या नावातील प्रत्येक शब्दाचा विशेष अर्थ आहे. ‘पॉलीएंडोक्राइन’ म्हणजे शरीरातील अनेक हार्मोन सिस्टिम्सवर परिणाम होणं. या समस्येमुळे इन्सुलिन, टेस्टोस्टेरॉन आणि इतर हार्मोन्समध्ये बदल होतात. ‘मेटाबॉलिक’ हा शब्द शरीराच्या चयापचयाशी संबंधित आहे. वजन वाढणं, इन्सुलिन रेझिस्टन्स आणि मधुमेहाचा धोका याच्याशी याचा संबंध असतो. ‘ओव्हेरियन’ हा शब्द अंडाशयाशी संबंधित बदल दाखवतो, तर ‘सिंड्रोम’ म्हणजे प्रत्येक व्यक्तीत वेगवेगळी लक्षणं दिसणारी स्थिती.  (Women Health)

या आजारामुळे महिलांना अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. वजन वाढणं, इन्सुलिन रेझिस्टन्स, मासिक पाळी अनियमित होणं, वंध्यत्व, मानसिक ताण, नैराश्य आणि स्ट्रोकचा धोका वाढणं अशा समस्या दिसून येतात. त्यामुळे हा फक्त स्त्रीरोग नसून संपूर्ण आरोग्यावर परिणाम करणारा विकार मानला जातो.  (Women Health)

तज्ज्ञांच्या मते, नाव बदलल्यामुळे मेडिकल शिक्षण, जनजागृती मोहिमा, संशोधन आणि निदान प्रक्रिया अधिक प्रभावी होऊ शकते. यामुळे महिलांना त्यांच्या लक्षणांबद्दल अधिक स्पष्ट माहिती मिळेल आणि वेळेवर उपचार घेणं सोपं होईल. मानसिक आरोग्य आणि मेटाबॉलिक समस्यांवरही अधिक लक्ष दिलं जाईल.

या समस्येपासून बचावासाठी जीवनशैलीत बदल करणं खूप गरजेचं आहे. नियमित व्यायाम, पुरेशी झोप, संतुलित आहार, वजन नियंत्रण आणि ताण कमी ठेवणं यामुळे PMOS नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.

“}]]

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar