1. उन्हाळयाच्या दिवसांत फ्रेमच्या चारी बाजूला रॅप असणारे चष्मे वापरावेत. ( winter eye care tips in marathi )
2. अल्ट्राव्हायोलेट किरणं पाणी तसंच बर्फावरून सर्वात जास्त परावर्तित होतात. वॉटर स्पोर्टस खेळणा-यांनी युव्ही कोटेड गॉगल्सचा वापर करावा. न केल्यास डोळे लाल होऊ शकतात. डोळयांतून सतत पाणी येतं. कॉर्लियावर परिणाम होतो.
3. सायकल चालवणं, धूळ, मातीमध्ये बाइक चालवतानाही युव्ही कोटेड गॉगल्सचा वापर करावा. दगड, माती आणि धुळीपासून डोळयाचं संरक्षण करावं.( winter eye care tips in marathi )
4. स्वीमिंग पूलमध्येही डोळयांचं आरोग्य राहण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी. याच कालखंडात संसर्गजन्य रोगांचं प्रमाण वाढतं. त्यामुळे स्वीमिंगपूलमधील पाणी जास्तीत जास्त सुरक्षित ठेवण्याकरता त्यात क्लोरीन आणि अन्य रसायनांचं प्रमाण वाढवतात. या रसायनांमुळे डोळयांची आग होऊन त्यातून सतत पाणी यायला सुरुवात होते. त्यामुळे पोहतानाही युव्ही कोटेड गॉगल्सचा वापर करावा.
5. उन्हाचा परिणाम हा फक्त आणि फक्त त्वचेवरच होत नाही, तर डोळयांवरही होतो. डोळेही कोरडे होतात. या दिवसात ल्युब्रिकेटिंग ड्रॉप्सचा वापर करावा. हे ड्रॉप्स प्रिझर्वेटिव्ह फ्री असले पाहिजेत. या ड्रॉप्सच्या वापरामुळे डोळयाची जळजळ कमी होते.( winter eye care tips in marathi )