Tuesday, May 12, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Winter Pain: थंडीमुळे पाय व सांधेदुखीचा त्रास वाढतोय? जाणून घ्या घरगुती उपाय

by
December 24, 2025
in लाईफस्टाईल
A A
Winter Pain: थंडीमुळे पाय व सांधेदुखीचा त्रास वाढतोय? जाणून घ्या घरगुती उपाय
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Winter Pain : हिवाळ्याच्या दिवसांत तापमान घटल्यामुळे अनेकांना पाय दुखणे आणि सांधेदुखीचा त्रास जाणवू लागतो. विशेषतः मध्यमवयीन महिला, अशक्त मुले-मुली तसेच वृद्ध नागरिकांमध्ये हा त्रास अधिक प्रमाणात दिसून येतो. थंडीमुळे स्नायू आणि सांधे आखडतात, रक्ताभिसरण मंदावते आणि जुन्या जखमा किंवा मार लागलेले भाग पुन्हा दुखू लागतात.

थंडीमुळे पाय दुखण्यावर उपाय

पायदुखीपासून आराम मिळवण्यासाठी एक सोपा घरगुती उपाय सांगितला जातो. दररोज एक चमचा कच्चे तीळ आणि एक चमचा जवस हलके भाजून चावून खावेत. हा उपाय सलग एक ते दीड महिना केल्यास पाय दुखण्याचा त्रास कमी होण्यास मदत होते. याशिवाय थंडीच्या काळात पायांना उब मिळेल असे पांघरूण घेणेही फायदेशीर ठरते.

थंडीमुळे वाढणाऱ्या सांधेदुखीवर घरगुती चूर्ण

जुना लागलेला मार, हाडांवरील ऑपरेशन किंवा मुका मार थंडीमध्ये अधिक त्रास देत असल्यास एक विशेष घरगुती चूर्ण उपयोगी ठरू शकते.

साहित्य:

मेथी १०० ग्रॅम
ओवा ५० ग्रॅम
काळे जीरे ५० ग्रॅम
(हे प्रमाण एका व्यक्तीसाठी असून त्यात बदल करू नये.)

कृती:
मेथी, ओवा आणि काळे जीरे हे लोखंडी कढईत सौम्य आचेवर वेगवेगळे भाजून घ्यावेत. साधारण लालसर रंग येईपर्यंत भाजणे पुरेसे आहे. त्यानंतर सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधून बारीक पावडर करावी. या मिश्रणात १०० ग्रॅम आवळा पावडर घालावी. आवळा पावडर भाजायची नाही.

हे चूर्ण दररोज रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा कोमट पाण्यासोबत घ्यावे. पाणी कोमट असणे आवश्यक आहे. नियमित सेवनामुळे शरीरात साचलेले अपायकारक घटक मळाद्वारे किंवा लघवीद्वारे बाहेर पडण्यास मदत होते. तसेच काही महिन्यांनंतर शरीरातील अनावश्यक चरबी कमी होणे, त्वचेचा ताण सुधारणे असे फायदेही होऊ शकतात, असे सांगितले जाते.

थंडीच्या दिवसांत पाय व सांधेदुखीचा त्रास वाढल्यास हे घरगुती उपाय उपयोगी ठरू शकतात. मात्र त्रास तीव्र असल्यास किंवा दीर्घकाळ कायम राहिल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Join our WhatsApp Channel

The post Winter Pain: थंडीमुळे पाय व सांधेदुखीचा त्रास वाढतोय? जाणून घ्या घरगुती उपाय appeared first on Dainik Prabhat.

“}]]

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar