Winter Fashion Tips : लेटेस्ट फॅशन फॉलो करून हिवाळ्यातही तुम्ही खूप स्टायलिश (Winter Fashion Tips) दिसू शकता. पण यासाठी तुम्ही लेटेस्ट ट्रेंड फॉलो करणे महत्त्वाचे आहे. हिवाळ्याच्या मोसमात स्टायलिश दिसणं थोडं आव्हानात्मक असतं. पण या सीझनमध्येही तुम्ही लेटेस्ट डिझाईन्स फॉलो करून स्वतःची स्टाइल (Winter Fashion Tips) तयार करू शकता.
यंदाच्या वेळी ओव्हरसाईज ब्लेझर, ओव्हरसाईज जॅकेट आणि ओव्हरकोट अधिक ट्रेंडमध्ये असल्याचं दिसून येत आहे. आज आम्ही तुम्हाला बी टाऊन मधील काही सेलिब्रिटींच्या लुकबद्दल सांगणार आहोत जेणे करून या लुक्सने प्रेरित होऊ तुम्ही तुमची हटके स्टाईल करू शकता…
शॉर्ट लेदर जॅकेट : आजकाल शॉर्ट जॅकेट खूप ट्रेंडमध्ये आहेत. जर ते लेदरचे बनलेले असेल तर तुम्ही आणखी ग्लॅमरस दिसाल. अलीकडेच, प्रियंका चोप्राने एका संगीत कॉन्सर्टमध्ये ट्यूब टॉप आणि शॉर्ट लेदर जॅकेटसह लांब स्कर्ट घातला होता. अशी जॅकेट जीन्ससोबतही चांगली दिसतात.
जियोमेट्रिक पॅटर्न कोट : बरं, प्रत्येक पोशाख हा नेहमीच अद्भुत असतो. अभिनेत्री सोनम कपूरचे हिवाळ्यातील कलेक्शन खूपच प्रेक्षणीय आहे. सोनम एका इव्हेंटमध्ये जियोमेट्रिक पॅटर्नचा कोट परिधान करून पोहोचली होती. यासोबत तिने मॅचिंग टॉप आणि स्कर्टही कॅरी केला होता.
मल्टी कलर पुलओव्हर (स्वेटर) : हिवाळ्यात चमकदार रंग चांगले दिसतात. अशा परिस्थितीत तुम्ही आलिया भट्टकडून प्रेरित होऊ शकता. तुमच्या हिवाळ्यातील वॉर्डरोबमध्ये बहुरंगी स्वेटर अवश्य समाविष्ट करा. या हिवाळ्यात तुम्ही या पॅटर्नचे पुलओव्हर देखील परिधान करू शकता.
पॅटर्न ब्लेझर : हिवाळ्यात तुम्हाला स्टायलिश आणि एलिगंट लुक हवा असेल तर अभिनेत्री अनन्या पांडेप्रमाणे तुम्हीही चेक पॅटर्नचा ब्लेझर निवडू शकता. हे जीन्स आणि ट्राउझर्स दोन्हीवर चांगले दिसतात. यामुळे तुम्ही चार चौघात उठून दिसाल.
The post Winter Fashion Tips : थंडीच्या दिवसांत ‘कडक’ स्टाईलमध्ये मिरवण्यासाठी ‘या’ खास टिप्स नक्की फॉलो करा…. appeared first on Dainik Prabhat.