Sunday, November 8, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

रशियन ‘स्पुतनिक-व्ही’ का समजली जाते कोविशील्ड, कोवॅक्सीनपेक्षाही जास्त प्रभावी?

by प्रभात वृत्तसेवा
May 21, 2021
in आरोग्यपर्व
A A
रशियन ‘स्पुतनिक-व्ही’ का समजली जाते कोविशील्ड, कोवॅक्सीनपेक्षाही जास्त प्रभावी?
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

सध्या संपूर्ण जग कोरोना विषाणूशी झुंज देत आहे. त्याच दरम्यान सर्वत्र कोविड लसीची मोहीम जोरात सुरू आहे. 1 मे रोजी, देशातील 18 वर्षावरील लोकांना लसीचा डोस दिला जाईल. सध्या आपल्याकडे कोविशील्ड आणि कोवॅक्सीन या 2 लसी दिल्या जात आहेत. रशियाची ‘स्पुतनिक व्ही’ ही लस 1 मे रोजी भारतात दिली जाईल अशा बातम्याही आल्या आहेत. रशियन लसीच्या संशोधन गटाचे प्रमुख किरिल दिमित्रीव्ह यांनी आपल्या मुलाखतीत एका वृत्तवाहिनीला ही माहिती दिली. कशी आहे ही लस? ती अधिक प्रभावी आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.

रशियाने आपल्या या लसीला ‘स्पुतनिक व्ही’ नाव दिली आहे. रशियन भाषेत ‘स्पुतनिक’ या शब्दाचा अर्थ उपग्रह आहे. रशियाने जगातील पहिले उपग्रह बनविले होते. त्याचे नाव ‘स्पुतनिक’ असेही ठेवले गेले. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी जगातील पहिली कोविड लस जाहीर केली.

तसे पाहता 1 मे रोजी भारतात येणाऱ्या ‘स्पुतनिक व्ही’ लसीचे  किती डोस पाठविले  जातील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काही काळात 5 कोटी लस भारतात पाठवल्या जातील. ही लस येथील डॉ. रेड्डी लॅबच्या माध्यमातून भारतात आयात केली जाईल. भारत सुरुवातीला स्पुतनिक व्ही आयात करेल, परंतु नंतर त्याचे उत्पादन देशातच होईल.

कोविशिल्ड-कोवॅक्सीनपेक्षा ‘स्पुतनिक-व्ही’ अधिक प्रभावी ?

तज्ज्ञांच्या मते, रशियाची ‘स्पुतनिक-व्ही’ करोना लस भारताच्या कोविशिल्ड-कोवॅक्सीनपेक्षा अधिक प्रभावी आहे. रशियाच्या गमालेया संशोधन संस्थेचा असा दावा आहे की स्पुतनिक व्ही 91.6 टक्के प्रभावी आहे, तर कोविशिल्ड 80 टक्के प्रभावी आणि कोवॅक्सीन 81 टक्के प्रभावी आहेत.

सध्या, अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या आणि सीरम संस्थेद्वारे निर्मित कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सीनद्वारे देशभर लसीकरण मोहीम राबविली जात आहे. स्पुतनिक व्हीच्या आगमनाने देशात या दोन लसींची मागणी कमी होऊ शकते. सध्या दरमहा कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनच्या 70 दशलक्ष कुप्या तयार केले जात आहेत.

‘स्पुतनिक व्ही’ 2-8 डिग्री सेल्सिअस तापमानात ठेवू शकता

‘स्पुतनिक व्ही’ च्या उत्पादकांच्या म्हणण्यानुसार ही लस 2 ते 8 डिग्री सेल्सियस तापमानातदेखील ठेवली जाऊ शकते. ही लसदेखील दोन डोसमध्ये दिली जाते. कोविशील्डच्या दोन डोसांमधील अंतर चार ते आठ आठवडे असते आणि ते साठवण्यासाठी शून्य तापमानची (शून्यापेक्षा कमी) आवश्यक नसते. कोवॅक्सीनचे दोन डोस 4-6 आठवड्यांच्या अंतराने दिले जातात. ते 2-8 डिग्री सेल्सियस तापमानात साठवले जाऊ शकते.

स्पुतनिक व्ही’ लसीची किंमत

‘स्पुतनिक व्ही’ लसीची किंमत प्रति डोस सुमारे 750 रुपये ( $ 10 ) आहे. रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) चे मुख्य कार्यकारी अधिकारी किरिल दिमित्रोव्ह म्हणाले की, लसची किंमत सर्व देशांसाठी समान असेल. भारतासह 60 देशांमध्ये रशियाच्या लसीला मान्यता देण्यात आली आहे. ही लस बऱ्याच देशांत पाठविण्यात आली आहे.

‘स्पुतनिक व्ही’ दरवर्षी 85 कोटीहून अधिक डोस निर्माण करणार

सध्या भारताकडे तीन कोरोनाव्हायरस लस उपलब्ध आहेत. पाच फार्मा कंपन्या देशात ‘स्पुतनिक व्ही’ लस तयार करतील आणि एका वर्षात एकूण 850 दशलक्ष (85 कोटी) डोस निर्माण केले जातील. सध्या एप्रिल महिन्याच्या अखेरीस लसीची मर्यादीत मात्रा उपलब्ध होईल. दिमित्रीव म्हणाले की, पहिल्या टप्प्यातील डोस एप्रिलच्या अखेरीस आणि मेच्या सुरूवातीस वितरित केला जाईल. भारतातील पाच फार्मा कंपन्यांशी आमचा करार झाला असून या कंपन्या लसी तयार करतील. सध्या उत्पादन वाढण्यास एक ते दोन महिने लागू शकतात. जूनपर्यंत भारतातील आमची उत्पादन क्षमता वाढेल आणि आम्ही भारतात लसीकरण मोहिमेमध्ये खूप महत्त्वपूर्ण असल्याचे सिद्ध करू.

Tags: 'स्पुतनिक व्हीCovidkiril dimitrivRussian vaccineRussian vaccinesSputnik V vaccineअ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठकिरिल दिमित्रीव्हकोविशिल्ड-कोवॅक्सीनरशियारशियाची 'स्पुतनिक व्ही' ही लसस्पुतनिक
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar