सर्दी रोखतो : ज्यांना पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात लगेच सर्दी होते त्यांनी हिंगपाणी प्यावे. त्यामुळे श्वसनाच्या तक्रारी दूर होतात आणि सर्दी होण्यापासून बचाव होतो.
डोकेदुखी कमी होते : हिंगामुळे जळजळ किंवा पित्त कमी होत असल्याने डोकेदुखीवर ते उपकारक ठरते. डोक्याकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांमधील जळजळ कमी होत असल्याने डोकेदुखीपासून आराम मिळण्यासाठी हिंगपाणी प्यावे.
मासिक पाळीच्या समस्या : मासिक पाळीतील त्रास कमी होण्यासाठी हिंगपाणी हा सगळ्यात चांगला उपाय आहे. त्यामुळे पाठ आणि पोटाच्या खालच्या भागातील वेदना कमी होतात. हिंगामुळे रक्त पातळ होते आणि शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते. पाळीच्या कालावधीत नियमितपणे हिंगपाणी प्यावे.
रक्तातील साखरेची पातळी कमी होते : रक्तातील साखरेची पातळी हिंगामुळे कमी होते. हिंगामुळे स्वादुपिंडातील पेशी सक्रिय होतात आणि त्यामुळे अधिक इन्शुलिन तयार होते आणि रक्तातील साखरेची पातळी कमी होते.
उच्च रक्तदाबाचे नियंत्रण : रक्तात गुठळ्या तयार होण्यापासून रोखणारे घटक हिंगामध्ये असतात. त्याचबरोबर शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास हिंगाची मदत होते. त्यातून पुढे रक्तदाब नियंत्रणास उपयोग होतो. जर पाण्यातून घ्यायचा नसेल तर तुम्ही ताकातूनही हिंगाचे सेवन करू शकता. रिकाम्यापोटी हिंगपाणी घेतल्यास अधिक प्रभावी ठरते.