आपल्याकडे राहणीमान तितके चांगले नसल्याने, स्वच्छतेची योग्य ती काळजी घेत नसल्याने डोळे येण्याच्या साथीला दर 2-3 वर्षांनी सामोरे जावे लागते. या साथीमध्ये दृष्टी गमावण्याची उदाहरणे जवळजवळ नाहीतच. परंतु नित्याच्या कामावर परिणाम होतो. ( eye redness causes )
डोळ्याची साथ येते म्हणजे एकामुळे दुसऱ्याला, दुसऱ्यामुळे तिसऱ्याला असा विकार फैलावतो.
डोळ्याची साथ ही व्हायरस म्हणजे विषाणूमुळे होते. प्रत्येक साथीत विषाणू आपले रूप बदलत असतात. त्यामुळेच आजपर्यंत अशी साथ प्रभावीपणे आणि चटकन आटोक्यात आणणे अशक्य झाले आहे.
सुरुवातीला डोळ्यात काहीतरी गेल्यासारखे खुपते. त्यानंतर काही तासांतच प्रथम एक व काही तासांतच दुसरा डोळा लाल दिसू लागतो. जास्त उजेडाकडे पाहवत नाही. डोळ्यातून पाणी व नंतर चिकट घाणे येऊ लागते.
उठल्यावर पुवाने चिकटलेल्या दोन्ही पापण्या गरम पाण्याने धुतल्याखेरीज उघडत नाहीत. या विकाराचा जोर सुमारे 4-5 दिवस टिकून राहतो. रुग्णाने शक्यतो इतरांमध्ये मिसळू नये. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. डोळा कमीत कमी 4-5 वेळा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून काढावा. त्यानंतर ऍन्टिबायोटिक्सचे थेंब टाकावेत. गॉगल वापरावा. ( eye redness causes )
काही लोकांना रात्रीचे दिसत नाही किंवा कमी दिसते. असे का याला रातांधळेपणा म्हणतात. ते दोन प्रकारचे असतात. हा विकार समजून घेण्यापूर्वी आपण आपल्या डोळ्याची रचना समजून घेऊयात.
आपल्या डोळ्यातील पडद्याचे (रेटिनाचे) दोन स्वतंत्र विभाग असतात, ज्यातील एक दिवसाच्या दृष्टीसाठी व दुसऱा रात्रीच्या दृष्टीसाठी काम करतो.
डोळ्याचा पडदा हा अर्धगोलाकृती आहे असे समजल्यास मधला निम्म्यापेक्षा जास्तीचा भाग दिवसाच्या नजरेसाठी उपयोगी पडतो. तर उरलेला पेरीफेरीचा भाग रात्री दिसण्यासाठी उपयोगी पडतो. रेटिनाच्या याभागात रात्रीचे दिसण्यासाठी रॉडस् नावाच्या पेशी असतात.
त्यांची कार्यक्षमता शरीरातून मिळालेल्या अ जीवनसत्त्वावर अवलंबून असते. आणि म्हणूनच ज्या लहान मुलांना अपुऱ्या व असमतोल आहारामुळे पुरेसे अ जीवनसत्त्व मिळत नाही, त्यांना अंधुक प्रकाशात कमी दिसू लागते. अशावेळी इंजेक्शन द्वारा किंवा पोटात घ्यायच्या अ जीवनसत्त्वाच्या गोळ्यामुळे अंधुक प्रकाशातही पूर्ववत दिसू लागते.
म्हणून लहान मुलांच्या आहारात दूध, अंडी, मासे किंवा गाजर, शेवग्याच्या शेंगा, हिरव्या पालेभाज्या, कोशिंबिरी देणे उपयुक्त ठरते. दुसऱ्या प्रकारच्या रातांधळेपणामध्ये मात्र अ जीवनसत्त्वाचा उपयोग केला तरी काहीही फरक न होता वयाच्या साधारण 40- 50 या दरम्यान त्यांना दिवसा आणि रात्री दोन्ही वेळचे कायमचे अंधत्व येते. ( eye redness causes )
ज्या घराण्यात आपसांतील नातेवाईकांच्यात लग्ने होतात, त्यांच्या पुढील पिढीमध्ये अशा तऱ्हेचा रोग संभवू शकतो. हा रोग साधारणपणे वयाच्या 8 व्या – 10 व्या वर्षी कळून येतो. अशा रुग्णांना अंधुक प्रकाशात खूपच कमी दिसते. दिवे लागणीच्या सुमारास जेव्हा उजेड खूप कमी असतो तेव्हा हे रुग्ण कोणाच्या मदतीखेरीज रस्त्यावर हिंडू शकत नाहीत. उजेडात मात्र सुरुवातीची काही वर्षे ते उत्तमरित्या वावरू शकतात आणि त्यांना अशा प्रकारचा एखादा विकार असेल अशी त्यांच्या जवळपास वावरणाऱ्या कोणाला शंकाही येत नाही. वयाच्या 55 वर्षानंतर ही नजरदेखील कमी होऊन कायमचे अंधत्व येते.
ईल्स डीसीज म्हणजे काय
साधारणतः तंदुरुस्त असलेल्या 18-28 वर्षे वयातील पुरुषांमध्ये कुठल्याही तऱ्हेची वेदना अगर पूर्व सूचना न होता, एकाएकी अंधत्व आणणारा हा विकार आहे. हा विकार सहसा स्त्रियांना होत नाही.
या विकाराची जाणीवच मुळी एकाएकी नजर गेल्यामुळे होते. डोळ्याच्या आतील व्हिट्रीअस या द्रावामध्ये रेटिनावरील एखादी रक्तवाहिनी फुटल्यामुळे खूप प्रमाणात रक्तस्त्राव होतो. त्यामुळे डोळ्यासमोर चार-पाच फुटांवर धरलेली बोटेही दिसेनासी होतात.( eye redness causes )
प्रथम हा विकार एका डोळ्यात होतो. हा रक्तस्त्राव शरीराच्या निसर्गनियमानुसार पहिल्या एक-दोन वेळेस संपूर्ण शोषला जातो आणि 4 ते 5 दिवसांतच रुग्णाला पूर्ववत दिसू लागते. अशावेळी डोळा दुखत नसतो. तो लाल झालेला नसतो. त्यातून पाणी येत नसते. त्यामुळे रुग्ण बरेच वेळा डॉक्टरांकडे सल्ल्यासाठी येत नाहीत; परंतु तिसऱ्या वेळेस झालेला रक्तस्त्राव शरीर सहसा शोषून घेत नाही.
त्यामुळे दहा-बारा दिवसांनी असा रुग्ण जागा होऊन प्रथम डोळे तपासणीसाठी येतो. प्राथमिक तपासणीनंतर त्याचा अल्ट्रासाऊंडद्वारे फोटो काढला जातो. जरूर तिथे लेसर किरणांचे उपचार करून असा डोळा वाचविता येतो. पण, काहीवेळेस त्याचा उपयोग होत नाही. अशा रुग्णांवर व्हिट्रेक्टॉमीसारख्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात. त्यानंतरही नजर वाचतेच, असे खात्रीपूर्वक सांगता येत नाही.( eye redness causes )