काही लोकांच्या हृदय ( Heart ) चे ठोके सामान्य नसतात. काहींमध्ये सामान्यपेक्षा खूप कमी ठोके पडतात. तर काहींमध्ये ते सामान्यपेक्षा खूप जास्त पडतात. जेव्हा ठोके कमी पडतात, त्याचा अर्थ असतो, रक्त शुद्ध ( Pure blood )होण्याची प्रक्रिया योग्य त्या पद्धतीने चालू नसून खूप हळू चालू आहे. त्यामुळे शरीराच्या इतर भागांना शुद्ध रक्ताचा पुरवठा कमी होऊ शकतो.
त्यामुळे अशक्तपणा, चक्कर येणे अशी लक्षणे जाणवू शकतात. तर ज्यांच्यामध्ये हे ठोके प्रमाणापेक्षा जास्त पडतात त्यांच्यामध्ये शुद्ध रक्त सामान्य वेगापेक्षा अधिक वेगाने इतर अवयांना पुरवले जाते.
त्यामुळेही शरीराचे नुकसान होऊ शकते. प्रत्येक व्यक्तीत योग्य प्रमाणातच ठोके पडणे गरजेचे असते. त्यामुळे वरील दोन्ही प्रकारच्या रुग्णांमध्ये हृदय ( Heart ) चे ठोके सामान्य राहण्यासाठी पेसमेकअर ( pacemakers of the heart ) हे छोटे उपकरण बसवले जाते.