पुणे – नुकत्याच झालेल्या जागतिक उच्च रक्तदाब (blood pressure) दिनाचे औचित्य साधून केलेल्या एका अभ्यासातील निष्कर्षानुसार 25 ते 35 वर्षे वयोगटातील 10 ते 12 टक्के लोकांमध्ये उच्च रक्तदाबा(blood pressure)चे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. विशेषत: पुण्याच्या बाबतीत हे सर्वेक्षण करण्यात आले होते.
यासाठी तणाव व आजारांच्या लक्षणांकडे दुर्लक्ष हे कारण असल्याचे दिसून आले आहे. या अभ्यासासाठी जानेवारी 2015 ते एप्रिल 2016 या कालावधीमध्ये प्रतिबंधात्मक आरोग्य तपासण्या करुन घेतलेल्या 23,145 लोकांच्या आरोग्यविषयक अहवालांचा वापर करून घेण्यात आला.
इंडस हेल्थ प्लस यांच्यातर्फे हे सर्वेक्षण करण्यात आले असून यातील ऍब्नॉरमॅलिटी अहवालाने निदर्शनास आणले आहे की, पुणेकरांमध्ये स्थूलपणा, मधुमेह व हृदयविकार यांसारखे जीवनशैली आजारांचे प्रमाण जलदगतीने वाढत असून पुण्यातील श्रमजीवी लोकांमध्ये तणावरहित उच्च रक्तदाबा(blood pressure)चे प्रमाण 4 टक्क्यांनी वाढले आहे.
इंडस हेल्थ प्लसचे डॉ. अमोल नायकवडी यांच्या म्हणण्यानुसार, पुण्यामधील स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये (35 ते 40 वर्षे) उच्च रक्बदाबाचे प्रमाण अधिक आहे. हा आजार फक्त वृद्ध वयोगटातील व्यक्तींना नसून, 20 वर्षे वयोगटातील युवांमध्येसुद्धा हा आजार आढळून आला आहे.
बैठी जीवनशैली, शारीरिक व्यायामाचा अभाव अशा कारणांमुळे लोकांमध्ये उच्च रक्तदाबा(blood pressure)चे प्रमाण वाढत आहे. जर योग्य वेळेवर उपचार घेतला नाही, तर हृदयविषयक आजार, मूत्रपिंड व इतर अवयव निकामी होणे असे आजार होऊ शकतात. वेळेवर व नियमित तपासणी उच्च रक्तदाबा(blood pressure)चा धोका कमी करु शकते.
पुण्यामधील स्त्रियांपेक्षा जास्त पुरुष उच्च रक्तदाबा(blood pressure)ने पीडित आहेत, पुरुष – स्त्रीचे प्रमाण 23ः22 आहे. तणाव, व्यायामाचा अभाव, बाहेरील पदार्थांचे अधिक प्रमाणात सेवन अशा कारणांमुळे 22 वर्षे वयोगटातील युवा लोक रक्तदाबापासून पीडित आहेत. आयटी विभागातील 25 ते 35 वर्षे वयोगटातील युवक अधिक प्रमाणात रक्तदाबा(blood pressure)पासून पीडित आहेत.
एकूणपैकी 22 टक्के ऍब्नॉरमॅलिटी पुरुषांमध्ये आढळून आली, असे आढळून आले की त्यांच्यापैकी 8 ते 10 टक्के पुरुष रक्तदाबा(blood pressure)पासून पीडित होते आणि त्यांना मूत्रपिंडविषयक विकारांचा त्रास होता. गोड पदार्थांच्या अतिसेवनामुळे 45 ते 55 वर्षे वयोगटातील 7 ते 9 टक्के लोकांना रक्तदाबाचा धोका आहे, मधुमेहाचाही आहे.
युवा वयोगटातील 15 ते 20 टक्के व्यक्तींनी अस्वस्थता, अचानक घाम येणे व उच्च तणाव पातळ्यांविषयी तक्रारी केल्या आहेत.
45 टक्के लोकांना उच्च रक्तदाबा(blood pressure)ची जाणीव आहे, पण ते कोणत्याही प्रकाराचा उपचार घेत नाहीत.20 टक्क्याहून अधिक युवक जंक फूडचे सेवन करतात, ज्यामुळे स्थूलपणा वाढतो.