अनिमिया म्हणजेच रक्तक्षय किंवा पंडूरोग. अनिमिया कोणाला होऊ शकतो? अनिमिया कुणालाही अगदी लहान मुलापासून तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत कोणालाही होऊ शकतो. ऍनिमियामध्ये तांबड्या रक्तपेशींची संख्या कमी होते व हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते.
हिमोग्लोबिनची नॉर्मल पातळी
हिमोग्लोबिनचे महत्त्वाचे काम सर्व पेशींना ऑक्सिजन (प्राणवायू) पोहोचवणे असते. हिमोग्लोबिन हा मॉलीक्युल दोन मुख्य घटकापासून बनलेला असतो, हिम आणि ग्लोबीन. हिम हा लोहाचा घटक तर ग्लोबीन हा प्रथिनाचा घटक आहे.
ऍनिमियाची लक्षणे
– लवकर थकवा येणे.
– डोळ्यापुढे अंधारी येणे.
– भूक न लागणे.
– अंगाचा थरकाप होणे.
-धाप लागणे.
– फिकट पिवळसर त्वचा.
-डोकेदुखी.
– नखे कोरडी, ठिसूळ
– निरुत्साहीपणा.
ऍनिमिया काही काळ असाच राहिला व वेळेवर औषधोपचार नाही केले तर तीव्र व गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. अगदी शेवटच्या स्टेजचा ऍनिमिया असल्यास पेशंट बेशुद्ध होऊ शकतो. मेंदूला पुरेसे ऑक्सिजनच न मिळाल्याने किंवा हृदयाचे काम नीट न झाल्याने हॉर्ट फेल्युअरदेखील होऊ शकतो.
गंभीर स्वरूपाच्या ऍनिमियामध्ये पायाला, चेहऱ्याला किंवा अंगाला सूज येऊ शकते. व श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. पेशंट धापा टाकत राहतो.
ऍनिमियाचे प्रकार
हिम (लोह) + ग्लोबिन (प्रथिने) ह्याचा एकत्रित बनलेला एक मॉलीक्युल असतो.
आहारात लोह, प्रथिने, जीवनसत्व बी 12 (व्हिटॅमिन बी 12), फॉलिक ऍसिड व जीवनसत्व क (व्हिटॅमिन सी) यासारख्या महत्त्वाच्या पोषक तत्वांची कमतरता.
ही सगळे पोषकतत्वे रक्त तयार होण्यासाठी म्हणजेच आयर्न आणि हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी फार महत्त्वाचे कार्य करतात. ह्या पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या ऍनिमियाला न्यूट्रिशनल अनिमिया म्हणतात.
-आयर्न डेफीशियनसी ऍनिमिया
-परनिशियस अनिमिया व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे
-मेग्लोब्लास्टिक ऍनिमिया (फॉलिक ऍसिडच्या कमतरतेमुळे होणारा)
काही ऍनिमिया अनुवंशिक असतात – जसे सिकलसेल अनिमिया, थलॅसिमिया ई.
अधिक रक्तस्राव झाल्याने – जसे अपघात, शस्त्रक्रियेच्या वेळेस, मुळव्याध, विविध अल्सर व कॅन्सर असल्यास.विविध विकारांमुळे अनिमिया होणे जसे – किडनीचे विकार, गर्भपिशवीचे विकार, इ.
योग्य वयापूर्वी गर्भावस्था येणाऱ्या स्त्रियांमध्ये
मासिक पाळी वेळी अधिक रक्तस्राव झाल्यास.
ऍनिमियाचे प्रतिबंध व उपचार
कुठलाही आजार झाला हे कळलं की त्याचे उपचार होणे अगदी सोपे. पण ऍनिमिया हा असा आजार आहे की त्यासाठी प्रतिबंधात्मक पावले उचलली तर ते जास्त योग्य व फायदेशीर होऊ शकते. आणि सोपेदेखील आहे. ज्या-ज्या वयोगटात किंवा शारीरिक व्याधीमुळे ऍनिमिया होऊ शकतो हे माहीत असल्यास त्यावेळी अशा व्यक्तीला पुर्वकाळजी घेऊन प्रतिबंधात्मक पाऊल घेतलेले नेहमी चांगले. याकरिता साप्लिमेंटेशन करून किंवा योग्य आहार घेऊन रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी नॉर्मल राहील असे बघता येते.
प साप्लिमेंटेशन
रक्ततपासणीत जेव्हा हिमोग्लोबिनची पातळी 8.5-8 मिग्रॅपेक्षा कमी असेल तर अशा वेळेस साप्लिमेंटेशन आवश्यक असते व एकदा ती पातळी 10-5-11 मिग्रॅपेक्षा जास्त झाली की मग आहाराद्वारा ते नॉर्मल ठेवणे शक्य असते.
तसेच किडनीच्या विकारांमध्ये एरीथ्रोपोएटीन नामक एक द्रव तयार होत नसते, त्यामुळे रक्तातील कल बनवण्याचे कार्य कमी होते, अशा वेळेस एरीथ्रोपोएटीन इन्जेक्शन देऊन रक्तातील पातळी नॉर्मल ठेवणे शक्य असते.
कसा आहार घ्यावा ? ( anemia patients blood report)
ज्या व्यक्तीमध्ये नेहमी आयर्नचे प्रमाण कमीच असते अशा व्यक्तींनी आवर्जून संतुलित आहार घेणे इष्ट. रोजच्या आहारात मुबलक प्रमाणात प्रथिनयुक्त पदार्थ घ्यावेत. विशेषत: व्हेजिटेरीयन लोकांनी याची जास्त काळजी घ्यावी.
प्रथिनयुक्त पदार्थ – दूध, दही, ताक, पनीर, चीज, अंडी, कलेजा, मासे, चिकन, मटण इ. हे सगळे प्राणिजन्य स्रोत आहेत व शरीरात 80-90% वापरले जातात. यांना प्रथम श्रेणीचे प्रथिने म्हणतात. डाळी, कडधान्य, वटाणे, वालदाणे, शेंगदाणे, सर्व प्रकारचे ड्रायफ्रूटस, तीळ, सूर्यफुलाच्या बिया, इ. ह्या सगळ्या पदार्थांमध्ये चांगले प्रथिने असतात.हे सर्व वनस्पतीजन्य स्रोत आहेत व यात 10-40% एवढे प्रोटीन्स असून ते दुय्यम दर्जाचे म्हटले जातात, कारण ते पूर्णपणे शरीरात शोषले जात नाहीत.
लोहयुक्त पदार्थ – आहारात भरपूर प्रमाणात हिरव्या पाले भाज्या, खजूर, अंजीर, (ताजे व सुके) काळे मनुके, बिटरूट ई घ्यावे. तसेच अळीव, अश्वगंधा, सफरचंद, गूळ, शेपू, डाळिंब हे पदार्थ असावेत. हे सर्व शाकाहारी स्रोत आहेत. व यामध्ये असलेल्या लोहाला पेप-हरशा आर्यन म्हणतात.
मांसाहारी स्रोत जसे मासे, मटण, चिकन, कलेजा, अंडी यामधील आर्यन/लोह हे खूप प्रमाणात असते व ते जास्त प्रमाणात शरीरात शोषले जाते.
व्हिटॅमिन बी 12 व फॉलिक ऍसिडयुक्त पदार्थ :
हे जीवनसत्व देखील खूप महत्त्वाचे कार्य करते. लाल रक्तपेशींच्या तयार होणाच्या प्रक्रियेमध्ये ह्या दोनही जीवनसत्त्वांचा महत्त्वाचा वाटा असतो. ह्यांच्या कमतरतेमुळे दोन प्रकारचे अनिमिया होतात.
व्हिटॅमिन बी 12चे स्रोत तसे कमी आहेत, पण आपल्या मोठ्या आतड्यातील उपयुक्त जीवाणूंमुळे हे आपल्या शरीरातच तयार होते. यासाठी या उपयुक्त जीवाणूंची संख्या नॉर्मल राहण्यासाठी आहारात दही, ताक, केळी, ओट्स इ. पदार्थ घ्यावेत व ते कमी होतील असे पदार्थ टाळावे, जसे – चहा, कॉफीचे अतिसेवन, मद्यपान व जास्त प्रमाणात सॉफ्ट ड्रिंक्सचा वापर. फॉलिक ऍसिड हे जास्त करून सर्व हिरव्या पाले भाज्यांमधून मिळते. तसेच पुदिना, पालक, संत्री ज्यूस, तीळ, मूग, उडीद डाळ इ.
काही लोहयुक्त पदार्थ
गूळ, शेंगदाणे ( चिक्की, लाडू )गुळाचे पाणी हरभऱ्याची भाजी मुग-मटकी फुटाणे पालकाचे पराठे खजुराचे लाडू अळीव -खोबऱ्याची बर्फी बिटरूट हलवा बिटरूट ज्यूस मटण खिमा अंड्याचे सर्व प्रकार
( anemia patients blood report)