पुणे – त्वचेवर असणारे पांढरे डाग (skin diseases information) हा या आजाराचा एक अविभाज्य प्रकार आहे. यात शरीराच्या काही विशिष्ट भागात अथवा विशिष्ट ठिकाणच्या त्वचेवर पांढरे डाग (skin diseases information) उमटतात. कालांतराने ते मोठे होत जातात. हे डाग कायमचे घालवणे पूर्णपणे शक्य नसले तरीही हे डाग सौम्य करण्यासाठी किेंवा ते वाढू नयेत यासाठी काही उपाय नक्कीच करता येतील. त्वचेमध्ये ज्या काही शिल्लक असलेल्या रंग निर्माण करणाऱ्या पेशी आहेत त्यांनी पुन्हा रंगनिर्मिती करणे आवश्यक आहे.
म्हणजेच रंगपेशी या केसांच्या मूळाशी, किंवा जखमेच्या कडांशी, किंवा पांढरे डाग (skin diseases information) असलेल्या भागातूनच तयार व्हायला हव्यात. त्वचेच्या एका इंचाच्या अष्टमांश भागातल्या रंगपेशींनी रंग तयार करायला सुरवात केली तर सुधारणा होण्यासारखी परिस्थिती निर्माण होते. पण केसाचाच रंग पांढरा झाला असेल तर जखमेच्या कडांपासून निर्मिती होणे आवश्यक असते. या उपायाला रिपिगमेंटेशन असे म्हणतात. या पेशंटला सोरॅलीन औषध देतात आणि मग त्याच्यावर अल्ट्रा व्हायोलेट किरणांचा मारा करतात. या किरणांमुळे सोरॅलीन कार्यक्षम होते आणि रंगनिर्मिती करणाऱ्या पेशींना चालना देते.
या उपचाराचा फायदा सर्वच पेशंटना सारखाच होत नाही. हे सोरॅलीन औषध ट्रायमेथीलसोरॅलीन आणि 8 मीथॉक्सी सोरॅलीन या स्वरुपात असते. हे औषध उन्हात बसण्याआधी किंवा अल्ट्राव्हायोलेट किंरणांखाली बसण्यापूर्वी दोन तास आधी तोंडावाटे घ्यावे लागते. उन्हात बसण्याची वेळ आकारून ते एक असते. एक दिवसाआड बसावे लागते. जास्त प्रमाणात अल्ट्राव्हायोलेट किरणे शरीराला नुकसानकारक असतात. हिवाळयात हा उपचार थांबवावा लागतो. ही विश्रांती पेशंटला आवश्यक असते. कृत्रिम अल्ट्राव्हायोलेट किरणे सलग वर्षभर पेशंट घेऊ शकतो. परंतु त्वचारोगतज्ञाचा सल्ला घेतल्याशिवाय हा उपाय करता येत नाही. घरीसुध्दा हा लॅंप किंवा दिवा घेऊन उपचार करता येतात. पण त्याला फार खर्च येतो.
शिवाय वेळही खूप लागतो आणि तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखालीच हा उपाय करावा लागतो. इतर वेळेस पेशंटने आपली त्वचा सूर्यप्रकाशापासून सुरक्षित ठेवायला हवी. अंगभर कपडे घालायला हवे. सनस्क्रिन मलम लावायला हवे. त्यासाठी 15 प्रतीचे सन प्रोटेक्शन फॅक्टर असलेले मलम वापरावे. पण उपचार सुरु असताना 8 किंवा 10 एसपीएफ प्रतीचे मलम वापरावे. त्यामुळे अल्ट्राव्हायोलेट ए किरणांना अटकाव होत नाही. जर स्विमिंग केले असेल अथवा थोडा वेळ जरी पोहले असाल तर त्यानंतर किंवा घाम आल्यानंतर पुन्हा मलम लावावे. कडक उन्हात बसताना डोळयांना इजा होउ नये म्हणून एक विशेष प्रकारचे गॉगल डोळयावर लावावे लागतात.
त्वचेवरचे डाग अनियमीतपणे पसरले असतील तर सोरॅलीन मलम सरळ त्वचेलाच लावून मग उन्हात बसावे. परंतु यामुळे त्वचा खूप नाजुक होते आणि त्वचेवर भाजल्यासारखे फोड येतात. हायड्रोकॉर्टीझोनचे मलम त्वचेवर लावली तर पांढरे डाग होण्याचा वेग कमी होतो आणि रिपिगमेंटेशनही लवकर होते असे आढळून आले आहे. औषधाच्या दुकानात 0.5 टक्के कॉर्टीझोन असलेली मलमे मिळतात ती फारच सौम्य असतात. त्याचा विशेष फायदा होत नाही. तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सोरॅलीन उपचार आणि कॉर्टीझोन उपचार दोन्ही एकाचवेळेस करु शकतात. त्याचे दुष्परीणाम कमी होतात. अशा प्रकारचे उपाय करून शरीरावरील कोड किेंवा पांढरे डाग कमी होण्यास अथवा त्याची वाढ थांबवण्यास मदत होऊ शकते.