Tuesday, May 20, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

फेस मास्क वापरता तर ‘ही’ बातमी नक्की वाचा, अन्यथा नंतर होईल पश्चाताप

by प्रभात वृत्तसेवा
March 4, 2021
in आरोग्य वार्ता
A A
फेस मास्क वापरता तर ‘ही’ बातमी नक्की वाचा, अन्यथा नंतर होईल पश्चाताप
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पुणे: कोरोना विषाणूमुळे जगभरात दहशत पसरली आहे. भारतातही संक्रमित लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सर्व नागरिक आपल्या घरामध्ये कैद झाले असून, वर्क फ्रॉम होम करत आहेत. या धोकादायक साथीची लागण टाळण्यासाठी WHO कडून वेळोवेळी गाइडलाईन्स जारी केल्या जातात.

दरम्यान, आता वर्क फ्रॉम होमनंतर ऑफिसमध्ये जाऊन काम करण्यास सुरुवात केली असेल तर विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. घर ते ऑफिस असा प्रवास करताना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी फेस मास्क वापरणं अतिशय गरजेचं आहे. दरम्यान, WHO कडून फेस मास्कबाबत काही महत्वाची माहिती जारी करण्यात आली असून, आज आम्ही त्याबद्दल सांगणार आहोत…

रिस्क फॅक्टर असलेल्या लोकांना मेडिकल मास्क आणि इतर सर्वच लोकांनी तीन लेअर असलेला फॅब्रिक मास्क वापरणं गरजेचं आहे. जेणेकरून संक्रमण पसरवणाऱ्या ड्रॉपलेट्सपासून तुमचा बचाव व्हावा.

फॅब्रिक मास्कचा वापर केला जात असेल कमीत कमी तीन लेअर असणं गरजेचं आहे. हे तीनही लेअर वेगवेगळ्या मटेरिअलचे बनलेले असतात. ज्यात चेहऱ्याजवळची लेअर कॉटनची, दुसरी लेअर पॉलीप्रोपाइलीन आणि तिसरी लेअर सिंथेटीकची असते.

WHO नुसार, होममेड फॅब्रिक मास्क व्हायरसपासून 70 टक्के सुरक्षा प्रदान करतो. हा मास्क आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी, कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांसाठी आणि त्यांची काळजी घेणाऱ्या लोकांसाठी अजिबात चांगला नाही.

फॅब्रिक मास्क वापरण्याची एक पद्धतही आहे. WHO च्या व्हिडीओत सांगण्यात आले आहे की, जर तुम्ही फॅब्रिक मास्क वापरत असाल तर तो वापरण्याची योग्य पद्घत तुम्हाला माहीत असली पाहिजे.

सर्जिकल मास्क किंवा फॅब्रिक मास्क हा त्या सर्वच लोकांनी वापरावा जे कोविड 19 संक्रमण झोनमध्ये आहेत. तसेच जिथे पब्लिक प्लेसवर फिजिकल डिस्टेंसिंग 1 मीटरपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे.

तसेच, मास्क लावण्याआधी आपले हात सॅनिटायजरने किंवा साबणाने स्वच्छ धुवावे. मास्कच्या मधल्या भागाला हात लावू नका. मास्कला जितक्यांदा हात लावाल तेवढ्या वेळा हात सॅनिटाइज करा किंवा धुवावे. तसेच मास्क काढल्यावरही हात धुवावे.

Tags: "lockdown"#CaronaVirusaarogya jagarArogyaparvlife style
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar