डायबेटिस हे डायबेटिक मॅक्युलर एडेमा (डीएमई) नावाचा डोळ्यांचा विकार बळावण्यामागचे कळीचे कारण आहे मधुमेह ( Diabetes ) . नेत्रपटल अर्थात रेटिनाशी संबंधित असलेल्या या विकाराची परिणती दृष्टी गमावण्यात होऊ शकते व सर्वसामान्य व्यक्तींच्या तुलनेत मधुमेहीं मध्ये या विकारामुळे दृष्टी गमावण्याचा धोका 25 टक्के अधिक असतो.
डीएमई समजून घेताना…
डायबेटिक मॅक्युलर एडेमा (डीएमई) मध्ये रक्तवाहिनी स्त्रवू लागल्याने रेटिनामध्ये द्रव साठू लागते. एखाद्या व्यक्तीसाठी डायबेटिक रेटिनोपॅथी (डीआर)चे निदान झाल्यास डीएमईचा प्रादुर्भाव झाल्याचे लक्षात येते. खरेतर डीएमई हा डीआरचा सर्वाधिक प्रमाणात आढळून येणारा प्रकार आहे. मधुमेह असलेल्या प्रत्येक व्यक्तीला डायबेटिक रेटिनोपॅथीचा धोका संभवतो.
धूसर किंवा अस्पष्ट दिसणे, सरळ रेषा वरखाली किंवा वाकलेल्या दिसू लागणे, विरोधी रंग किंवा एकूणच रंगांबद्दलची संवेदनशीलता कमी होणे, दूरचे पाहण्यास त्रास होणे, दृष्टीच्या मध्यावर छोटासा पण हळूहळू आकाराने वाढत जाणारा ब्लाइंड स्पॉट तयार होणे ही डीएमईची काही लक्षणे आहेत.
पुणे शहरात किमान 400 नेत्ररोग विशारद आहेत, तरी त्यांच्याकडे येणारे रुग्ण गंभीर समस्या घेवून येतात. हे लक्षण असे आहे की, रुग्णांतील जागृतीचा अभाव आणि या आजारांशी संबंधित उपचारांच्या माहिती बाबत अज्ञान. मधुमेही ( Diabetes ) युवकांनी दर 6 महिन्यांनी डोळे तपासणी करणे आवश्यक असते. डोळ्यांचे आजार, जसे की डायबेटीक मॅक्युलर एडीमा (डीएमई), हा गंभीर आजार असला तरी मात्र, सध्या उपलब्ध अद्ययावत उपचार पद्धतींव्दारे त्यावर नियंत्रण मिळवता येवू शकते.
एखाद्या व्यक्तीला असलेला डायबेटिस मेलिटस(डीएम)चा त्रास किती जुना आहे यावर त्या व्यक्तीमधील डायबेटिक रेटिनोपॅथीची तीव्रता अवलंबून असते. 10 वर्षांपासून डीएमचा त्रास असलेल्या व्यक्तीमध्ये डायबेटिक रेटिनोपॅथी उद्भवण्याचा धोका 50% इतका असतो आणि हाच काळ 20 वर्षांपर्यंत लांबल्यास डीआरच्या निदानाची शक्यता 90%पर्यंत पोहोचते. तसेच मधुमेहा वर उत्तम प्रकारे नियंत्रण ठेवले गेले नाही डीआरची तीव्रता वाढते. महिनाभरात माझ्या क्लिनिकला भेट देणा-या एकूण रुग्णांपैकी अंदाजे 40% व्यक्ती डीआरचा सर्वाधिक प्रमाणात आढळणारा प्रकार, डायबेटिक मॅक्युरल एडेमाचे रुग्ण असतात.
मधुमेहीं साठी काही प्रतिबंधात्मक उपाय
मधुमेहाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी दर सहा महिन्यांनी नेत्रविकारतज्ज्ञांची भेट घ्यावी व ठरल्या वेळी भेटीस जाणे चुकवू नये.
धूसर किंवा अस्पष्ट दिसणे, सरळ रेषा वरखाली किंवा वाकलेल्या दिसू लागणे, विरोधी रंग किंवा एकूणच रंगांबद्दलची संवेदनशीलता कमी होणे, दूरचे पाहण्यास त्रास होणे, दृष्टीच्या मध्यावर छोटासा पण हळूहळू आकाराने वाढत जाणारा ब्लाइंड स्पॉट तयार होणे अशाप्रकारची डीएमईची कोणत्याही लक्षणांचे सजगपणे निरीक्षण करावे व दृष्टीमध्ये थोडाही बदल जाणवल्यास तत्काळ तज्ज्ञांची भेट घ्यावी.
डॉक्टरांनी दिलेला सल्ला आणि उपचारांचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळावे.
मधुमेहा ( Diabetes ) चे व्यवस्थापन परिणामकारकरित्या करण्यासाठी रक्तातील साखरेचे प्रमाण नियमितपणे तपासत रहावे.
तुम्ही धूम्रपान करत असाल तर त्यात खंड पडावा यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व ते सोडण्याच्या दिशेने प्रयत्न करावेत. वजन नियंत्रणात ठेवावे व समतोल आहार घ्यावा.
नियमितपणे व्यायाम करावा व रक्तदाब किंवा कॉलेस्ट्रोल वाढणार नाही याची दक्षता घ्यावी.
जागतिक क्रमवारीमध्ये मधुमेहीं ची सर्वाधिक संख्या असलेल्या देशांमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर सर्वसामान्य व्यक्तींच्या तुलनेत मधुमेहीं( Diabetes ) ना दृष्टी गमावण्याचा धोका 25 टक्के जास्त भारतात डायबेटिस मेलिटस या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर
अशा रुग्णांची संख्या धोकादायकरित्या वाढत आहे.