प्रत्येकजण शरीर स्वच्छ करण्यासाठी आंघोळ करतो. विशेषत: उन्हाळ्यात लोक दिवसातून बर्याच वेळा न्हाणं पसंत करतात. आंघोळीमुळे शरीरावरील बॅक्टेरिया नष्ट होऊन आजार होण्याचा धोका कमी होतो. तसेच आपल्या चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात. आपल्याला खूप ताजेतवाने वाटते. त्यामुळे आंघोळ करणे खूप गरजेचे असते.
परंतु अनेकजण चुकीच्या पद्धतीने आंघोळ करतात. यामुळे शरीराला नुकसानीस सामोरे जावे लागू शकते. आंघोळीच्या सुरुवातीला शरीराचा कोणता भाग स्वच्छ केला पाहिजे, यासंबंधी जाणून घेणे खूप गरजेचे आहे. चला तर, जाणून घेऊया आंघोळ करण्याची योग्य पद्धत.
सर्व प्रथम, शरीराच्या ‘या’ भागावर पाणी घाला :
सहसा, अंघोळ करताना लोक प्रथम त्यांच्या डोक्यावर पाणी ओततात. जर तुम्हीही हे करत असाल तर तुमची सवय सुधारा. विशेषत: हिवाळ्यामध्ये असे करणे टाळा. वास्तविक असे केल्याने डोक्यातील नसा खराब होऊ शकतात. यामुळे, शरीराचे तापमान कमी झाल्यामुळे रक्तप्रवाह कमी होण्याचा धोका असतो. यामुळे मेंदूचे नुकसान होऊ शकते. म्हणूनच, सर्व प्रथम डोक्यावर नाही, पायांवर पाणी ओतले पाहिजे.
यामुळे आपल्याला पाण्याचे तापमान समजू शकते. वास्तविक, आपले पाय आपल्या शरीरावर सर्वात थंड अवयव असतात आणि डोके गरम असते. अशा परिस्थितीत थंड अवयवांपासून म्हणजेच पायापासून आंघोळ करणे योग्य मानले जाते.
मानेवर पाणी टाकल्यास ताण कमी होईल :
आंघोळ करताना मानेवर पाणी घातल्याने तणाव कमी होण्यास मदत होते. यामुळे नर्व्हस सिस्टीम अधिक चांगले कार्य करते. अशा परिस्थितीत, मान आणि इतर भागांवर पाणी टाकल्यानंतरच डोके भिजवा. यामुळे डोके आणि पाण्याच्या तापमानात फारसा फरक राहणार नाही.
कोमट पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे :
* यामुळे शरीरावरील जंतू मरतात.
* सर्दी, खोकला, ताप आणि इतर हंगामी आजारांपासून बचाव करते.
* मधुमेह होण्याचा धोका कमी होतो.
* सांधे आणि स्नायूदुखीचा त्रास कमी होतो.
* चयापचय पातळी वेगवान होते.
किती वेळा आणि किती काळ अंघोळ करावी ?
आंघोळ दिवसातून 2 वेळा आणि फक्त 20 मिनिटांसाठीच आंघोळ केली पाहिजे.
आंघोळीसाठी परिपूर्ण वेळ :
प्रत्येकजण सकाळी स्नान करतो. यामुळे दिवसभर ताजेतवाने वाटते. परंतु दिवसाबरोबर संध्याकाळी आंघोळ करणे देखील फायदेशीर आहे.
सकाळच्या आंघोळीचे फायदे :
* दिवसभर ताजेपणा जाणवतो.
* आळशीपणा आणि थकवा दूर झाल्यामुळे एकाग्रतेची शक्ती वाढते.
संध्याकाळी आंघोळीचे फायदे :
* दिवसभरचा तणाव व थकवा दूर होतो.
* यामुळे रात्री चांगली झोप येण्यास मदत होते.
* शरीरातील वात संतुलित राहील.
जास्त आंघोळही हानिकारक :
उष्णता टाळण्यासाठी काही लोक दिवसातून बर्याच वेळा आंघोळ करतात. परंतु यामुळे शरीराला हानी पोहोचू शकते. मग ते कोमट पाण्याने किंवा थंड पाण्याने केलेली आंघोळ का असेना. एका अभ्यासानुसार, बराच वेळ घेत किंवा 2 वेळापेक्षा जास्त वेळा आंघोळ केल्याने पचनतंत्र कमकुवत होऊ शकते. तसेच, शरीरात अशक्तपणामुळे विविध आजार होण्याचे प्रमाण वाढते.
खरं तर, जास्त वेळा आंघोळ केल्यामुळे विषाणूंपासून शरीराचे संरक्षण करणार्या बॅक्टेरिया वाहून जाण्याचा धोका आहे. तसेच त्वचेच्या कोरडेपणामुळे त्वचेच्या विविध समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे फक्त या 2 वेळा आंघोळ करण्याचा प्रयत्न करा. अन्यथा आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.