रक्तदान करु नका अथवा वीर्यदान करु नका
शरीराचा कोणताही अवयव दान करु नका
टेस्ट करण्याआधी कुणाला रक्तदान केले असेल तर त्या संस्थेशी ताबडतोब संपर्क साधा आणि ते रक्त कुणाला देऊ नका अशी सूचना द्या – तुमच्या लैंगिक जोडीदाराला, किंवा पत्नीला /पतीला एचआयव्ही (HIV positive) संसर्गाची कल्पना द्या. इथून पुढे लैंगिक संबंध ठेवताना कंडोमचा वापर करा
मादकद्रव्याचे व्यसन असेल तर ते सोडा किंवा कमी तरी करा
स्वत:चा टुथब्रश, रेझर किंवा रक्ताशी संबंध येणारी कोणतीही वस्तु दुसऱ्याला वापरु देऊ नका
घरात ब्लिीचींग पावडर असू द्या. रक्त किंवा शरीरातला कोणताही द्रवपदार्थ फरशीवर किंवा इतर ठिकाणी सांडला असेल तर एक चमचा ब्लिचिंग पावडर पाण्याने भरलेल्या अर्ध्या बादलीत टाका. ब्लिचींगमुळे एचआयव्ही (HIV positive) विषाणु खात्रीने नष्ट होतात.
एचआयव्ही पॉझिटीव्ह व्यक्तींनी वर्षातून दोन वेळा वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी.
एचआयव्ही आणि एडस विषयी डॉक्टरांकडून सविस्तर माहिती घ्यावी.
दंतवैद्याकडे दातासाठी जाताना किंवा कोणतेही लहान मोठे ऑपरेशन करण्यापूर्वी डॉक्टरांना एचआयव्हीच्या संसर्गाची कल्पना द्यावी.
एचआयव्ही (HIV positive) बाधीत व्यक्तीनी नोकरी व्यवसाय करायला कुणीही हरकत घेण्याचे कारण नाही. पण लैंगिक जोडीदाराला मात्र एचआयव्हीसंसर्गाची कल्पना द्यावी आणि शक्यतो गर्भधारणा टाळावी.
एचआयव्ही बाधीत व्यक्तीने आपल्या मुलांची नियमितपणे वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी.
एचआयव्ही टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर अशा व्यक्तीने आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
आता एचआयव्ही(HIV positive) बाधीत व्यक्तीसाठी काही प्रभावी औषधे निर्माण झाली आहेत. डॉक्टरांचा सल्ला घेऊन ती ताबडतोब चालू करावीत.
आपल्याला एचआयव्ही झाला आहे यावर त्या व्यक्तीचा विश्वास बसणे खूप अवघड असते. तो गोंधळून जातो. घाबरतो. त्याला मानसिक आधाराची गरज असते. डॉक्टरांनी त्याच्या सगळया शंकांचे समाधान करुन त्याला धीर द्यायला हवा. गरज पडली तर एडसविषयक तज्ञ असलेल्या समुपदेशकाची मदत घ्यावी.
एचआयव्ही टेस्ट पॉझिटीव्ह (HIV positive) आली म्हणजे लगेच उद्या मरण आले असे समजू नये. एचआयव्हीबाधीत व्यक्तीनी आरोग्याचे नियम पाळले तर कित्येक वर्ष एडस न होता जगता येते.