आपल्या शरीरातील अनेक ग्रंथींमधली एक महत्त्वाची ग्रंथी म्हणजे थायरॉईड ग्रंथी. ही ग्रंथी शरीरातील हार्मोन्सची पातळी नियंत्रित राखण्याचं काम करते. मात्र, या ग्रंथीच्या कमतरतेमुळे किंवा अतिरिक्त प्रमाणामुळे शरीराचं संतुलन बिघडण्याची शक्यता असते. कधी कधी आपण आपल्या आजूबाजूला अशा अनेक व्यक्ती पाहतो ज्या एकदम बारीक होत जातात किंवा काही केल्या त्यांचं वजन कमी होत नसतं. किंवा काही व्यक्तींच्या गळ्याशी मोठी गाठ आलेली दिसते.
इतकंच नाही तर मासिक पाळी अनियमित होणे, मूल न होणे, केस गळणे तसंच खूप घाम या अशा अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. असं का होतं हे आपल्याला कळत नाही. अशा वेळी त्या व्यक्ती थायरॉईडच्या शिकार झालेल्या असतात. अशा या थायरॉईडविषयी जाणून घेऊ या. वात, कफ आणि मेद जेव्हा दूषित होतं तेव्हा ते सगळं गळ्यामध्ये जमा होतात. त्यानंतर त्या ठिकाणी सूज येते. हळूहळू ही सूज वाढत जाते. यालाच आपण गलगंड झालं असं म्हणतो.
आपल्या शरीरात काही अंत:स्रव करणाऱ्या ग्रंथी असतात, ज्यांचं काम शरीरातील हार्मोन्सचं संतुलन राखणं असं असतं. या ग्रंथींपैकीच एक ग्रंथी म्हणजे थायरॉईड ग्रंथी होय. ही ग्रंथी गळ्याच्या मधल्या भागात असते. यातून दोन प्रकारचे हार्मोन्स बाहेर पडतात एक टी 3 आणि दुसरं म्हणज टी 4. या ग्रंथी आपल्या शरीरातील मेटाबॉलिझमला नियंत्रित करण्याचं काम करतात. टी 3 हे हार्मोन 10 ते 30 मायकोग्राम आणि टी 4 हे 60 ते 90 मायकोग्राम अशा स्वरूपात बाहेर पडत असतं.
निरोगी व्यक्तीमध्ये या दोन्ही हार्मोन्सची मात्रा प्रमाणात असते. जेव्हा यात काही बिघाड होतो त्यावेळी या ग्रंथींचं प्रमाण हे वाढतं किंवा कमी होतं. आणि या दोन्ही हार्मोन्सना नियंत्रित करण्याचं काम टीएसएच (थायरॉईड स्टम्युलेटिंग हार्मोन) नावाच्या हार्मोन्सला नियंत्रित ठेवते. इंडियन थायरॉईड सोसायटीच्यानुसार आज भारतात जवळपास 4.2 करोड भारतीय या थायरॉईड ग्रंथींमुळे त्रस्त आहेत तर 60 ते 70 टक्के लोकांना आपल्याला थायरॉईड आहे याची मुळात कल्पनाच नसते. अचानक वाढणारं वजन, जाणवणारा थकवा, गळणारे केस यांसारखे त्रास सुरू झाल्यावर डॉक्टर थायरॉइडची टेस्ट करायला सांगतात. तोपर्यंत थायरॉइड या आजाराविषयी फारसं माहीत नसतं. योग्य आहार तसंच पथ्याच्या आधाराने थायरॉइडचा आजार नियंत्रणात येतो.
कर्करोग, क्षयरोग या आजारांविषयी लोकांमध्ये जागृती दिसून येते. मात्र थायरॉइड या आजाराविषयी लोकांमध्ये म्हणावी तितकी जागृती दिसून येत नाही. थायरॉइड हा आजार दोन प्रकारचा असतो. हायपर थायरॉइड आणि हायपो थायरॉइड. आपल्या शरीरातील अतिशय महत्त्वपूर्ण ग्रंथी म्हणजे थायरॉइड. या ग्रंथी शरीरात मानेखालच्या भागात असतात. तिचा आकार एखाद्या फुलपाखरासारखा असतो. या ग्रंथीतून संप्रेरकांची (हार्मोन्स) निर्मिती होते.
शरीरक्रिया सुरू ठेवण्यासाठी या हार्मोन्सची गरज असते. शरीरातील बहुतेक क्रियांचा वेग हा या हार्मोन्सवर अवलंबून असतो. उदाहरणच घ्यायचं झालं तर हार्मोन्सचं प्रमाण वाढल्यावर शरीरातील मेटॅबॉलिझम वाढतं. म्हणजे हृदयाची धडधड वाढते, डोळे मोठे होतात, हाताला घाम सुटतो. मेटॅबॉलिझमचा परिणाम शरीरातील हाडं किंवा हृदयावर होऊ शकतो.
हार्मोन्सचं प्रमाण कमी झाल्यास उलट परिणाम होतात. आयोडिन हे खनिज थायरॉइड ग्रंथीसाठी उपकारक समजलं जातं. थायरॉइड ग्रंथीचं कार्य, वाढ तसंच मेंदू आणि शरीर यांचा एकूण विकास करण्यासाठी या खनिजाचा उपयोग होतो. थायरॉइड ग्रंथींतून स्त्रवणाऱ्या संप्रेरकांमुळे शरीराचं तापमान मर्यादित ठेवलं जातं. रक्तपेशी निर्माण होतात. प्रजोत्पादनासाठी आवश्यक पेशींचं आरोग्य सुधारतं. तसंच स्नायू आणि नसांना बळकटी प्राप्त होते.
हायपो थायरॉइड (थायरॉइड या अंत:स्रवी ग्रंथीचं काम कमी होतं) या आजाराचं प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. दिवसाआड किमान एक ते दोन रुग्णांमध्ये या आजाराची किंवा यातल्या काही लक्षणांची सुरुवात दिसतेच. ओळखीच्या चार ते पाच कुटुंबांपैकी एका कुटुंबामध्ये एखादा तरी हायपो थायरॉइडचा रुग्ण दिसून येतो. कित्येक रुग्ण तर वाढत चाललेल्या वजनामुळे त्रस्त होऊन डॉक्टरांकडे येतात. रक्ततपासणी केल्यानंतर हायपो थायरॉइडचं निदान होतं.
हायपो थायरॉइडच्या आजारामध्ये खालील लक्षणं दिसून येतात.
- वजन अकारण आणि अवास्तव वाढतं.
- लवकर थकवा येतो.
- कुठल्याही कामात निरुत्साह वाटतो.
- अंगावर जास्त करून हात, पाय आणि चेहऱ्यावर सूज येते.
- सांधेदुखीची समस्या वाढते.
- त्वचा सुरकुतते. कोरडी पडते.
- हाता-पायांच्या बोटांवरची नखं चपटी आणि खडबडीत होतात.
- केस रुक्ष (कोरडे) होतात. जास्त प्रमाणात गळायला लागतात. लवकर पिकतात.
- पोट साफ राहत नाही. (कॉन्स्टिपेशनम्हणजे बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवतो.)
- स्नायूंमध्ये पेटके येतात. (क्रॅम्प्स येणं)
- कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं.
- डिप्रेशन येतं.
- आवाजात घोगरेपणा वाढतो.
स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या तक्रारी यांसारखी लक्षणं हायपो थायरॉइड या आजारात दिसतात. सबक्लिनिकल हायपो थायरॉइड म्हणजे ज्यात लक्षणं दिसू लागतात, पण रक्तात ढडक (थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन्स), ढ3, ढ4 या संप्रेरकांची पातळी सर्वसामान्य असते. मात्र कालांतराने ढडक वाढलेलं आढळतं. आयोडिनची कमतरता निर्माण झाली की, थायरॉइडचा त्रास जाणवू लागतो.
त्यामुळे थायरॉइड ग्रंथीभोवती थायरॉक्झीनची मागणी करणा-या शरीरातल्या रसायनांचा जमाव वाढतो. थायरॉइड ग्रंथींना सूज येते. शरीराच्या अन्य क्रियांमध्ये अडथळे निर्माण होतात. ज्यांचे रक्ताचे रिपोर्टस सुरुवातीला सर्वसामान्य (नॉर्मल) असतात, त्यांना इतर डॉक्टरांनी थकव्यासाठी केवळ टॉनिक किंवा अंगावर सूज असेल तर ती कमी करणारी औषधं दिलेली असतात. पण मूळ आजार त्यामुळे बरा होतच नाही. तसंच रुग्णालाही म्हणावा तितका फरक वाटत नाही. अशा पेशंट्समध्ये रिपोर्टस नॉर्मल असतानाही जर हायपो थायरॉइड या आजाराची लक्षणं 60 ते 70 टक्के दिसत असतील (सबक्लिनिकल हायपो थायरॉईड) तर त्या अनुषंगाने औषधं सुरू केल्यावर लगेच फरक दिसून येतो.
प्रत्येक वेळी एक नवं फॅड आपल्या देशात येतं. आपणसुद्धा त्यामागे डोळे बंद करून धावत सुटतो. अशीच काहीशी स्थिती गेल्या 10 ते 15 वर्षात आयोडिनयुक्त मिठामुळे झाली आहे. ज्यांना खरोखरच गरज आहे, त्यांनी डॉक्टरी सल्ल्याने आयोडाइज्ड मीठ खावं किंवा जेवणातील इतर पदार्थातून आयोडिनचं प्रमाण थोडं वाढवून घ्यावं. उगीच सरसकट नॉर्मल लोकांनीही ते खात राहणं त्यांच्या आरोग्यासाठी योग्य नाही. या मुद्दयांवर मतमतांतरं भरपूर आहेत.
थायरॉइड प्रोफाइल म्हणजे ढ3, ढ4, ढडक ही टेस्ट केल्यास त्या रिपोर्टच्या खाली एक ओळ लिहिलेली असते. ती म्हणजे शुलशीी ळपींशज्ञ ेष ळेवळपशारू श्रशरव ीें हळसह ढडक र्वीीसह ींहरीं ळपलीशरीशी ढडकर् ींरर्श्रीशी : ळेवळपश. म्हणजे बहुतांश लॅबसुद्धा हे मान्य करतात की, आयोडिनचा वापर मर्यादित असायला हवा.
रोजच्या आहारात आयोडिनची गरज 70 ते 150 ालस/वरू एवढी असते. फक्त 1 ग्रॅम आयोडाइज्ड मिठात आयोडिनचं प्रमाण 77 ालस एवढं असतं. आता विचार करा, आपण दिवसभरात किती मीठ खातो? गरज नसताना आपल्या शरीरात किती आयोडिन जातं? मग का नाही थायरॉइडचा आजार जडणार.
शाकाहारी लोकांच्या आहारातील आयोडिनची गरज दूध तसंच सालांसहित उकडलेला बटाटा, मुळा, गाजर, लसूण, कांदे, वांगी यांसारख्या भाज्यांमधून पूर्ण होऊ शकते. तर मांसाहारी लोक सी-फूड, अंडी या पदार्थामधून शरीरात निर्माण झालेली आयोडिनची कमतरता भरून काढू शकतात. आयोडिनची कमतरता असल्याची लक्षणं दिसू लागतात तेव्हाच आयोडिन मिठातूनही घ्यावं.
मग शरीरात आयोडिनची कमतरता नसताना विनाकारण सरसकट आयोडाइज्ड मीठ खाऊ नये. गरज नसताना आयोडाइज्ड मीठ खाण्यापेक्षा सगळ्यात उत्तम पर्याय असलेल्या संधव मीठ या मिठाच्या प्रकाराचा जेवणात वापर करावा. संधव (उपवासाचे मीठ) ीेलज्ञ ीरश्रीं हे इतर दिवशीही वापरलं तर त्याने नुकसान तर काहीच नाही, उलट ब्लडप्रेशरसारखे (रक्तदाब) इतर आजारही नियंत्रित राहतील.
शिवाय या मिठात शरीरासाठी उपकारक असणाऱ्या इतर अन्य खनिजांचंही प्रमाण भरपूर असतं. अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण असणारं सैंधव मीठ हे सर्वानीच रोजच्या जेवणात वापरायला काहीच हरकत नाही. कारण लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वानाच मानवणारं असं हे मीठ आयुर्वेदालाही मान्य आहे.
शरीरातील आयोडिनचं प्रमाण हे क्लोरीन आणि ब्रोमीनयुक्त पाण्याने कमी होतं. पाणी शुद्ध करण्यासाठी काही ठिकाणी थेट क्लोरीनचा वापर केला जातो. काही ठिकाणी ब्लिचिंग पावडर तर काही ठिकाणी पॉली अल्युमिनाइज्ड क्लोराइडचा वापर केला जातो. पाणी शुद्धीकरणासाठी काहीही वापरा, नळाच्या पाण्यावाटे क्लोरीन तुमच्या पोटात प्रवेश करणारच. क्लोरीनचा हा प्रवेश नाकारण्यासाठी एक साधा उपाय आहे. नळावाटे शुद्ध करून आलेलं पाणी भरून ठेवून दोन दिवसांनंतर शिळं झालं की वापरावं.
तोपर्यंत त्यातील अतिरिक्त क्लोरीन उडून जाईल. आपण शरीराला उपकारक शिळंफ पाणी फेकून देतो आणि नळावाटे आलेलं क्लोरीनयुक्त पाणी वापरायला घेतो. मग शरीरातलं आयोडिन कमी होणारच. व्यायामाद्वारे हायपोथायरॉइड या आजारावर नियंत्रण मिळवणं अवघड असल्याचं दिसून येत आहे. वाढत्या वजनाच्या चिंतेने रुग्ण ग्रस्त असतो. आहार नियंत्रित करूनही, डाएटिंग करूनही वजन कमी होत नाही, अशी रुग्णांची ओरड असते.
आयुर्वेदातील पंचकर्म या शरीरशुद्धीच्या प्रक्रियेंतर्गत वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण, नस्य, शिरोधारा करून घेतल्यास हायपो थायरॉइड या आजारावर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवता येतं, असं आढळून आलं आहे. आयोडिनचं अपुरं सेवन आणि त्यामुळे उद्भवणारे आजार लवकर बरे होत नाहीत.
त्यासाठी आयोडिनचं अन्नातील प्रमाण योग्य राहील, यासाठी आपण जागरूक राहायला हवं. आयोडिन शरीरात साठवलं जात नाही. त्यासाठी आयोडिन रोजच पण मर्यादित प्रमाणात शरीरात गेलं पाहिजे. थायरॉइड हा आजार 100 टक्के बरा होत नाही, तर तो 100 टक्के नियंत्रणात ठेवता येतो. रुग्णाची थायरॉइडची गाठ तयार करत नसणारे रसायन योग्य मात्रेत बाहेरून देऊनच नियंत्रणात ठेवता येतो.
थायरॉईड होण्याची कारणं कोणती?
- हा अनुवंशिक आजार आहे.
- खाण्यात आयोडिनचं प्रमाण कमी असल्यास
- अति चिंता करणे
- खाण्याच्या चुकीच्या पद्धती
- रात्री जागरण करणे
- तसंच मूड डिसऑर्डरची मात्रा दीर्घकाळ घेतल्याने हार्मोन्सची मात्र कमी होत जाते त्यामुळे थायरॉईडच्या ग्रंथीचं संतुलन बिघडतं.
थायरॉईडचे प्रकार कोणते?
थायरॉईडचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. एक म्हणजे हाईपोथायराईडिज्म आणि दुसरा म्हणजे हायपरथायराईडिज्म. पैकी टी4 या थायरॉक्सनची हार्मोनची पातळी कमी झाली तर टीएसएचची पातळी वाढते तेव्हा त्याला हाईपोथायराईडिज्म असं म्हणतात. तर टी4 या थायरॉक्सनची हार्मोनची पातळी वाढल्यास टीएसएचची पातळी कमी होते तेव्हा या प्रकाराला हायपरथायराईडिज्म असं संबोधलं जातं. गलगंड हा देखील याचाच एक भाग आहे, असं म्हटलं तरी चालेल.
लक्षणं
- भूक कमी लागणे पण वजनात वाढ होत जाणे
- हृदयाचे ठोके कमी होणे
- गळ्याच्या आसपासच्या भागात सूज येणे
- आळस वाटणे
- अशक्तपणा जाणवणे
- डिप्रेशनमनध्ये जाणे
- घाम कमी येणे
- त्वचा कोरडी होणे
- अधिक थंडी लागणे अधिक म्हणजे उन्हाळ्यातही थंडी लागणे
- केसांच्या गळतीत वाढ होणे
- स्मरणशक्ती कमी होणे
- स्त्रियांची मासिक पाळी अनियमित होते. काही वेळा सुरुवातीला मासिक पाळी हळूहळू कमी होते आणि बंद होते.
- काही लोकांची ऐकण्याची क्षमता कमी होते
काय करावं?
- नियमित व्यायाम करावा.
- हा आजार गळ्याशी निगडित असल्यामुळे खाकरणे, किंवा गळ्यात कंपन निर्माण करणारी आसनं तज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्यावीत.
- शांत आणि स्वस्थ राहण्याचा नेहमी प्रयत्न करावा. ताणतणाव, चिंता यापासून स्वत:ला दूर ठेवा.
- जीवनशैली व्यवस्थित ठेवा
- रागावर नियंत्रण ठेवा.
काय खावं?
- हलका आहार घ्यावा, उदाहरण द्यायचं झालं
- तर दलिया, उकडलेल्या भाज्या आणि आमटी-पोळी खावी
- अन्न शिजवताना कमी तेल किंवा तुपाचा वापर करावा.
- हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा
नियंत्रणात कसं आणाल?
हा आजार औषधांनी नियंत्रित केला जाऊ शकतो, पण कधी कधी काही केसेसमध्ये ऑपरेशनही करावं लागतं. आजाराच्या प्रकारावर किंवा गांभीर्यावर या आजाराची उपचारपद्धती अवलंबून असते. हाईपोथायराईडिज्म हा प्रकार औषधांनी नियंत्रित आणता येतो. उदाहरणार्थ हृदयाचे कमी झालेले ठोके औषधांनी नियंत्रित करता येतात.
मात्र, जेव्हा हायपरथायराईडिज्म होतो त्यात थायरॉईड ग्रंथींचं वाढलेलं प्रमाण कमी करणं आवश्यक असतं. किंवा त्या ग्रंथीतून अतिरिक्त स्रव बाहेर पडू नये म्हणून काळजी घेणं आवश्यक असतं. म्हणूनच हायपरथायराईडिज्ममध्ये औषधांनी काहीही नियंत्रित होत नाही.
– डॉ. एस. एल. शहाणे