पुणे – मधुमेह हा एका विषासारखा आजार असून तो विविध अवयवांकर परिणाम करतो आणि आरोग्याचे इतर प्रश्नही त्यामुळे भेडसावतात. नंतरच्या टप्प्यांमध्ये हे आजार डोळे, मज्जाव्यवस्था, मूत्रपिंडे आणि हृदय इत्यादींवर परिणाम करतात.
मधुमेह संसर्गाप्रति आपली प्रतिकारशक्ती कमी करतो आणि बरे होण्याच्या प्रक्रियेचा वेगही कमी करतो. तुम्हाला मधुमेह असल्यास तुम्हाला हिरड्यांचा त्रास होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे आपल्याला रक्तशर्करेचे व्यवस्थापन करताना दात आणि हिरड्यांची विशेष काळजी घेण्याची गरज असते.
रक्तशर्करेच्या पातळ्यांचे नियंत्रण नीट न केले गेल्यास तुम्हाला हिरड्यांचे आजार होण्याची खूप शक्यता असते आणि मधुमेह नसलेल्या लोकांच्या तुलनेत आपण जास्त दात गमावू शकतो. मुख आणि हिरड्यांच्या आजारांचे अस्तित्त्व मधुमेहाच्या रूग्णांमध्ये जास्त असते.
मधुमेही रूग्णांना मोठ्या प्रमाणावर जीवाणूजन्य संसर्ग होऊ शकतात आणि हिरड्यांवर हल्ला करणाऱ्या जीवाणूंचा सामना करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये कमी असते. त्यामुळे मुख आरोग्य आणि काळजी हा चांगले आरोग्य आणि मधुमेह यांचे व्यवस्थापन करण्यातील महत्त्वाचा भाग आहे.
मधुमेहाशी संबंधित सर्वाधिक सर्वसामान्य मुख आरोग्य त्रास खालीलप्रमाणे आहेतः
दातांची झीज ः आहारातील आणि शीतपेय यामधील स्टार्च व साखर या जीवाणूंच्या संपर्कात येतात, तेव्हा प्लाक नावाचा चिकट पडदा तुमच्या दातांवर तयार होतो. प्लाकमधील आम्ले तुमच्या दाताच्या पृष्ठभागावर हल्ला करतात (इनॅमल आणि डेंटिन). यामुळे कीड लागण्याची शक्यता असते.
कोरडे तोंड ः कोरडे तोंड हे तुमच्या तोंडातील ग्रंथींमधून (लाळग्रंथी) निर्माण होणाऱ्या लाळेच्या प्रमाणातील घट झाल्यामुळे होते आणि तो सामान्यतः औषधांचा साइड इफेक्ट असतो.
तोंडाची जळजळ ः मधुमेह असलेल्या लोकांना संसर्गाचा सामना करण्यासाठी सतत अँटीबायोटिक्स घ्याव्या लागतात. त्यामुळे त्यांना तोंडात आणि जीभेवर बुरशीजन्य संसर्ग होण्याची शक्यता असते. ही बुरशी अनियंत्रित मधुमेह असलेल्या लोकांच्या लाळेतील साखरेच्या उच्च प्रमाणावर जगतात. त्यामुळे तुमचे तोंड आणि जीभ जळजळू शकते.
कीड ः तुम्हाला दंतक्षयामुळे कीड निर्माण होते. ती दाताच्या बाहेरील आवरण (ज्याला एनॅमल म्हणतात) आणि अंतर्गत आवरण (ज्याला डेंटिन म्हणतात) त्यावरही परिणाम करू शकते.
सूज ः ही जीभ, हिरड्या ओठ किंवा गालांच्या आत होते. ते अल्सर्स म्हणून किंवा तोंडात लाल पांढरे चट्टे म्हणून दिसू शकतात.
अल्सर्स ः या सामान्यतः लहान, वेदनादायी फोडी असतात, ज्या तुमच्या तोंडात किंवा तुमच्या हिरड्यांच्या तळाशी होऊ शकतात. त्यामुळे खाणे, पिणे आणि बोलणे वेदनादायी होऊ शकते.
हिरड्यांची सूज बुरशीजन्य संसर्ग चवीतील अडथळे ः हा सर्वांत मोठा चवीतील अडथळा आहे जो टिकून राहतो, सामान्यतः तुमच्या तोंडात काहीही नसले तरीही नकोसे वाटते.
तुम्ही हे त्रास दूर करण्यासाठी बरेच काही करू शकता. त्यासाठी आपल्याला तोंड, दात आणि हिरड्यांची नीट काळजी घेण्यापासून सुरूवात केली पाहिजे.
त्याच्या काही टिप्स खालीलप्रमाणे आहेतः
तुमचे तोंड कोरडे असल्यास ते अल्कोहोलमुक्त माऊथवॉशने खळबळून धुवा. तुमच्या आहारात दूध, चीझ, चिकन इत्यादींचा समाकेश करा. या आहारामुळे दाताच्या इनॅमलला कॅल्शियमचा पुरवठा करून त्याचे संरक्षण होते.
प्रत्येक आहारानंतर तुमचे दात स्वच्छ घासा. खाण्यानंतर ब्रशिंगपूर्वी किमान अर्धा तास थांबून इनॅमलचे संरक्षण करा.
मऊ ब्रिसल्सचे टूथब्रश वापरा दिवसातून एकदा तरी फ्लॉस करा डेंचर्सचा वापर करत असल्यास ते रोज स्वच्छ करा. डेंचर्स लावून झोपू नका.
धूम्रपानाच्या सवयीवर नियंत्रण ठेवा. दर सहा महिन्यांनी नियमित तपासणीसाठी दंतवैद्यकाला भेट द्या.
शक्य तितक्या नॉर्मल प्रमाणात रक्तशर्करेचे प्रमाण ठेवा.
– डॉ. शीतल जोशी