परफेक्ट फिगरसाठी अनेक कलाकार स्ट्रिक्ट रुटीन फॉलो करत असतात. बॉलीवूड अभिनेत्री रकुलप्रीत सिंहसुद्धा (rakul preet singh) या बाबतीत मागे नाही. ती अनेक वेळा तिच्या वर्कआऊटचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने नुकताच एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
ज्यामध्ये ती सायकल चालवताना दिसत आहे. फिटनेस सोबतच टाईम मॅनेजमेंटसाठी रकुलप्रीत (rakul preet singh) सायकल चालवित असते. रकुलप्रीतने (rakul preet singh) यापूर्वी देखिल अनेक वेळा लोकांना फिटनेसबद्दल जागृत केले आहे. लॉकडाऊन दरम्यानही ती तिच्या इंस्टा वॉलवर अनेक व्हिडिओ आणि फोटो शेअर करत होती. ज्यामध्ये ती जिम वर्कआउट्स, योगा, रनिंग आणि कधी कधी गोल्फ खेळताना दिसली. एवढंच नाही तर यापूर्वी तिने 30 किमी सायकलिंगसुद्धा पूर्ण केली आहे.
तर या वेळी तिने (rakul preet singh) 12 किमी सायकल चालविली आहे. “टाईम मॅनेजमेंटसाठी मी सायकल चालवत आहे. 12 किमी’ असे कॅप्शन देत तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. अनेकांनी हा व्हिडिओ री-पोस्ट केला आहे. तसेच असंख्य चाहत्यांनी त्यावर कमेंट्स करत त्याला लाइकस दिल्या आहे.