Sunday, November 9, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

काय असतो काचबिंदू? वाचा सविस्तर

by प्रभात वृत्तसेवा
December 16, 2020
in आरोग्य वार्ता
A A
काय असतो काचबिंदू? वाचा सविस्तर
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

– काचबिंदू  ( glaucoma treatment ) हा तसा कोणालाही होऊ शकतो. अगदी जन्मतःही असू शकतो. लहान बाळाच्याही शस्त्रक्रिया झाल्या आहेत. तरीही काही लोकांना हे होण्याची शक्‍यता जास्त असते. त्यांनी अधिक काळजी घेणे गरजेचे असते.

~ काचबिंदू वंशपरंपरागत असू शकतो. त्यामुळे घरातील कुणाला काचबिंदू   ( glaucoma treatment )असल्यास आपणही योग्य ती काळजी घेतली पाहिजे.

~ त्याचप्रमाणे उच्च रक्तदाब, मधुमेह असलेल्यांनीही काळजी घेणे गरजेचे आहे.
~ ज्यांना तरुणपणीच चष्म्याचा खूप मोठ्ठा नंबर असेल त्यांनी वर्षातून एकदा डोळ्यांचा दाब तपासावा.

~ चाळिशीनंतर डोळ्यांची वर्षातून एकदा तरी तपासणी करू घ्यावीच. त्यात डोळ्यांवरचा दाबही तपासावा.

~ ज्यांना स्टिरॉईडयुक्त औषधे वापरावी लागतात (उदा.- आर्थोयट्रीस्ट, अस्थमा, ऍलर्जी आदी) त्यांनीही काळजी घ्यावी.

~ काहीवेळा मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर काचबिंदू ( glaucoma treatment ) होऊ शकतो.

ज्याप्रमाणे आपण शरीराचा रक्तदाब मोजतो, त्याप्रमाणेच डोळ्याचा दाबही मोजता येतो. तो तीन प्रकारांनी मोजतात. त्यामुळे डोळे तपासताना प्रत्येक वेळी हा दाब तपासून घ्यावा.

काचबिंदू उपचार  ( glaucoma treatment )
काचबिंदूमध्ये उपचार आहेत. पण, विकार कोणत्या अवस्थेत आहे, यावर त्याचे यश अवलंबून असते. काचबिंदू  ( glaucoma treatment ) जर सुरुवातीच्या अवस्थेत असेल तर एका औषधानेही तो आटोक्‍यात राहू शकतो, पण तो पुढच्या अवस्थेत असेल तर दोन किंवा अधिक औषधे दिली जातात.

गोळ्यांचा जसा चांगला परिणाम असतो, तसा काही दुष्परिणामही असतो. त्यामुळे सगळ्याच गोळ्या प्रत्येक रुग्णाला चालत नाहीत. उदाहरणार्थ दमा, मधुमेह, हृदयविकार असलेल्या रुग्णांना काही औषधे देता येत नाहीत. मधुमेह असलेल्या व्यक्तींना रक्तातील साखर कमी होऊ लागली की चक्कर येते, अस्वस्थ वाटू लागते. या लक्षणांवरून ती व्यक्ती आपली साखर कमी होत असल्याचे ओळखते व योग्य ती खबरदारी घेऊ शकते, पण काचबिंदूसाठी   ( glaucoma treatment ) असलेली काही औषधे अशा व्यक्तीस दिल्यास ही लक्षणेच जाणवत नाही. म्हणजे आपली साखर कमी होत असल्याचे त्या रुग्णाला कळत नाही व तो धाडकन कोसळतो. त्यामुळे त्यांना काही औषधे देता येत नाहीत.

त्याचप्रमाणे काही रुग्णांना औषधातील काही घटकांची ऍलर्जी असू शकते. उदा. सल्फाची ऍलर्जी असलेल्यांना हा घटक असलेली औषधे देता येत नाहीत.

काचबिंदू  शस्त्रक्रिया ( glaucoma treatment )
शस्त्रक्रिया हा अत्यंत नाईलाजाने केला जाणारा किंवा शेवटचा उपाय आहे. ज्या रुग्णांना औषधांचे अनेक डोस देऊनही उपयोग होत नाही, त्यांना शस्त्रक्रिया करावी लागते. काहींना औषधेच सहन होत नाही, अशांच्या बाबतीतही शस्त्रक्रियेचा मार्ग स्वीकारावा लागतो. काही रुग्ण औषधे घेणे, वेळेत तपासणी करणे याबाबतीत खूप गलथान असतात. त्यांच्यावर शस्त्रक्रियेची वेळ येते.
शस्त्रक्रिया अयशस्वी होण्याची शक्‍यता एक टक्के असते, पण ते एक टक्के संबंधित व्यक्तीसाठी 100 टक्के असू शकते.

काहीवेळा दुसऱ्यांदा केलेली शस्त्रक्रियाही अयशस्वी होऊ शकते. ती अयशस्वी झाल्यावर डोळ्यात प्लास्टिक व्हॉल्व बसवण्याची शस्त्रक्रिया करतात. जसे हृदयात व्हॉल्व बसवतात, त्याप्रमाणे डोळ्यातही बसवण्यात येतो.काचबिंदू असूनही तुम्ही कार्यक्षम राहू शकता, जिद्दीने यश संपादन करू शकता.

Tags: aarogya jagaraarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagararogyajagarArogyaparvayurvedabeardbenefits of Bhimaseni kapoorblack pepperblood healthblood pressurecancercaronacholesterolCoronacorona viruscorona virus in IndiaCOVID-19 pandemicdaily dietdestroys virusesdietEasy Dietfitnesshealthhelth tipsinvestigatedlife stylelife style aarogya jagarPanchakarmavegetablevegetables benefits in marathiकाचबिंदू
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar