Thursday, May 15, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

‘सलाड’ काय आहे ही भानगड

by प्रभात वृत्तसेवा
December 1, 2020
in आहार
A A
‘सलाड’ काय आहे ही भानगड
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

खरं तर हा नवीन वाटणारा पदार्थ अतिशय जुना आहे आणि आपल्या सर्वांचा ओळखीचा आणि आवडीचा आहे. अहो, आपली कोशिंबीर! हो तेच ते सॅलाड ! हो, अगदी बरोबर ओळखलं. अगदी आपल्या नैवेद्याच्या ताटात असते न काकडीची कोशिंबीर प्रत्येक सणाला तो काकडीच्या सॅलाडचा एक प्रकार. म्हणजे हे सॅलाड आपण पूर्वीपासून खात आलो आहोत. मग आताच का त्याची इतकी चर्चा करतोय हल्ली. तर आपण आधी हे सॅलाड आता इतका का महत्त्वाचा आहे याचा आढावा घेऊ. नुसते खाल्ले पाहिजे असं सांगून उपयोग नाही. ते का गरजेचं आहे ते सांगितलं की आपोआप आवडेल खायला सर्वांना. 

तर पूर्वी होती ती दिनचर्या आता आपली कोणाचीच राहिली नाही. न स्त्रियांची न पुरुषांची. हल्ली आपले शारीरिक ताणतणाव म्हणजे उदाहरणार्थ आपला आपल्या ऑफिसपर्यंतचा प्रवास यात होणारी धावपळ आणि मानसिक ओढाताण यापासून ते आपल्या ऑफिसमधील आपल्या समोरची टार्गेट्‌स आणि त्यांनी येणारा मानसिक तणाव यापर्यंत. हे सगळं आता स्त्री-पुरुष सर्वांना करावं लागतंय. पूर्वी शरीर धाटणी हीच होती. आताही तीच आहे. पण भोवतालची परिस्थिती, दिनचर्या आणि खाणे-पिणे हे मात्र बदलत गेलंय. आता हा बदल त्याच शरीर धाटणीला पेलवत नाहीत, झेपत नाही आणि त्रास सुरू होतात आणि ते काही रोगांच्या स्वरूपात दिसू लागले आहेत. याची उदाहरणे म्हणजे मूळव्याध, बद्धकोष्ठता हे बहुतकरून अनेकांना होणारे त्रास.

म्हणून आता आपण या शारीरिक त्रासांना सामोरे जाताना आपल्या जेवणाच्या ताटात काही पदार्थांचे प्रमाण बदलायला हरकत नाही. म्हणून 1 चमचा कोशिंबिरीऐवजी आता वाटीभर सॅलाड खायला हवे. याचा फायदा असा होतो की आपण तंतुमय पदार्थ खाऊ लागतो ज्यांनी आपल्या पोटाला चांगला उपयोग होतो. दुसरी गोष्ट आपण जी भाजी खातो शिजवून त्यातील जवळ जवळ सर्व व्हिटॅमिन शिजताना निघून जातात, तेच ही सॅलाड कच्ची असल्या कारणाने ती सर्व व्हिटॅमिन आपल्याला मिळतात. वरून फोडणी ऐवजी दही किंवा लिंबू घातले तर क जीवनसत्वदेखील मिळते. मधुमेह, बिपी असणाऱ्या लोकांनी आवर्जून खावीत.

हल्ली सॅलाड देखील इटालियन, मॅक्‍सिकॅन अशी असतात. आपल्या नव्या पिढीला आवडतात. त्यात भाज्या जास्त आहेत आणि चीज वगैरेचे प्रमाण काही आहे न असे पाहून हे प्रकारदेखील खाऊन पाहायला हरकत नाही. पिझ्झा आणि मैदा प्रकार कायम खाणाऱ्या आपल्या युवा पिढीलाही सॅलाड खायला हरकत नाही. कारण सतत पिझ्झा ब्रेड खाणाऱ्या या मंडळीना
पोटासंदर्भात लवकर तक्रारी सुरू होऊ शकतील.

मधुमेह, बीपी, मुळव्याध, थायरॉईड हे रोग खूप कमी वयात आले आहेतच. तर मग आपण जेवणात हे सॅलाड घेत जाऊ. विविध प्रकार याचे करता येतील. गाजर, काकडी, कांदा, टोमॅटो, सॅलाडची पाने, कोबी, आणि बऱ्याच भाज्या, कच्चे मुग आणि लिंबू वापरून हा पदार्थ आपल्या आवडीनुसार बनवून पहा.

श्रुती देशपांडे

Tags: aarogya jagaraarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagarArogyaparvayurvedablood pressurecaronacholesterolcorona viruscorona virus in IndiaCOVID-19 pandemicdaily dietfitnesshealthhelth tipsinvestigatedlife stylelife style aarogya jagarMAHARASHTRAmaharshtratopnewsआहारसलाड
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar