हर्निया विविध प्रकारचे असतात. पुरुष आणि महिलांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे हर्निया उद्भवतो. पुरुषांमध्ये तो जांघेत आणि महिलांमध्ये नाभीप्रदेशात उद्भवतो. अनेकदा नाभी प्रसूतीच्या वेळी बाहेर आल्यामुळे उतीमध्ये फट निर्माण होते.
हर्निया अर्थात आंत्रनळ ही एक सह्य समस्या मानली जाते. तसेच दीर्घकाळ असलेल्या हर्नियाच्या समस्येची परिणती कर्करोगातही होऊ शकते. स्नायूला चीर गेल्यामुळे हर्निया होतो, शस्त्रक्रिया झाल्यावर जड वजन उचलल्यामुळे स्नायूला चीर जाऊ शकते आणि त्याची परिणती हर्नियामध्ये होण्याची शक्यता असते.
जेव्हा एखादा अवयव आत जाण्यासाठी ढकलला गेल्यामुळे स्नायू किंवा उतीचे मुख विस्तारते तेव्हा असे घडते. बहुतांश प्रकरणांमध्ये हा प्रकार उदरात होतो, कारण उदरातील झडप ही विविध स्नायू व उतींच्या स्तरांनी तयार झालेली असते. या स्तरांमध्ये कमकुवत बिंदू तयार होऊ शकतात आणि त्यातून उदरातील पोकळीमधील कण आत शिरू शकतात. बहुतांशी वेळेस हर्नियामुळे जीविताला धोका उत्पन्न होत नाही पण भविष्यात गुंतागुंत निर्माण होऊ नये यासाठी शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे अन्यथा दखल न घेतल्यास त्याची परिणती कर्करोगातही होऊ शकतो.
हर्निया विविध प्रकारचे असतात. पुरुष आणि महिलांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे हर्निया उद्भवतो. पुरुषांमध्ये तो जांघेत आणि महिलांमध्ये नाभीप्रदेशात उद्भवतो. अनेकदा नाभी प्रसूतीच्या वेळी बाहेर आल्यामुळे उतीमध्ये फट निर्माण होते. कधी कधी प्रमाणापेक्षा अधिक वजन असल्यामुळे किंवा प्रमाणापेक्षा अधिक खोकल्यामुळे उदराच्या दाबावर अतिरिक्त दाब पडतो. त्यामुळे नाभीचा हर्निया होतो.
इंग्वाइनल हर्निया हा अत्यंत सामान्यपणे आढळणारा हर्नियाचा प्रकार आहे. यात आतडी कमकुवत बिंदूमध्ये ढकलली जातात किंवा उदराच्या खालच्या पटलाला, बहुतांश वेळा इंग्वाइनल कॅनलमध्ये चीर पडते. या प्रकारचा हर्निया बहुधा पुरुषांना होतो. त्यामुळे त्यांच्या वृषणाकार रज्जूवर परिणाम होतो. हायटस हर्निया हा हर्नियाचा अजून एक प्रकार आहे. यात उदराचा काही भाग छिद्रपटलातून छातीमध्ये शिरतो. या छिद्रपटलाने उदर आणि छातीतील अवयव वेगळे झालेले असतात. हायटस हर्निया छिद्रपटलाला चीर पाडतो आणि यावर उपचार करण्यासाठी शस्त्रक्रियेची आवश्यकता असते.
स्थूलपणा हेसुद्धा हर्निया होण्यामागचे एक कारण असू शकते; जांघेच्या ठिकाणी अथवा नाभीच्या ठिकाणी गाठ येणे, उदराच्या खालील भागात किंवा श्रोणीभागात, विशेषत: वाकताना, वजन उचलताना किंवा खोकताना वेदना होणे किंवा अस्वस्थ वाटणे ही हर्नियाची लक्षणे असू शकतात. ज्यांना हायटस हर्नियाचा विकार जडतो त्यांना वारंवार ढेकर अथवा पित्त वर येण्यासारखे प्रकार घडतात. ही सर्व लक्षणे सौम्य प्रकारची असतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष न करणेच हितावर असते.
पण अत्यंत सौम्य लक्षणे दिसली, तरीही एंडोस्कोपी करून घ्यावी. ज्यांना अनेक महिने पित्ताचा त्रास आहे, ढेकर येत आहे किंवा आम्लाची उबळ येत आहे त्यांनी ही तपासणी करून घ्यावी. ही समस्या दीर्घकाळ राहिली तर अन्ननलिकेला हानी पोहोचून ती पुढील काळात कर्करोगग्रस्त होऊ शकते. त्याला बॅरेट्स इसोफेगस असेही म्हणतात, कर्करोगाचे निदान लवकर झाले तर त्यावर उपचार करता येऊ शकतात. अशा प्रकरणांमध्ये वाढ होण्यासाठी बैठी जीवनशैली आणि बदललेल्या खानपानाच्या सवयी कारणीभूत आहेत. काही वेळा केवळ या गाठीची केवळ शारीरिक तपासणी करून चालत नाही. ती गाठ आपोआप बरी होत नाही, वेळेवर उपचार घेतले किंवा जीवनशैलीमध्ये बदल केला तर हर्नियाचे परिणाम कमी करता येऊ शकतात आणि जीविताला धोका उत्पन्न करणारी गुंतागुंत टाळता येऊ शकते.
तुमच्या स्नायूंची बळकटी, वजनावर नियंत्रण ठेवणे आणि डॉक्टरांकडून नियमितपणे तपासणी करून घेतल्याने हर्निया टाळता येऊ शकतो. हर्निया शरीराच्या अनेक अवयवांना होऊ शकत असल्यामुळे त्यावर निश्चित असा प्रतिबंधात्मक उपाय नाही.
अद्ययावत वैद्यकीय सुविधांमुळे हर्नियावर सहज उपचार करता येऊ शकतात. नॅरो बॅण्ड इमेजिंगच्या नव्या एण्डोस्कोपिक तंत्रज्ञानामुळे बॅरेट किंवा अन्ननलिकेच्या लवकर निदान होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे जीवनशैलीमध्ये बदल करणे आणि वैद्यकीय उपचारांप्रमाणेच, जर हर्नियाचा आकार वाढत असेल आणि पोटात सतत दुखत असेल तर लॅप्रोस्कोपी करून घेण्याचा सल्ला देण्यात येतो.
लॅप्रोस्कोपीमध्ये उदरातील इतर उतींना फार हानी पोहोचत नाही, त्यामुळे हीच उपचारपद्धती सर्वसामान्यपणे उपयोगात आणली जाते. कधी कधी हर्निया झाल्यावरही कोणत्याही प्रकारची वेदना किंवा दैनंदिन दिनचर्येवर परिणाम होत नाही, पण तो असतो. वेळेवर उपचार आणि योग्य औषधे घेतल्यास हर्निया बरा होऊ शकतो. तसे न केल्यास मात्र जीविताला धोका उत्पन्न होतो.