ज्यांना मधुमेह आहे किंवा ज्यांचे वजन जास्त आहे, अशांना भात कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. परंतु दररोज भात खाण्याची सवय साधारणत: बहुतांश लोकांना असते. मधुमेहामुळे अथवा डाएटमुळे ज्यांना भात खाता येत नाही अशांसाठी एक गुड न्युज आहे.
श्रीलंकेतील कॉलेज ऑफ केमिकल्स सायन्सने नुकत्याच केलेल्या संशोधनात असे सिद्ध झाले आहे की, नारळाच्या तेलात भात शिजवल्यास भातातील 60% कॅलरीज कमी होऊ शकतात. या संशोधनातून असे सांगण्यात आले आहे की, नारळाच्या तेलात भात शिजवल्याने भातातील रेझिस्टंट स्टार्च वाढतो आणि साखरेचे चरबीमध्ये रुपांतर होत नाही.
नारळाच्या तेलात शिजवलेला भात 12 तासांसाठी फ्रिजमध्ये ठेऊन नंतर तो खाल्ल्यास त्यातील कॅलरीज आणखी कमी होतात. यामध्ये अर्धा पेला भात शिजवताना त्यात एक चमचा तेल टाकून तो शिजवा. हा भात 12 तास फ्रिजमध्ये ठेऊन खाल्ला तरी त्यातून विषबाधा होत नाही.