ग्लोबल बर्डन ऑफ डिझीज स्टडीच्या अभ्यासानुसार, जागतिक स्तरावर सुमारे 334 दशलक्ष लोकांना दमा आहे. याचा रूग्णांवर, त्यांच्या कुटुंबीयांवर आणि देशाच्या रचनेवर आणि अगदी शासनावर देखील फार भार आहे. याशिवाय रूग्णाच्या आयुष्यावर होणारा परिणाम हा वेगळा असतो.
दमा हा श्वसनमार्गाच्या क्षोभाचा एक आजार असून याची लक्षणे प्रत्येक रूग्णामध्ये काही प्रमाणात वेगळी असू शकतात. दम्याच्या जवळ जवळ सगळ्या बाबींमध्ये एक महत्वाची आणि समान अशी बाब म्हणजे दमा बळावण्याची कारणे- जेंव्हा श्वसनमार्गाचा ऍलर्जन्सशी संपर्क येतो, तेंव्हा त्यांचा क्षोभ होऊन, त्यावर सूज येते आणि त्यात श्लेषमा जमा होते. यामुळे श्वसनमार्गाच्या प्रतिकारितेवर परिणाम होतो, आणि श्वसनास त्रास, खोकला आणि छातीत घरघर या सारख्या समस्या जाणवू लागतात.’ दम्याचा संबंध हा दीर्घकालीन खोकल्याशी असतो, शरीर आतील श्लेषमा बाहेर फेकण्याचा प्रयत्न करत असते, हे श्लेषमा श्वसनमार्गाच्या पृष्ठ भागावर जमा हो ऊन रूग्णास सतत अस्वस्थतेची भावना निर्माण करून देत असते. दम्याच्या मागील नक्की कारणे माहिती नसून, काही ऍलर्जी आणि कौटुंबिक इतिहास यासाठी महत्वाचा मानला जातो.
दम्याच्या रूग्णांना किंवा दमा असलेल्या रूग्णाच्या व्यवस्थापनात मदत करणाऱ्यांना दमा नक्की कशाने बळावतो हे माहिती असणे आवश्यक आहे. यामुळे दीर्घकाळासाठी दम्यावर नियंत्रण मिळविता येते आणि दम्याच्या अटॅकची वारंवारीता देखील कमी करता येते.
पर्यावरणीय घटक, खाद्यपदार्थ, श्वसनामार्गे आत घेतले जाणारे ऍलर्जीक घटक माहिती असल्यास दम्याचा अटॅक येणे टाळता येऊ शकते. खाली दमा “बळावण्याची’ कारणे नमूद केली गेली आहेत: पराग कण- हे झाडांमुळे निर्माण होणारे बारीक कण असता, काही प्रकारची गवतं आणि पर्यावरणीय घटकांमध्ये ही आढळून येतात.पराग कणांपासून बचाव करायचा असल्यास एअर कंडिशनचा वापर करू शकता, विशेषता: शरद ऋतुमध्ये जेंव्हा हवेत भरपूर प्रमाणात पराग कण असतात. पराग कणांचे प्रमाण कास्ती असताना चेहऱ्यावर आवरण आणि नाकावर बाहेर जातान रुमाल, विशेषत: दुपारी फार महत्वाचे असते, झोपण्यापुर्वी डोकं धुणे फार महत्वाचे असते, (विशेषत: पराग कण वातावरणात जास्ती असतानाच्या काळात).
प्रदूषक आणि क्षोभ निर्माण करणारे घटक : हे घराच्या आत किंवा बाहेर दोन्हीकडे आढळू शकतात, आणि स्टोव्ह, आग, पर्फ्युम, स्वच्छतेसाठी वापरली जाणारी सामग्री आणि फवारे यांच्या माध्यमातून निर्माण होऊ शकतात. नवीन बनविलेले फर्निचर, भिंती, छत यापासून देखील त्रास बळावू शकतो.
केसाळ प्राणी : उष्ण रक्त असलेले प्राणी, जसे कुत्रा, मांजर, पक्षी आणि उंदीर यांच्यामुळे देखील दमा बळावू शकतो. त्यांच्या त्वचेचे खवले, केस, पंख, वाळलेली थुंकी आणि मुत्री यामुळे दम्याचा अटॅक येऊन रूग्णास घरघर, खोकला आणि डोळ्यातून पाणी येण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. ही बळावणारी कारणे बाजूला सारण्यासाठी केस आणि पंख असलेल्या प्राणी आणि पशुंपासून शक्य तेवढे लांब रहाणे फार आवश्यक असते. इतर महत्वाच्या गोष्टी म्हणजे, पाळीव प्राण्यांना आठवड्यातून एकदा अंघोळ घालावी, पाळी प्राणी असलेल्या कुटुंबात किंवा मित्र परिवारात जाणे टाळावे आणि पंखांपासून बनविलेली उत्पादने वापरू नयेत.
धुम्रपानाचा धूर: यामुळे श्वसनमार्गास क्षोभ होतो आणि फुफ्फुसांवर कायमस्वरूपी परिणाम होऊ शकतो. जेंव्हा धुम्रपानाचा धूर श्वसनामार्गे आत जातो, तेंव्हा दम्याचा अटॅक बळावण्याची दाट शक्यता असते. या समस्येवर नियंत्रण मिळविण्याकरिता धुम्रपान टाळावे, धुम्रपान अधिक होत असलेल्या ठिकाणी जाणे टाळावे आणि घरात धुम्रपान करणारे कोणी असल्यास त्यांना ते सोडायला लावावे, किंवा घराबाहेर जाऊन धुम्रपान करावयास सांगावे.
फवारा आणि सौंदर्य प्रसाधने: ओला रंग, एरोसोल स्प्रे आणि स्वच्छतेच्या सामग्री मुळे दमा होऊ शकतो. अगदी पर्फ्युम्स आणि डियोड्रन्ट्स देखील दमा बळावतात. त्यामुऴे दमा रूग्णांनी नवीन रंग दिलेल्या ठिकाणी जाऊ नये. रंग व्यवस्थित वाळू द्यावा आणि नॉन-पर्फ्युम्ड स्वच्छतेची साधने वापरावीत. अती वास असलेले खाद्य पदाथ बनवत असल्यास खिडक्या उघड्या टाकाव्या आणि एक्झॉस्ट लावावा.’
व्यायाम: अती शारीरिक श्रमामुळे श्वास घेण्यास त्रास आणि फुफ्फुसांवर ताण येणे स्वाभाविक आहे. यामुळे दमा बळावतो. शरीरासाठी व्यायाम उत्तम पर्याय आहे. यामुळे दमा बळावू शकतो. शरीरास व्यायाम जसा महत्वाचा आहे, तसे योग्य व्यायामाची पद्धती आणि चिकित्सकांना भेट देणे सुद्धा गरजेचे आहे.
जरी दमा पूर्णपणे बरा होऊ शकत नसला, तरी इन्हेलेशन थेरपीच्या माध्यमाने आणि वरती नमूद केलेल्या आजार बळावण्याची लक्षणे लांब ठेवल्यास, लक्षणांवर नियंत्रण मिळविता येऊ शकते असे तज्ञ म्हणतात. इन्हेलेशन थेरपीमध्ये कॉर्टिकोस्टेरॉईड असतात ज्यामुळे दम्याचे व्यवस्थापन केले जाते. याशिवाय तोंडाने घेतल्या जाणाऱ्या औषधअंच्या तुलनेत कॉर्टिकोस्टेरॉईड हे फार कमी प्रमाणात आवश्यक असतात जेणेकरून श्लेषमाची निर्मीती कमी होते आणि श्वसनमार्गावरील सूज कमी होत. श्वसनमार्ग अधिक संवेदनशील रहात नाही आणि मग दम्याचा अटॅक येण्याची शक्यता देखील कमी होते.
इन्हेलेशन थेरपी हा उपचाराचा एक उत्तम पर्याय असून सुद्धा किती तरी लोक त्यापासून लांब पळतात.मी असे बऱ्याच ठिकाणी बघितले आहे, की लग्न न झालेल्या मुलींचे पालक या उपचाराचा अवलंब करत नाही कारण आपल्यामुलीला दमा असल्याचे त्यांना सांगायचे नसते, कारण दमा असलेल्या मुलीचे लग्न होण्यास समस्या निर्माण होतात असा त्यांचा समज आहे.” त्यामुळे अशा उत्तम उपचार पद्धती दम्यासाठी उपलब्ध असताना, जुन्या समजूतींवर विश्वास ठेवू नका.
– डॉ. चैतन्य जोशी