उच्चरक्तदाबामुळे किडनीवर प्रेशर येते. मगाशी आपण किडनीचे काम पाहिले. या किडनीलाही रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्या असतात. त्यात ब्लॉक निर्माण झाला तर किडनीचे काम नीट होत नाही. कारण रक्तदाबावरून किडनीला काम करण्याचे संकेत मिळत असतात.
उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला डीहायड्रेशन झाले. तर त्याचा रक्तदाब कमी होतो. रक्तदाब कमी झाला म्हणजे पाण्याचे प्रमाण कमी झाले आणि किडनीने युरीन कमी निर्माण करावे, असा संदेश किडनीला दिलेला असतो. हे झाले नैसर्गिक. पण, काही कारणांनी रक्तवाहिन्यात अडथळे निर्माण झाल्यावरही रक्तदाब कमी होतो. रक्तदाब कमी झाल्यावर पाणी साठवून ठेवणे हेच किडनीला माहित असते. त्यामुळे ती पाणी साठवून ठेवू लागते. त्यामुळे परत दाब वाढून उच्चरक्तदाब होतो. ( high bp symptoms in marathi )
किडनी ही शरीराची चाळणी म्हणून काम करते. उदाहरणार्थ तुम्ही चहाची गाळणी पाहिली असेल. तिच्यातून चहा गाळल्यावर ती फाटणार नाही. पण, तिच्या वजनापेक्षा जास्त असलेला लोखंडाचा किस त्यातून चाळल्यावर मात्र ती फाटेल.
किडनीचेही तसेच होते.उच्चरक्तदाबामुळे किडनी अशापद्धतीने फेल होऊ शकते. असाच रक्तदाब डोळ्यांच्या, मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये होऊ शकतो व त्या त्या अवयवाला धोका निर्माण होऊ शकतो. उच्चरक्तदाबामुळे हृदयालाही मोठ्ठा धोका असतो. आपले हृदय म्हणजे रक्त शुद्ध करण्याचा पंपच असतो असे समजा. आणि रक्तवाहिन्या म्हणजे पाईप. या पाईपमध्ये काही अडकल्यावर साहजिक पंपावरही प्रेशर येते. त्याला जास्त काम करावे लागते. त्यामुळे त्याला हानी पोचते. ( high bp symptoms in marathi )
रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळे किंवा त्यात जास्त प्रमाण झाल्यावर रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही. मोठ्या रक्तवाहिन्यांची ही स्थिती तर छोट्यांचे कामही कमी होणारच. त्यामुळे त्याचा शरीरावर दूरगामी परिणाम होतो.