Friday, August 14, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Weight Loss | वाढलेले वजन ‘काही’ महिन्यातच कमी होईल, जाणून घ्या..सर्वात सोपे पण प्रभावी घरगुती उपाय! – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
February 18, 2022
in आरोग्य वार्ता
A A
Weight Loss | वाढलेले वजन ‘काही’ महिन्यातच कमी होईल, जाणून घ्या..सर्वात सोपे पण प्रभावी घरगुती उपाय! – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

वजन वाढणे किंवा लठ्ठपणा ही झपाट्याने वाढणाऱ्या गंभीर आरोग्य समस्यांपैकी एक आहे. आकडेवारीनुसार, भारतातील 40 टक्क्यांहून अधिक लोक लठ्ठ आहेत. वजन वाढल्याने केवळ शरीराचा लूकच खराब होत नाही, तर आरोग्याच्या दृष्टीनेही ही एक अतिशय गंभीर समस्या मानली जाते.

वजन जास्त असल्याने मधुमेह, हृदयविकार यांसारख्या गंभीर आजारांचा धोका अनेक पटींनी वाढतो. यामुळेच सर्व लोकांना त्या उपायांचा वापर करत राहण्याचा सल्ला दिला जातो जेणेकरून वजन सहज नियंत्रित करता येईल. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जीवनशैली आणि आहारातील गोंधळामुळे वजन वाढते, अशा स्थितीत सर्वांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

तज्ज्ञांच्या मते, गेल्या अनेक वर्षांपासून घरातील मोठ्या व्यक्ती अनेक आरोग्य समस्यांसाठी घरगुती उपाय वापरत होत्या. वजन वाढण्याच्या समस्येमध्ये अनेक सोपे उपाय फार प्रभावीपणे काम करू शकतात. शास्त्रज्ञांना देखील बरेच उपाय प्रभावी असल्याचे आढळले आहे. चला, आज जाणून घेऊया लवकर वजन ( Weight loss ) कमी करण्यासाठी घरगुती उपाय. मात्र, तुम्हाला आधीच काही समस्या असल्यास, हे उपाय वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

(1) हिंग मिसळलेले पाणी

वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी हिंग टाकून पाणी पिणे खूप फायदेशीर ठरू शकते. हिंग हे अँटिऑक्सिडंट्स, फायबर, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम आणि कार्बोहायड्रेट्सचे समृद्ध स्रोत आहे. वजन नियंत्रित ठेवण्यासोबतच हे पोषक घटक आरोग्यासाठी इतरही अनेक प्रकारे फायदेशीर मानले जातात. वजन कमी करण्यासाठी कोमट पाण्यात हिंग पावडर घालून पिण्याची शिफारस केली जाते. सर्वोत्तम परिणामांसाठी, सकाळी रिकाम्या पोटी हिंगाचे पाणी पिणे फायदेशीर मानले जाते.

(2) जिरे पाणी

हिंगाच्या पाण्याप्रमाणे जिऱ्याचे पाणी पिणे देखील वजन कमी करण्यात खूप फायदेशीर मानले जाते. जिऱ्याचे पाणी प्यायल्याने चयापचय (मेटाबॉलिज्म) चांगले होते, तसेच शरीरातील विषारी पदार्थही सहज बाहेर पडतात. अभ्यास दर्शविते की निरोगी चयापचय दर राखणे वजन कमी करण्यास मदत करते. पोटाच्या सर्व समस्यांवरही जिऱ्याचे पाणी फायदेशीर मानले जाते.

(3) आले आणि मध मिसळलेले पाणी

तज्ज्ञांच्या मते, आले आणि मधाचे सेवन वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. आल्याचा रस आणि दोन चमचे मध कोमट पाण्यात मिसळून सेवन करता येते. हे दोन्ही चयापचय वाढवण्यासाठी ओळखले जातात ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी जाळण्यास मदत होते. आले जास्त भूक लागण्याची समस्या देखील दूर करते आणि पचन सुधारते. याशिवाय मधाचे सेवन करण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar