Saturday, August 15, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Watermelon Peel Uses: टरबूजाच्या साली फेकू नका! स्क्रबपासून आईस क्यूबपर्यंत…उन्हाळ्यात त्वचेसाठी नैसर्गिक उपाय

by
April 16, 2026
in लाईफस्टाईल
A A
Watermelon Peel Uses: टरबूजाच्या साली फेकू नका! स्क्रबपासून आईस क्यूबपर्यंत…उन्हाळ्यात त्वचेसाठी नैसर्गिक उपाय
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Watermelon Peel Uses: उन्हाळा सुरू झाला की टरबूज खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. थंड, गोड आणि पाण्याने भरलेलं टरबूज शरीराला ताजेतवाने ठेवतं. पण बहुतेक लोक टरबूज खाल्ल्यानंतर त्याच्या साली कचऱ्यात टाकतात. मात्र, या साली आपल्या त्वचेसाठी खूप उपयोगी ठरू शकतात, हे अनेकांना माहीत नसतं. Watermelon Peel Uses

टरबूजामध्ये सुमारे ९५ टक्के पाणी असतं, त्यामुळे ते शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतं. त्याचप्रमाणे त्याच्या सालीतही त्वचेला ओलावा देणारे गुणधर्म असतात. योग्य पद्धतीने वापरल्यास टरबूजाच्या साली नैसर्गिक स्किन केअर प्रॉडक्टसारखं काम करतात. Watermelon Peel Uses

टरबूज खाल्ल्यानंतर त्याची हिरवी बाहेरील साले काढून टाकून आतला पांढरा भाग वेगळा करा. हा भाग त्वचेसाठी खूप फायदेशीर असतो. सर्वात सोपा उपाय म्हणजे हा पांढरा भाग थेट चेहऱ्यावर किंवा हातांवर हलक्या हाताने चोळणे. यामुळे त्वचेला नैसर्गिक ओलावा मिळतो आणि उन्हामुळे होणारी कोरडेपणा कमी होतो. मात्र, चेहऱ्यावर वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे.  Watermelon Peel Uses

दुसरा प्रभावी उपाय म्हणजे टरबूजाच्या सालीसोबत कोरफडीचा (अ‍ॅलोवेरा) जेल वापरणे. टरबूजाच्या सालीचा पांढरा भाग कुस्करून त्यात अ‍ॅलोवेरा जेल मिसळा. ही तयार केलेली पेस्ट रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर किंवा हातांवर लावा. यामुळे त्वचा मऊ, हायड्रेटेड आणि नैसर्गिकरित्या चमकदार दिसू लागते.

उन्हाळ्यात त्वचेला थंडावा देण्यासाठी टरबूजाच्या सालीपासून आईस क्यूब्सही तयार करता येतात. यासाठी सालीचा पांढरा भाग मिक्सरमध्ये कुस्करून त्यात थोडंसं पाणी मिसळा आणि आईस ट्रेमध्ये गोठवा. हे तयार झालेले आईस क्यूब्स दिवसातून एकदा चेहऱ्यावर हलक्या हाताने फिरवा. यामुळे त्वचेला थंडावा मिळतो आणि टॅनिंग कमी होण्यास मदत होते.  Watermelon Peel Uses

तसेच, टरबूजाच्या सालीपासून नैसर्गिक स्क्रबही तयार करता येतो. सालीच्या पेस्टमध्ये थोडी कॉफी मिसळून हा स्क्रब चेहऱ्यावर किंवा हातांवर वापरू शकता. यामुळे मृत त्वचा (डेड स्किन) निघून जाते आणि त्वचा स्वच्छ व तजेलदार दिसते.

टरबूज हे फक्त खाण्यासाठीच नाही, तर त्वचेच्या काळजीसाठीही खूप उपयुक्त आहे. मात्र, कोणताही उपाय वापरण्यापूर्वी आपल्या त्वचेचा प्रकार लक्षात घेणे गरजेचे आहे. शक्य असल्यास तज्ज्ञांचा सल्लाही घ्यावा. Watermelon Peel Uses

एकंदरीत, टरबूजाच्या साली फेकण्याऐवजी त्यांचा योग्य वापर केल्यास उन्हाळ्यात त्वचेची नैसर्गिक काळजी घेता येते.

“}]]

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar