[[{“value”:”
Watermelon or Muskmelon: उन्हाळा सुरू झाला की बाजारात टरबूज आणि खरबूज मोठ्या प्रमाणात दिसू लागतात. दोन्ही फळं शरीराला थंडावा देणारी आणि पाण्याची कमतरता भरून काढणारी मानली जातात. उष्णतेच्या दिवसांत शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी अनेकजण या फळांचा आहारात समावेश करतात. मात्र, अनेकांच्या मनात प्रश्न असतो की टरबूज आणि खरबूज यापैकी नेमकं कोणतं फळ जास्त फायदेशीर आहे?
टरबूजामध्ये जवळपास ९० ते ९२ टक्के पाणी असतं. त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी हे फळ खूप उपयोगी ठरतं. उन्हाळ्यात घाम जास्त येत असल्यामुळे शरीर डिहायड्रेट होण्याचा धोका वाढतो. अशा वेळी टरबूज शरीराला थंडावा देण्याचं काम करतं. यामध्ये व्हिटॅमिन सी, लाइकोपीन आणि अँटिऑक्सिडंट्सही भरपूर प्रमाणात असतात. हे घटक हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. तसेच कमी कॅलरी असल्यामुळे वजन कमी करणारे लोकही टरबूज खाणं पसंत करतात. (Watermelon or Muskmelon)
दुसरीकडे खरबूजामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फायबर आणि इतर अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यास मदत होते. खरबूज पचनसंस्थेसाठीही चांगलं मानलं जातं. त्यातील फायबरमुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटतं आणि वारंवार भूक लागत नाही. डोळे आणि त्वचेसाठीही खरबूज फायदेशीर मानलं जातं. उन्हाळ्यात थकवा कमी करण्यासाठी आणि शरीराला ऊर्जा देण्यासाठीही हे फळ उपयुक्त ठरतं.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दोन्ही फळांचे फायदे वेगवेगळे आहेत. जर शरीर पटकन डिहायड्रेट होत असेल किंवा उष्णता जास्त जाणवत असेल तर टरबूज अधिक फायदेशीर ठरू शकतं. कारण त्यात पाण्याचं प्रमाण जास्त असतं. मात्र, पचन सुधारायचं असेल किंवा रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर खरबूज चांगला पर्याय ठरतो.
तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात या दोन्ही फळांचा संतुलित प्रमाणात आहारात समावेश करणं उत्तम ठरतं. त्यामुळे शरीराला आवश्यक पोषण, थंडावा आणि ऊर्जा मिळण्यास मदत होते. मात्र, कोणतंही फळ अतिप्रमाणात खाणं टाळावं आणि आरोग्याच्या समस्यांबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. (Watermelon or Muskmelon)
“}]]
