आपल्या शरीरासाठी पाणी ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्वचेला नितळ ठेवण्याचं काम हे पाणीच करतं. पचनशक्ती सुधारते. मात्र पाणी पिण्याचेही काही महत्वाचे नियम आहे. कधीही प्यायलं तर अपायही होऊ शकतो. जाणूण घ्या
झोपताना पाणी पिणे योग्य की अयोग्य…
आपल्यापैकी अनेकांना झोपतांना पाणी पिण्याची सवय असते. सवयीचा भाग म्हणून किंवा कुठेतरी चूकीची माहिती ऐकून झोपताना तहान नसतानाही पाणी पिण्यामुळे वारंवार सर्दी होणे, केस फार गळणे, नाक ,कान, घसा, डोके यांच्या अनेक प्रकारच्या तक्रारी उद्भवतात. जेवण सूर्य मावळन्या पूर्वी किंवा साडेसात पूर्वी होत असेल तर झोपण्यापूर्वी अर्धा तासापर्यंत तहने च्या प्रमाणात पाणी पिण्यास हरकत नाही.
पाणी किती, कसं, केव्हा प्यावं…
तहान लागेल तेव्हाच, लागेल तेवढंच थोडे थोडे पाणी पिणे आपल्या शरीरासाठी योग्य आहे. खूप तहान लागते म्हणून एकाच वेळी तांब्याभर पाणी पिणे योग्य नाही कारण तहान ही संवेदना जिभेला व घशाला होत असते पोटपोटाला नव्हे! म्हणून कडक भूके प्रमाणे कडक तहान लागल्यानंतरच पाणी हे घोट घोट बसून ग्लासला तोंड लावून प्यावे. तोंडामध्ये काही वेळ धरून त्यात लाळ मिसळू द्यावी आणि मग प्यावे असे केल्यानंतर अगदी कमी प्रमाणात सुद्धा पिलेल्या पाण्यामुळे तहान भागते आणि ते पाणी पचायलाही सोपे जाते.