पुणे – जर आपण लठ्ठपणामुळे त्रस्त असाल आणि लवकरात लवकर ते कमी करू इच्छित असाल तर एक गोष्ट स्पष्टपणे समजून पाहिजे की, चरबी कमी करण्यासाठी मेटाबॉलिजम (चयापचय) जास्त असणे आवश्यक आहे.आपल्याला आवश्यकतेनुसार जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने घ्यावी लागतील. व्यायाम करायला वेळ नाही, डाएट करणे जमत नाही, असं जर तुम्ही म्हणत असाल तर वजन कमी करण्यासाठी एक सोपा उपाय ऐका. आम्ही तुम्हाला खाण्यापिण्यातल्या काही पदार्थांबद्दल सांगत आहोत जे खायला चवदार असण्याबरोबरच जाडीविरूद्धच्या तुमच्या लढाईत मदत करेल. चला त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.
1.अक्रोड आणि बदाम:
बदाम भूक मारतो. ते खाल्ल्यानंतर तुम्हाला पूर्ण पोट भरल्यासारखे वाटेल. त्याच वेळी अक्रोड हाडे मजबूत करण्यासाठी कार्य करते. म्हणून, दररोज भिजवलेले चार ते पाच बदाम आणि अक्रोड खा.
2.अंडी:
अंड्यात सुमारे 5 ग्रॅम प्रथिने असतात. अंडी पचवण्यासाठी चरबी आवश्यक असते. उकडलेले अंडी अधिक खाऊ शकता. कोलेस्टेरॉलची पातळी जास्त असल्यास, अंड्यातील पिवळ बलक काढून टाका. अंड्याचा पांढरा भाग शुद्ध प्रथिनेयुक्त आहे.
3.मूग डाळ:
या डाळीमध्ये ए, बी, सी आणि ई जीवनसत्त्वे असतात. कॅल्शियम, लोह आणि पोटॅशियम सारखे खनिज पदार्थदेखील खूप असतात. कोंब फुटल्यानंतर मूग खाणे चांगले. याचे सोपे चाट करू शकता. मोड आलेले मूग, थोडे टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, चाट मसाला आणि लिंबू. बस एकत्र मिसळा आणि भरपूर खा..
4. दूध:
ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांच्यासाठी आणि जे वजन कमी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी देखील दूध आवश्यक आहे. म्हणूनच त्याला सुपरफूड म्हणतात. वजन कमी करण्यासाठी स्किम्ड किंवा दुहेरी टोन्ड असलेले दूध प्या. शंभर ग्रॅम दुहेरी टोन्ड दुधामध्ये तीन ग्रॅम प्रथिने असतात. दूध आपल्या आणि वृद्धावस्थेच्या दरम्यान अडथळ्यासारखे उभे राहते. व्यायाम करताना बिनधास्त दोन ग्लास गरम दूध प्या.
5. हिरव्या भाज्या आणि तपकिरी तांदूळ (ब्राऊन राईस) :
आपल्या सर्वांना त्याबद्दल माहितीच असेलच. उकडलेले किंवा कच्चे, तुम्ही हिरव्या भाज्या पोटभर खाऊ शकता. येथे ब्रोकलीचा उल्लेख करणे आवश्यक आहे. ते फुलकोबीसारखे दिसते. हे चयापचय गतिमान करते. तपकिरी तांदूळ फायबरसमृद्ध आहे. एकदा याची सवय झाली की पांढरा तांदळाची सवय आपोआप सुटते.
जाता जाता आणखी एक गोष्ट समजून घ्या. वजन कमी करणे सोपे काम नाही. अन्नावर नियंत्रण ठेवून, आपण वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवू शकाल, परंतु आपण वर्षानुवर्षे जमा केलेली चरबी केवळ नियमित व्यायामच घालवू शकते.