Friday, December 5, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

फॅट्स कमी करायचं आहे? मग फॉलो करा या बेसिक टिप्स!

by प्रभात वृत्तसेवा
December 27, 2020
in फिटनेस
A A
फॅट्स कमी करायचं आहे? मग फॉलो करा या बेसिक टिप्स!
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

शरीरामध्ये साठलेली चरबी आणि हाताबाहेर वाढलेले वजन यांमुळे व्यक्ती अनाकर्षक तर दिसू लागतेच, पण त्याशिवाय वाढणारे वजन आणि चरबी अनेक आजारांना निमंत्रण ठरू शकते. त्यामुळे वजन घटविण्यासाठी आहारावर नियंत्रण आणि सक्रिय जीवनशैली यांची आवश्‍यकता असते.

अनेक जण आहारामध्ये तात्पुरते बदल करून, भरपूर व्यायाम करून वजन घटविण्यात यशस्वी होतातदेखील, मात्र एकदा वजन कमी झाल्यानंतर आहार पूर्वपदावर जातो आणि घटलेले वजन पुन्हा वाढू लागते. त्यामुळे वजन आणि शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करावयाचे असल्यास आहाराशी आणि जीवनशैलीशी निगडित काही सवयींचा अवलंब कायमस्वरूपी असायला हवा.

वजन घटविण्यासाठी आहारामध्ये फायबरची मात्रा योग्य असणे आवश्‍यक आहे. ताज्या भाज्या, फळे यांच्या माध्यमातून शरीराला आवश्‍यक ते फायबर मिळत असते. फायबरमुळे पोट दीर्घकाल भरलेले राहून भूक लवकर शमते, तसेच यामुळे पचनक्रिया अधिक सक्रिय होते. फायबरमुळे शरीरातील इन्सुुलीनची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. या साठी शरीराला दररोज 25 ते 30 ग्राम फायबरची आवश्‍यकता असते. फायबर सोबतच आपल्या आहारामध्ये प्रथिनांचाही समावेश असायला हवा.

ताज्या भाज्या, मासे, अंडी, इत्यादी पदार्थांमध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणावर असतात. यांमुळे स्नायूंना बळकटी मिळून शरीरातील चरबी घटण्यास मदत होत असते.

आपल्या आहारामध्ये व्हाईट कार्ब्स, म्हणजेच मैद्यापासून बनलेल्या पदार्थांचा समावेश मर्यादित असावा. साखर, पास्ता, ब्रेड, केक सारखे पदार्थ थोड्याच प्रमाणात खाल्ले जावेत, तसेच बटाटा आणि भातदेखील मर्यादित प्रमाणात खाल्ला जावा. शरीरामध्ये योग्य आर्द्रता ठेवण्यासाठी आवश्‍यक त्या प्रमाणात पाणी पिणेही महत्वाचे आहे. पोषक घटक पाण्याच्या

माध्यमातून शरीरामध्ये पोहोचविले जात असतात. त्यामुळे पाण्याचे सेवन आवश्‍यक आहे. आपल्या आहारातून साखरयुक्त पेये, सोडा किंवा तत्सम पेये वर्ज्य करावीत. तसेच चहा व कॉफीचे प्रमाणही मर्यादित असावे. शक्‍य असेल, तेव्हा चहा किंवा कॉफीऐवजी साधे पाणी, नारळ पाणी, ताज्या भाज्यांचा किंवा फळांचा (साखरविरहित) रस, ताजे ताक यांचा समावेश आहारामध्ये असावा.

व्यायाम करत असताना कार्डियोचे प्रमाण योग्य असावे. या प्रकारचे व्यायाम केल्याने शरीरातील चरबी वेगाने घटू लागते हे खरे असले, तरी हे व्यायाम प्रमाणाबाहेर केल्याने कालांतराने शरीर चरबी सोबत मसल बर्न देखील करू लागते. त्यामुळे अश्‍या व्यायामाचे प्रमाण आठवड्यातून तीस मिनिटांची तीन ते चार सेशन्स, इतकेच असावे.

आहार, व्यायाम, आर्द्रता, यांच्याबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य प्रमाणात घेतलेली झोप. शरीरातील चरबी घटण्याची प्रक्रिया व्यक्ती झोप घेत असताना सुरु असते. त्यामुळे आठ ते नऊ तासांची सलग विश्रांती शरीराला मिळणे आवश्‍यक आहे. वजन घटविण्याची प्रक्रिया ही प्रत्येकाच्या शरीराच्या बाबतीत निरनिराळ्या वेगाने घडून येणारी आहे. त्यामुळे इतरांशी तुलना न करता सातत्याने प्रयत्न सुरु ठेवणे आवश्‍यक आहे.

Tags: aarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagarArogyaparvblood pressurecholesteroldaily dietfitnesshealthhelth tipslife stylelife style aarogya jagarMAHARASHTRArajgiraskintopnewsआरोग्य जागरआहार
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar