Friday, August 14, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

काळेभोर लांबसडक केस हवेत? तर हे उपाय नक्की करा

by प्रभात वृत्तसेवा
April 16, 2021
in आरोग्यपर्व
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पुणे – ओ हसीना जुल्फोवाली किंवा ये हे रेशमी जुल्फों का … अशी कितीतरी गाणी आठवली की समोर येतात काळेभोर दाट केस, हो ना ? आणि याविरुद्ध बाला, उजडा चमन चित्रपट बघितले कि लक्षात येते केसांची समस्या किती मोठी आहे. केस, सुंदर दिसण्याचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. अनेक तेल, शॅम्पू, केमिकल्स, जेल, रंग मोठया प्रमाणावर मार्केटमधे दिसतात व खरेदी केल्या जातात. बरं केमिकल्सयुक्त उत्पादने हानीकर होऊ शकतात हे त्यावर लिहिलेले असूनही सर्रास वापरले जातात. पण याऐवजी काही घरगुती उपाय केसांच्या समस्या दूर करण्यासाठीफायदेशीर ठरतात…

निरोगी केसांसाठी हे उपाय करा –

लोह –  लोहयुक्त आहार घेऊन किंवा लोखंडाची कढई, तवा, चमचे यांचा वापर रोजचे जेवण बनवतांना करा. लोहाची कमतरता दूर होण्यास मदत होऊ शकते. तसेच आहारात बीट, शेंगदाणे, गुळ यांचा वापर वाढवून आपण रक्तातील लोहाचे प्रमाण वाढवू शकतो. शरीरात योग्य प्रमाणात लोह असेल तर केसांचे आरोग्य चांगले राहते. केसांची गळती कमी होते.

व्हिटामिन A – आपल्या सर्वांनाच माहीत आहे गाजर, पपई यासारखी नारंगी व पिवळ्या रंगाची फळे व भाज्या व्हिटामिन A चा मुख्य स्रोत आहे. व्हिटामिन A च्या कमतरतेमुळे केसांमध्ये खाज उत्पन्न होते, केसांची मुळे कुमकुवत होतात, तसेच स्काल्प वर जखमा होतात, अशावेळी व्हिटामिन A खूप उपयोगी असते.

व्हिटामिन B – व्हिटामिन B चे अनेक प्रकार आहेत. B7 केसांसाठी उपयुक्त असून याच्या कमतरतेमुळे केस गळतात, लहान मुलांची वाढ खुंटते. तसेच विटामिन बी कमतरतेमुळे अनेमिया, तोंड येणे, मुंग्या येणे, झोप न लागणे अशी अनेक लक्षणे आपल्याला दिसतात. मुख्य स्रोत म्हणजे दूध, पनीर, मांस, मासे हे होय. हिरव्या पालेभाज्या मध्ये बी जीवनसत्व नसते.

व्हिटामिन D – यामुळे केस गळतात हाडे कमजोर होतात. हाडे कमजोर झाली की केस गळतात. व्हिटामिन D मुख्य स्रोत सूर्यप्रकाश, सकाळचे कोवळे ऊन आहे.

Tags: Arogyaparvlife style
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar