Tuesday, May 12, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Walking For Heart Health: रोज इतकी पावले चालण्याचा निर्णय घ्या, हृदयासोबत पोटाचं आरोग्यही राहील मजबूत

by
January 2, 2026
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Walking For Heart Health: आपण सर्वांनी नवीन वर्ष्यात प्रवेश केला आहे. अशा वेळी पहिला आणि सर्वात महत्त्वाचा न्यू इयर रिझोल्यूशन म्हणजे स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य देणं. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, दररोज फक्त १०,००० पावले चालणं आपल्या शरीरासाठी वरदान ठरू शकतं.

चालण्याचे फायदे काय?

दररोज चालल्यामुळे हृदय रक्त अधिक चांगल्या पद्धतीने पंप करतं. यामुळे रक्तवाहिन्या लवचिक राहतात आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. यासोबतच चालण्याचा पोटाच्या आरोग्यावर (गट हेल्थ) देखील थेट सकारात्मक परिणाम होतो.

शारीरिक हालचालींमुळे पोटातील चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढते. यामुळे पचन सुधारतं आणि मेटाबॉलिझमही चांगला राहतो. त्यामुळे महागड्या जिमपेक्षा एक जोडी आरामदायक बूट आणि ताजी हवा यासोबत आपल्या फिटनेस प्रवासाला सुरुवात करा.

हृदय निरोगी राहते

चालणे हृदयासाठी अत्यंत प्रभावी एरोबिक व्यायाम आहे. नियमित चालल्यामुळे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि चांगलं कोलेस्ट्रॉल वाढतं. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका ३०–४० टक्क्यांनी कमी होऊ शकतो. यासाठी रोज ब्रिस्क वॉकिंग (थोडं वेगाने चालणं) करण्याची सवय लावा.

पोटाचं आरोग्य आणि इम्युनिटी मजबूत

चालण्यामुळे आतड्यांची हालचाल वाढते, त्यामुळे बद्धकोष्ठतेसारख्या समस्या कमी होतात. आरोग्यदायी पोट म्हणजे मजबूत रोगप्रतिकारशक्ती, कारण आपल्या शरीरातील सुमारे ७० टक्के इम्युनिटी पोटाशी संबंधित असते. चांगली गट हेल्थ मनःशांती आणि मूड सुधारण्यासही मदत करते.

वजन आणि डायबिटीज नियंत्रणात

दररोज १०,००० पावले चालल्याने कॅलरी बर्न होण्याची प्रक्रिया वेगवान होते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. चालण्यामुळे इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारते आणि टाइप-२ डायबिटीजचा धोका कमी होतो. पोटावरची चरबी कमी करण्याचा हा सर्वात सोपा आणि स्वस्त उपाय आहे.

१० हजार पावले कशी पूर्ण कराल?

जर एकाच वेळी १०,००० पावले चालणं कठीण वाटत असेल, तर ती टप्प्याटप्प्याने पूर्ण करा.

सकाळी: ३,००० पावले
दुपारच्या जेवणानंतर: २,००० पावले
संध्याकाळी: ५,००० पावले

लिफ्टऐवजी जिने वापरा, फोनवर बोलताना थोडं चालत बोला. २०२६ मधली ही छोटी सुरुवात तुम्हाला दीर्घकाळ निरोगी आणि सक्रिय ठेवण्यास मदत करेल.

 

Join our WhatsApp Channel

The post Walking For Heart Health: रोज इतकी पावले चालण्याचा निर्णय घ्या, हृदयासोबत पोटाचं आरोग्यही राहील मजबूत appeared first on Dainik Prabhat.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar