पुणे – कॉन्टॅक्ट लेन्सेसचा (use contact lense) योग्य वापर केल्यास ते चष्म्यांसाठी उत्तम पर्याय आहेत. ते दृष्टीमधील सुस्पष्टता व अचूकता वर्धित करतात, असे असतानादेखील त्यांच्या वापरामध्ये काही धोके सुद्धा आहेत. आजकाल लेन्सेसचा वापर अधिकाधिक प्रमाणात होत आहे, ज्यामुळेच उत्पादन कंपन्या दर्जा व आरामदायी सुविधेसंदर्भात उच्च असलेल्या लेन्सेसची निर्मिती करतात.
लेन्सेस परिधान करून झोपू नका
जेव्हा तुम्ही झोपता, तेव्हा डोळे कोरडे होतात, तसेच डोळ्यांना होणारा ऑक्सिजन पुरवठादेखील कमी होतो आणि अशावेळी जर तुम्ही लेन्स परिधान केलेली असेल, तर डोळ्यांना कॉर्नियाचा संसर्ग होऊ शकतो. यामुळे गंभीर समस्या निर्माण होऊन दृष्टीवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. सर्वोत्तम पर्याय म्हणजे झोपताना लेन्स परिधान करूच नये.
कॉन्टॅक्ट लेन्सेसची (use contact lense) योग्यरीत्या काळजी घ्या
दर्जात्मक कॉन्टॅक्ट लेन्स (use contact lense) सोल्यूशन्ससह आपल्या हाताच्या तळव्यावर स्वच्छ बोटांनी लेन्सेस हळुवारपणे साफ करा. पाण्याचा वापर कधीच करू नका. दररोज लेन्स केसमधील सोल्यूशन बदला. दर महिन्याला सोल्यूशनची बाटली बदला. दर महिन्याला लेन्स केस बदला. वार्षिक किंवा सहामाही वापरण्यात येणाऱ्या लेन्सेसपेक्षा मासिक डिस्पोजेबल लेन्सेसचा वापर करा. शेवटचे म्हणजे, लेन्स व केस खाली पडल्यास टाकून द्या आणि नवीन लेन्सेस व लेन्स केसचा वापर करा. तसेच, पोहताना लेन्सचा वापर करू नका आणि चुकून केल्यास लेन्स टाकून द्या.
कॉन्टॅक्ट लेन्सचा अतिवापर
कॉर्नियल अल्सर हा डोळ्याच्या बाहेरील पारदर्शक भागाला होणारा संसर्ग आहे, यामुळे दृष्टी गमावण्याचा धोका निर्माण होतो. पोहताना कॉन्टॅक्ट लेन्सचा (use contact lense) वापर केल्यास स्यूडोमोनास जीवाणू किंवा असेन्थ अमिबा परजीवीची निर्मिती होते; यामुळे डोळ्यांना वेदना होतात, डोळे लालसर होतात, डोळ्यांमधून पाणी येते आणि अस्पष्ट दिसू लागते. अशी स्थिती उदॅभवल्यास त्वरित कॉर्निया स्पेशालिस्टकडे जाऊन त्वरित डोळ्यांमध्ये ऍन्टिबायोटिक थेंब टाकण्याची गरज असते. जर बुरशीजन्य किंवा एसेन्थअमिबा संसर्ग असेल, तर 3 महिन्यांपर्यंत उपचाराची आवश्यकता असते. कदाचित कॉर्नियल प्रत्यारोपणासह कॉर्निया बदलण्याची गरज भासू शकते.
जायंट पेपिलरी कंजन्क्टिव्हिटीज (जीपीसी)
निर्धारित केलेल्या कालांतराने कॉन्टॅक्ट लेन्स (use contact lense) न बदलल्यामुळे हा आजार होतो. या आजाराचा लेन्सेसवर देखील परिणाम होतो, ज्यामुळे डोळ्यांची जळजळ होत पापण्यांच्या खाली पॅपिला नावाचा कणीदार थर निर्माण होतो, जाण्याचा आकार मोठा असतो. याचा कॉर्नियावर परिणाम होऊन तीव्र वेदना होण्यासोबतच फोटोफोबिया (प्रकाश सहन न होणे) होतो व डोळे अतिप्रमाणात लाल होतात. काही काळासाठी लेन्स वापर थांबवून, ल्युब्रिकेटिंग ड्रॉप्सचा वापर आणि मासिक कालांतराने बदला येऊ शकणाऱ्या उच्च उत्तम डीके (ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची क्षमता असलेल्या) लेन्सेसचा वापर करण्याच्या माध्यमातून उपचार करता येतो.
कॉन्टॅक्ट लेन्स (use contact lense) असोसिएटेड रेड आय
क्लेअर या आजारामध्ये डोळे लालसर होतात, जे झोपताना लेन्सेस परिधान केल्यामुळे होते. लेन्सेस अधिक घट्ट बसवल्यास कॉर्नियाला ऑक्सिजनचा पुरवठा कमी प्रमाणात होतो, ज्यामुळे हा आजार उद्भवतो. हा आजार गंभीर नसला, तरी संसगार्मुळे डोळ लालसर होत असल्यामुळे आजाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. उपचारामध्ये एक आठवडा किंवा अधिक काळापर्यंत लेन्सेसचा वापर थांबवणे, ल्युब्रिकण्ट्स व ऍन्टिबायोटिक ड्रॉप्सचा वापर आणि योग्यरीत्या फिट होण्याकरिता लेन्सेसमधील बदल अशा पद्धतींचा समावेश आहे.
नेहमी व्यावसायिकाचा सल्ला घ्या
तो तुम्हाला लेन्सेस कशाप्रकारे परिधान करावीत आणि त्यांची स्वच्छता कशाप्रकारे राखावी याबाबत माहिती देतो. तसेच लेन्सेस परिधान करण्याची गरज आहे की नाही या खात्रीकरिता डोळ्यांची तपासणी देखील करतो. तो लेन्स बरोबर बसली आहे की नाही आणि डोळ्यांमधून योग्यरीत्या बाहेर येते की नाही, याचीदेखील तपासणी करतो, जे कॉर्नियाला आवश्यक असलेला ऑक्सिजन पुरवठा राखण्यासाठी महत्त्वाचे आहे. तो तुम्हाला धोक्याच्या लक्षणांसंदर्भात सूचनासुद्धा देतो आणि दुष्परिणाम टाळण्यासाठी डोळ्यांची तपासणीदेखील करतो.
दैनंदिन प्रवासातही वाऱ्याचा त्रास अधिक होतो. वाऱ्यामुळे डोळ्यांना इजा होत नाही, मात्र डोळे लाल होतात. डोळ्यांत धूळ, कचरा जाण्याची शक्यता असते. चष्म्याचाही फारसा उपयोग होत नाही. अशा वेळी डोळे चोळू नयेत. पाण्याने स्वच्छ धुवावेत. गुलाबपाण्याच्या घड्या डोळ्यांवर ठेवाव्यात.
आजकाल ऑफिसमध्ये वा घरी सर्रास कॉम्प्युटरचा वापर अपरिहार्य असला तरी सलग दोन-तीन तास कॉम्प्युटरवर काम करू नये. मध्ये थोडी विश्रांती घ्यावी. कॉम्प्युटरच्या स्क्रीनकडे टक लावून पाहू नये. थोड्या थोड्या वेळाने डोळे मिचकावेत. लांबच्या वस्तूकडे पाहावे. कॉम्प्युटर स्क्रीन आपल्या नजरेपेक्षा वर असू नये.
सतत सुरू असलेल्या एअरकंडिशनमुळे डोळे कोरडे पडतात. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार एसीचा त्रास होता. त्यामुळे सातत्याने एसीमध्ये बसणाऱ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्यावीत.
जागरणांमुळे डोळ्यांचे कायमस्वरूपी किंवा गंभीर विकार होत नसले तरी डोळे सुजणे, लाल होणे असा तात्पुरता त्रास होतो. यासाठी शीतोपचार करावेत. डोळ्यांवर गुलाबपाण्याच्या, कोलन वॉटरच्या घड्या ठेवाव्यात. दुधासारखे थंड पदार्थ घ्यावेत.
अ जीवनसत्त्व डोळ्यांसाठी पोषक असते. म्हणूनच र्स्वांनी हिरव्या पालेभाज्या, पपई व आंबे अशी फळे व गाजर नियमित खावे.
चाळिशीनंतर काचबिंदू विकार होण्याची शक्यता असते. त्याचे निदान लगेचच होईल असे नाही. त्यामुळे चाळिशीनंतर डोळ्यांची तपासणी अवश्य करावी.
– डॉ. जयदीप महाजन