बहुतेक लोकांना माहीत आहे की, जीवनसत्त्व “ड’ हाडांच्या आरोग्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. पण, स्नायूंमधील समस्या व जीवनसत्त्व डफ यांच्यामधील संबंधांबाबत फारसे कोणाला माहीत नाही. जीवनसत्त्व ड च्या कमतरतेमुळे स्नायूंमध्ये वेदना, लठ्ठपणा, आजारी पडण्याचा धोका व स्नायू अशक्त होण्याची शक्यता असते. वृद्ध व्यक्तींना याचा अधिक धोका असतो.
जीवनसत्त्व ड’ च्या कमतरतेमुळे थकवा व शरीरातील ऊर्जा कमी होणे अशा समस्याही उद्भवू शकतात. यामुळे व्यक्तीच्या सामाजिक, कौटुंबिक जीवनासोबतच कामकाजावरही अनिष्ट परिणाम होऊ शकतो.( vitamin d benefits )
ऍडव्हान्स सिस्टेमिक इलनेस (उदा. अवस्था अत्यंत बिकट होणे), महत्त्वाच्या अवयवांची अकार्यक्षमता (उदा. हृदयाघात, हृदयविकाराचा झटका, क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह एअर वे डिस्ऑर्डर, अंतिम टप्प्यात असलेला यकृताचा आजार, तीव्र ऍनेमिया, मायक्झेडेमा, अंतिम टप्प्यात असलेला मूत्रपिंडाचा आजार, प्रगत टप्प्यात असलेला संधिवात रोग इत्यादी) किंवा गंभीर स्वरूपाचे आजार (उदा. संसर्ग, मानसिक आजारांना वगळण्यात आले आहे.) अशा आजारांमध्ये रुग्णांमधील थकव्याचे निदान करण्यात येते. सामान्यत: कर्करोगापासून पीडित रुग्णांमध्ये दिसून येणारा थकवा जीवनसत्त्व ड ची पातळी वाढल्यास बरा होऊ शकतो.
जर दीर्घकाळापर्यंत जीवनसत्त्वाचे प्रमाण कमीच राहिले तर हाडांची झीज (ऑस्टेमेलेसिया) होऊ शकते आणि कॉम्पेन्सेटरी पॅराथायरॉईड हार्मोन (पीटीएच) (दुय्यम हायपर पॅराथायरोडीझ्म) वाढू शकते. ऑस्टेमेलेसिया हा पाठीच्या कण्यामधील वेदनांशी संबंधित आजार आहे आणि हा आजार वाढत गेल्यास स्नायू अशक्त होऊ शकतात व हाडे कमकुवत होऊ शकतात. जीवनसत्त्व “ड’ च्या कमतरतेमुळे स्नायूंमध्ये वेदना होणे, हाडांमध्ये वेदना होणे व थकवा येणे अशी स्थिती उद्भवू शकत असल्यामुळे जीवनसत्त्व ड ची पातळी तपासणे आणि या पातळ्या योग्य प्रमाणात राखण्याचा प्रयत्न करणे ही गंभीर समस्या बनली आहे.
जीवनसत्त्व “ड’ सप्लीमेंटेशन ( vitamin d benefits )
जीवनसत्त्व ड ची योग्य पातळी 75-110 एनमोल/एल आहे. बदललेली जीवनशैली व व्यस्त शेडयुलमुळे नसगक स्त्रोतांमधून आवश्यक प्रमाणात जीवनसत्त्व ड मिळवणे अशक्य बनले आहे. सामान्य आहारामधून पुरेशा प्रमाणात जीवनसत्त्व ड मिळत नाही. यामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या उच्च दर्जाच्या जीवनसत्त्व-ड सप्लीमेंट्सचा आधार घेतला जातो.
सामान्य आरोग्यदायी प्रौढ व्यक्तीसाठी व्हिटॅमिन डी 3 (कोलेकॅल्सिफेरोल) देता येऊ शकते. आज, अनेकजण जीवनसत्त्व ड सप्लीमेंट्सचे सेवन करत आहेत. तरीदेखील त्यांना फारसा फायदा होत नाही. म्हणून सकाळच्या वेळी उपाशी पोटी अर्धा चमचा लोणी किंवा सायीच्या दुधामधून जीवनसत्त्व “ड’ सप्लीमेंट्स घ्यावीत.
सार्कोइडोसिस, मूत्रपिंड आजार, ल्युकेमिया, लिम्फोमा, मायलोमा, हायपर पॅराथायरोडीझ्म व हायपर कॅल्सेमिया अशा आजारांपासून पीडित रुग्णांनी विशेष काळजी घेण्यासोबतच सावधानता बाळगली पाहिजे. थायरॉईड औषधांचे उच्च डोस घेत असलेल्या थायरॉईड पीडित रुग्णांना अतिरिक्त जीवनसत्त्व ड’सप्लीमेंटची आवश्यकता आहे.( vitamin d benefits )