Valentine Week : प्रेम ज्याला ना सीमा थांबवू शकल्या, ना धर्माच्या भिंती… प्रेमाला मिळवण्यासाठी आजपर्यंत अनेक त्याग केले आहेत. वर्षातील एक महिना हा प्रेमाचा म्हणून ओळखला जातो. तेव्ह हा फेब्रुवारी प्रेमाच्या महिन्याचामहिना सध्या सुरु आहे. त्यातील आता प्रेमाचा आठवडा आजपासून सुरु झाला आहे. लैला-मजनून, रोमिओ-ज्युलिएट, हीर-रांझे यांसारख्या प्रेमिकांचा सप्ताह ज्यांनी सर्वस्व पणाला लावले पण आपल्या प्रेमाचा त्याग होऊ दिला नाही.
आजपासून म्हणजे ७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीक सुरू होत आहे. पुढेच 7 दिवस हा प्रेमाचा आठवडा म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो. त्याचा पहिला दिवस म्हणजे रोज डे. दुसरा प्रपोज डे…असे करत शेवटी व्हॅलेंटाईन डे येतो. अशा प्रकारे, प्रेमात पडलेले लोक वेगवेगळ्या दिवसांनुसार एकूण 7 दिवस आपल्या जोडीदारासोबत हा प्रेमाचा आठवडा साजरा करतात. दरम्यान आजपासून सुरु होणाऱ्या आठवड्यात कोणत्या तारखेला कोणता दिवस साजरा करण्यात येतो याची माहिती घेऊ….
७ फेब्रुवारी- रोझ डे (Rose Day )
व्हॅलेंटाईनचा पहिला दिवस म्हणजे रोज डे. या दिवशी तुम्ही ज्या व्यक्तीवर खूप प्रेम करता त्या व्यक्तीला तुम्ही लाल गुलाब देऊ शकता. लाल गुलाब प्रेमाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे आपल्या जोडीदारावर आपले असणारे प्रेम यातून व्यक्त केले जाते.
८ फेब्रुवारी- प्रपोज डे (Propose Day)
व्हॅलेंटाईन वीकचा दुसरा दिवस प्रपोज डे म्हणून साजरा केला जातो. सर्व प्रेमी या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात. प्रेम व्यक्त करणाऱ्यांसाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो. जर तुमचे कोणावर अपार प्रेम असेल तर ते या दिवशी व्यक्त करा.
९ फेब्रुवारी – चॉकलेट डे ( Chocolate Day)
व्हॅलेंटाईन वीकचा तिसरा दिवस चॉकलेट डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी, जोडपे एकमेकांना खास चॉकलेट, चॉकलेट गुच्छे, चॉकलेट बास्केट भेट देऊन हा दिवस त्यांच्यासाठी खास बनवू शकतात.
10 फेब्रुवारी- टेडी डे (Teddy Day)
असं म्हणतात मुलींना टेडी खूप आवडतात. व्हॅलेंटाईन वीक सुरू होताच अनेक प्रकारचे छोटे-मोठे टेडी बाजारात उपलब्ध होऊ लागतात. व्हॅलेंटाईन वीकच्या चौथ्या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराचा दिवस त्यांना टेडी देऊन खास बनवू शकता.
11 फेब्रुवारी- प्रॉमिस डे (Promise Day)
कोणतेही नाते तेव्हाच टिकते जेव्हा तुम्ही त्या नात्याबाबत दिलेली वचने पूर्ण करता. व्हॅलेंटाईन वीकचा पाचवा दिवस प्रॉमिस डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रेमी आयुष्यभर एकमेकांवर प्रेम आणि समर्थन करण्याचे वचन देतात. तुम्ही तुमच्या जोडीदाराला वचन देऊन त्याचा दिवस खास बनवू शकता.
12 फेब्रुवारी- हग डे (Hug Day )
मिठी मारणे तुमच्या नात्यातील प्रेम दर्शवते. अनेक संशोधनातून असेही समोर आले आहे की मिठी मारणे तुमच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. व्हॅलेंटाईन वीकच्या सहाव्या दिवशी हग डे साजरा केला जातो. या दिवशी एकमेकांना मिठी मारून प्रेम व्यक्त केले जाते.
१३ फेब्रुवारी- चुंबन दिवस (Kiss Day )
7 वा दिवस ‘Kiss Day’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी तुम्ही तुमच्या मैत्रिणीचे हात आणि कपाळाचे चुंबन घेऊन तुमचे प्रेम व्यक्त करू शकता आणि तिला सांगू शकता की तुमचे आयुष्य फक्त तिच्यासोबत आहे. यामुळे तुमची पत्नी किंवा गर्लफ्रेंडला स्पेशल वाटेल.
14 फेब्रुवारी- व्हॅलेंटाईन डे (Valentine Day)
व्हॅलेंटाईन वीकचा शेवटचा दिवस व्हॅलेंटाईन डे आहे जो 14 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस जोडप्यांसाठी खूप खास आहे. या दिवशी, जोडपे एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवतात आणि एकमेकांसाठी सरप्राईज प्लॅन करतात किंवा कुठेतरी बाहेर जातात. या दिवशी लोक आपल्या जोडीदारांना भेटवस्तू देखील देतात. हा दिवस त्यांच्यासाठी किती खास आहे याची जाणीव करून देण्याचाही ते प्रयत्न करतात.
तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत यंदा व्हॅलेंटाईन वीक साजरा करू शकता. त्यासोबतच येणाऱ्या आठवड्यातील प्रत्येक दिवस पार्टनरसोबत खास पद्धतीने साजरा करू शकता
The post Valentine Week : आजपासून सुरु झाला प्रेमाचा आठवडा ; कोणत्या तारखेला कोणता दिवस साजरा कराल ? वाचा सविस्तर appeared first on Dainik Prabhat.