Valentine Day 2024 : व्हॅलेंटाईन डे (14 फेब्रुवारी) जवळ आला आहे. अशा परिस्थितीत एकमेकांवर प्रेम करणारी अविवाहित जोडपी असोत किंवा विवाहित जोडपी असोत, प्रत्येकाच्या मनात या दिवसाचा प्रचंड उत्साह असतो. तुम्हीही या वर्षी तुमच्या जोडीदारासोबत ट्रीपला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. IRCTC एक अप्रतिम टूर पॅकेज घेऊन आले आहे, ज्यामध्ये तुमच्या बजेटमध्ये परदेशात जाण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होईल. या ऑफेरमध्ये तुम्हाला थायलंडमधील पटाया आणि बँकॉकसाठीचे ट्रॅव्हल पॅकेज दिले जाणार आहे.
तारीख काय आहे?
हे पॅकेज १४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. यामध्ये तुम्ही पटाया आणि बँकॉकला भेट देऊ शकाल.
फ्लाइट कुठून आहे?
थायलंडचा हा दौरा हैदराबादपासून सुरू होतो. तुम्हाला येथून फ्लाइट मिळेल.
किती पैसे खर्च करावे लागतील?
या हवाई टूर पॅकेजसाठी तुम्हाला किमान 48,470 रुपये मोजावे लागतील. या खर्चामध्ये फ्लाइट तिकीट, हॉटेलमध्ये राहणे आणि जेवणाचे शुल्क समाविष्ट आहे.
पॅकेजचे नाव काय आहे?
या पॅकेजचे नाव आहे – Treasures Of Thailand, Valentine’s Day Special Ex Hyderabad
The Treasures of Thailand, Valentine’s Day Special Ex Hyderabad (SHO12) will take you to some of the most exciting spots of Thailand. The tour starts on 14-02-2024.
Book now on https://t.co/d6q4GLJMha#Thailand #ThailandTour #BOOKINGS #Travel pic.twitter.com/QFvKXmppqc
— IRCTC (@IRCTCofficial) January 22, 2024
एकटे जाऊ शकते का?
होय, या दौऱ्यावर तुम्ही एकटेही जाऊ शकता. यासाठी तुम्हाला 56,845 रुपये खर्च करावे लागतील. तर, दोन लोक गेल्यास 48,470 रुपये प्रति व्यक्ती आहे. याशिवाय, तीन लोकांच्या ट्रिपसाठी 48,470 रुपये, तर एका लहान मुलासाठी, बेडसह 46,575 रुपये आणि बेडशिवाय 41,550 रुपये खर्च येईल.
बुकिंग आणि अधिक माहितीसाठी तुम्ही irctctourism.com सर्च करू शकता.
The post Valentine Day ला पार्टनरसोबत करा विदेश वारी ! IRCTC ने आणला आहे 50 हजारांचा जबरदस्त Travel Plan appeared first on Dainik Prabhat.