Monday, November 17, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

चुकीच्या पद्धतीने मास्क वापरणे तुमच्यासाठी ठरू शकते धोकादायक!

by प्रभात वृत्तसेवा
September 17, 2020
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पुणे – करोना संकटकाळात आता सगळी शहरे अनलॉक झाली असल्यामुळे रोज घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. करोना संसर्गापासून वाचण्यासाठी सोशल डिस्टन्स पाळणे, सॅनिटायझर वापरणे आणि मास्क वापरणे या अत्यावश्यक बाबी बनल्या आहेत. त्यातही बाहेर पडताना तसेच कामाच्या ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक आहे. मात्र, चुकीच्या पद्धतीने वापरण्यात येणारे मास्क तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते, हे तुम्हाला माहीत आहे? चला तर, जाणून घेऊयात मास्क वापरताना कोणत्या चुका टाळाव्यात आणि कोणत्या प्रकारचा मास्क वापरावा…

– कारोना विषाणूचा कण हा 0.12 मायक्रोमिटर आकाराचा असतो. घरगुती मास्क बनवण्याचे कापड हे 80-500 मायक्रोमिटर छिद्र असणारे कापड असते. आपण सगळेच घरगुती फेस मास्क, सर्जिकल फेसमास्क, वन टाईम युज मास्क अजून बरेच विविध मास्क वापरतो. पण या जंतूंना लांब ठेवणाऱ्या फेसमास्कबद्दल आपल्याला अनेक गोष्टी माहीत नाहीत.

– घरगुती मास्क बनवताना टी-शर्ट किंवा किचन टॉवेल पासून मास्क बनवा. हे कपडे जाड असतात व इतर कपड्यांच्या तुलनेत यांचे पोअर्स लहान असतात व जंतू, कण यांना इतर कपडा पेक्षा जास्त गाळून घेतात.

– मऊ उशीच्या खोळी पासून सुद्धा मास्क बनवता येऊ शकतो. मास्क बनवताना, त्याचे इलॅस्टिक नीट, माप घेऊन घट्ट शिवा. आजूबाजूने हवा जाईल अशी जागा ठेऊ नका. कारण या गॅप मुळे मास्क वापरून सुद्धा नवापरल्या सारखेच होईल. आणि तुमच्या शरीरात विषाणूंचा प्रवेश होईल.

– मास्कची अदलाबदली ही चूक परिवारातील सदस्य नेहमीच करतात. एकाच परिवारात राहणारे सदस्य एकमेकांचे मास्क शेअर करतात. ही अतिशय चुकीची आणि घातक सवय आहे. लक्षात ठेवा, करोना व्हायरसचे 50 टक्क्यांहून अधिक प्रकरणात व्यक्तीमध्ये करोनाचे लक्षण दिसत नाहीत. अशात मास्कची अदलाबदली व्हायरस पसरण्याचे कारण ठरू शकते.

– कापसाच्या 2 घड्या करून मास्क शिवा. डबल लेयर्स मुळे पर्टीकल्स जास्त संख्येत गाळले जातात. घरगुती मास्क शिवताना आतून, पेपर टॉवेल चे कोटींग करा. पेपर टॉवेल चे मायक्रोपोअर्स बऱ्याच प्रमाणात सूक्ष्म असतात त्या मुळे हे टॉवेल 23% जास्त कण रोखून धरतात आणि आपल्या सुरक्षेत वाढ होते.

– तसेच एकदा वापरलेले मास्क पुन्हा न धुता वापरू नका. मास्कला उलट सुलट करून अजिबात वापरू नका. एकदा वापरलेले मास्क डिसइन्फेक्ट करून मगच वापरा.

– जवळपास 99 टक्के लोकं मास्कला वारंवार हात लावतात ही चूक तुमच्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक ठरू शकते. बरेचजण मास्क लावल्यानंतर थोड्या थोड्या वेळाने काढतात आणि परत लावतात. असे केल्याने तुम्ही मास्क लावण्याचा मूळ हेतू साध्य करू शकत नाही.

Tags: "lockdown"aarogya jagarAarogyaparavCoronacorona covid-19helth tipslife styletopnews
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar